Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

SPJIMR FT MiM Ranking : भारतीय विद्या भवनच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने SPJIMR प्रतिष्ठित 'फायनान्शियल टाइम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट FT MiM २०२६' च्या जागतिक रँकिंगमध्ये ९ स्थानांची उत्तुंग झेप घेत जगात २६ वे स्थान पटकावले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 08, 2026 | 04:24 PM
SPJIMR FT MiM Ranking

SPJIMR FT MiM Ranking

Follow Us
Follow Us:
  • GIXXER आणि GIXXER SF ला मिळाले नवीन कलर कॉम्बिनेशन
  • GIXXER 250 आणि GIXXER SF 250 मध्ये ग्रेट पर्याय
  • GIXXER SF 250 FFV आता नव्या रंगात उपलब्ध
SPJIMR FT MiM Ranking :  भारतीय विद्या भवनच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चने (एसपीजेआयएमआर) फायनान्शियल टाइम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट (एफटी एमआयएम) २०२६च्या जागतिक रँकिंगमध्ये (ranking) नऊ स्थानांची झेप घेत जागतिक स्तरावर २६ वे आणि भारतात दुसरे स्थान मिळवले आहे, जे २०२५ मध्ये जागतिक स्तरावर ३५व्या आणि भारतात तिसऱ्या स्थानावर होते. ( SPJIMR FT MiM Ranking ) 

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

सर्वोच्च ५० बिझनेस स्कूल्समध्ये आपले स्थान

एसपीजेआयएमआरने आता सलग सातव्या वर्षी जगातील सर्वोच्च ५० बिझनेस स्कूल्समध्ये आपले स्थान मिळवले आहे. २०२६ च्या रँकिंगमध्ये, एसपीजेआयएमआर ही आयआयएम बेंगळुरूपाठोपाठ आणि आयआयएम अहमदाबादच्या पुढे असलेली भारतातील दुसरी सर्वोच्च क्रमांकाची बिझनेस स्कूल ठरली आहे. २०२५ मधील चार संस्थांच्या तुलनेत या वर्षी भारतातील पाच बिझनेस स्कूल्स जागतिक स्तरावरील अव्वल ५० संस्थांमध्ये समाविष्ट आहेत.

विद्यार्थी अनुभवाच्या प्रत्येक पैलूला प्रबळ

एसपीजेआयएमआरच्या जागतिक आणि भारतातील स्थानामधील या सुधारणेबद्दल मत व्यक्त करत एसपीजेआयएमआरचे डीन वरुण नागराज म्हणाले, “या वर्षीचे रँकिंग आमच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या मानकांमध्ये झालेली सातत्यपूर्ण प्रगती दर्शवते: करिअरचे परिणाम, माजी विद्यार्थ्यांचा (अॅल्युम्नी) सहभाग आणि आमचा प्रोग्राम (अभ्यासक्रम) प्रदान करत असलेले मूल्य. प्लेसमेंट सपोर्टपासून ते प्रोग्राममध्ये आम्ही निर्माण करत असलेल्या शिक्षणाच्या सखोलतेपर्यंत, विद्यार्थी अनुभवाच्या प्रत्येक पैलूला प्रबळ करण्यावर आमचा भर कायम आहे.”

SPJIMR भारतात प्रथम क्रमांकावर

एसपीजेआयएमआरने एफटी एमआयएम रँकिंगच्या चार श्रेणींमध्ये भारतातील आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे, तसेच प्रत्येक श्रेणीत आपल्या जागतिक स्थानात सुधारणा केली आहे:

● करिअर सर्व्हिस – भारतात #१ (जागतिक रँक: #२, पूर्वीच्या #३ वरून सुधारणा)
विद्यार्थ्यांच्या भरतीला (रिक्रूटमेंट) पाठबळ देण्यासाठी करिअर सर्व्हिसच्या प्रभावीतेचे मूल्यांकन, माजी विद्यार्थ्यांच्या पुनरावलोकनांवर आधारित.
● अॅल्युम्नी नेटवर्क – भारतात #१ (जागतिक रँक: #६, पूर्वीच्या #११ वरून सुधारणा)
माजी विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे अॅल्युम्नी नेटवर्क करिअरच्या संधी, स्टार्टअप्स, संकल्पनांची देवाणघेवाण, भरती आणि इव्हेण्‍टची माहिती प्रभावीपणे पाठबळ देते याचे मूल्यांकन करते.
● व्हॅल्यू फॉर मनी – भारतात #१ (जागतिक रँक: #५०, पूर्वीच्या #५६ वरून सुधारणा)
माजी विद्यार्थ्यांचे सध्याचे वेतन, ट्यूशन फी आणि संबंधित प्रोग्राम खर्चाचा वापर करून गणना केली जाते.
● ईएसजी अँड नेट झिरो टीचिंग – भारतात #१ (जागतिक रँक: #२८, पूर्वीच्या #६३ वरून सुधारणा)
पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) मुद्दे व हवामान उपायांवर केंद्रित असलेल्या अध्यापनाचे प्रमाण, तसेच या घटकांचे माजी विद्यार्थ्यांनी केलेले मूल्यांकन मोजते.

करिअर आणि प्रोग्राम निष्पत्तींमध्ये उत्तम कामगिरी

२०२६ चे रँकिंग विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवाच्या अनेक पैलूंमधील एसपीजेआयएमआरची कामगिरी देखील दर्शवते, ज्यामध्ये करिअरची प्रगती, करिअर पाठबळ, माजी‍ विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रोग्रामचे मूल्य आणि शाश्वततेवर केंद्रित शिक्षण यांचा समावेश आहे. संस्थेने १० पैकी ९.६ असा एकूण समाधान स्कोअर (ओव्हरऑल सॅटिस्फॅक्शन स्कोअर) नोंदवला आहे, जो प्रोग्रामच्या अनुभवाबद्दल विद्यार्थ्यांची प्रबळ भावना दर्शवतो.

भारतातील बिझनेस स्कूल्सना जागतिक स्तरावर मोठे प्रतिनिधित्व

एफटी एमआयएम जागतिक रँकिंग हे प्रामुख्याने मर्यादित कामाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेल्या व्यवस्थापन प्रोग्राम्सचे मूल्यांकन करते. हे रँकिंग केवळ एएसीएसबी किंवा ईक्यूयूआयएसद्वारे मान्यताप्राप्त बिझनेस स्कूल्सचा विचार करते आणि अॅल्युम्नी करिअर प्रोग्रेस, अॅल्युम्नी नेटवर्क, स्कूल विविधता, आंतरराष्ट्रीय अनुभव, संशोधन, ईएसजी आणि नेट झिरो टीचिंग, तसेच करिअर सर्व्हिस यासह विविध निकषांवर कामगिरीचे मूल्यांकन करते.

शिक्षण क्षेत्रात भारतातील बिझनेस स्कूल्सचे वाढते प्रतिनिधित्व

२०२५ मधील ११ संस्थांच्या तुलनेत २०२६ मध्ये भारतातील १४ बिझनेस स्कूल्सचा एफटी एमआयएम जागतिक रँकिंगमध्ये समावेश आहे. ही वाढ आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात भारतातील बिझनेस स्कूल्सचे वाढते प्रतिनिधित्व दर्शवते. पूर्ण रँकिंग आणि पद्धतीसाठी, फायनान्शियल टाइम्स मास्टर्स इन मॅनेजमेंट रँकिंगला (Financial Times Masters in Management ranking) भेट द्या. एसपीजेआयएमआरकडून अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी, एसपीजेआयएमआर न्यूजरूमला (SPJIMR Newsroom) भेट द्या.

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?

Web Title: Spjimr ranks 26th globally in ft masters in management 2026 ranking marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • Alert Schools
  • Business News

संबंधित बातम्या

RTE Fee Reimbursement: आरटीई शाळांच्या थकित प्रकरण संपणार, राज्य शासनाकडून विशेष आढावा समिती जाहीर
1

RTE Fee Reimbursement: आरटीई शाळांच्या थकित प्रकरण संपणार, राज्य शासनाकडून विशेष आढावा समिती जाहीर

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?
2

भारतात AI चा तुफान वापर ! कंपन्यांचा मोठा विश्वास… 2027 पर्यंत IT बजेटचा 20% हिस्सा AI कडे जाणार; सर्व्हिसनाऊच्या अहवालात काय?

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती
3

ASUS इंडियाचा मोठा निर्णय! MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची ‘Mentor’ म्हणून नियुक्ती

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री
4

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.