स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांनी चाकण, पुणे येथील वाहन सुरक्षा आणि चाचणी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांतर्गत एसएव्हीडब्ल्यूआयपीएल आपल्या चाकण प्रकल्पाजवळील भूखंड एआरएआयकडे हस्तांतरित करणार असून, तेथे भविष्यातील मोबिलिटी वाहनांसाठी अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सुविधा उभारली जाईल.
हा सामंजस्य करार केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री माननीय एच.डी. कुमारस्वामी, एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ पीयूष अरोरा आणि एआरएआयचे डायरेक्टर डॉ. रेजी मथाई यांच्या उपस्थितीत पार पडला. ही नवीन सुविधा इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचण्या, सुरक्षा मानके आणि भारत एनसीएपी (NCAP) मूल्यांकनांना अधिक गती देईल.
2026 स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट भारतात लाँच; किंमत फक्त ₹9.99 लाखांपासून सुरु
या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. एच. डी. कुमारस्वामी* म्हणाले, “भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्र वेगाने पुढे जात असताना स्थानिक आरअँडडी आणि सुरक्षा चाचणी पायाभूत सुविधांचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. चाकणमध्ये ही सुविधा उभारून आम्ही भविष्यातील भारत एनसीएपीच्या गरजांची जलद अंमलबजावणी करण्यास मदत करत आहोत. यामुळे भारताच्या रस्ते सुरक्षा आव्हानांवर मात करण्यासोबतच जागतिक बाजारपेठेतील कठोर गरजा पूर्ण करणारी वाहने विकसित करण्यास मदत होईल.”
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पीयूष अरोरा म्हणाले, “वाहन सुरक्षा आणि स्थानिक अभियांत्रिकी क्षमता आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी आहे. एआरएआयला आमच्या चाकण प्रकल्पाशेजारी क्रॅश टेस्ट सुविधेसाठी जमिनीची आवश्यकता भासली, तेव्हा आम्ही आमच्या भविष्यातील विस्तार आराखड्यात आवश्यक बदल केले. आमच्या ‘इंडिया २.०’ वाहनांना ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. हा धोरणात्मक सहयोग भारतातील अधिक सुरक्षित वाहनांच्या विकासाला आणि ईव्ही तंत्रज्ञानाला गती देईल.”
JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
एआरएआयचे डायरेक्टर डॉ. रेजी मथाई म्हणाले, “हा सामंजस्य करार भारताच्या ऑटोमोटिव्ह चाचणी आणि सुरक्षा पायाभूत सुविधांमधील एक धोरणात्मक मैलाचा दगड आहे. वाहनांचे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असताना प्रगत व्हॅलिडेशन आणि क्रॅश टेस्ट क्षमतांची गरज सातत्याने वाढत राहील. आगामी अनेक दशके मोबिलिटी क्षेत्राला उपयुक्त ठरेल अशी जागतिक दर्जाची यंत्रणा उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
Ans: दोन्ही संस्थांनी पुण्यातील चाकण येथे आधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.
Ans: स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या चाकण प्रकल्पाजवळील जागेवर एआरएआय हे सेंटर उभारणार आहे.
Ans: या सुविधेमुळे वाहनांच्या सुरक्षा चाचण्या, इलेक्ट्रिक वाहनांचे मूल्यांकन, भारत एनसीएपी प्रक्रिया आणि स्थानिक संशोधनाला जास्त गती मिळण्यास मदत होईल.






