Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून ‘या’ फळांच्या शेतीतून कोट्यवधींची कमाई! ६२ वर्षीय शेतकऱ्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री

Inspiring Story: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील ६२ वर्षीय गेनाभाई पटेल यांनी शारीरिक अडचणींवर मात करत शेतीतून मोठं यश मिळवलं आहे. अवघ्या एका वर्षाचे असताना त्यांना पोलिओ झाला आणि दोन्ही पायांनी काम करणं बंद झालं.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 06, 2026 | 12:38 PM
Inspiring Story: अपंगत्वाला हरवून 'या' फळांच्या (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Inspiring Story: अपंगत्वाला हरवून 'या' फळांच्या (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गेनाभाई पटेल यांना ‘अनार दादा’ म्हणून ओळखलं जातं
  • पोलिओवर मात करत डाळिंब शेतीत मिळवलं यश
  • डाळिंब शेतीतून वर्षाला सुमारे १ कोटींची कमाई
 

Inspiring Farmer Story :आयुष्यात अडचणी सगळ्यांनाच येतात, पण त्या अडचणींना घाबरून न जाता त्यावर मात करणारे लोक खूप कमी लोक असतात. परंतू गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातल्या राहणारे गेनाभाई पटेल यांनी हार न मानता ते चक्क शेतीतून वर्षाला 1 कोटी रुपये कमावतात. अडचणींना घेऊन न बसता त्यासोबत मुकाबला करता आला पाहिजे याचे योग्य उदाहरण आहेत.Inspiring Story:

कोण आहेत गेनाभाई पटेल?

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातल्या गेनाभाई पटेल 62 वर्षांचे आहेत. त्यांना लोक प्रेमाने ‘अनार दादा’ म्हणतात. अवघ्या एका वर्षाचे असताना त्यांना पोलिओ झाला. त्यामुळे दोन्ही पायांनी काम करणं बंद केलं. लहान वयातच अपंगत्व आलं. दुसरं कोणी असतं तर त्याने हार मानली असती. पण गेनाभाईंनी या अपंगत्वाला कधीच कमजोरी समजली नाही. उलट त्यांनी याच गोष्टीला आपली ताकद केली आणि यशाचे शिखर गाढले. आज ते डाळिंबाच्या शेतीतून वर्षाला 1 कोटी रुपये कमावतात.

आधी परिस्थिती काय होती?

गेनाभाईंचं कुटुंब आधी पारंपरिक शेतीच करायचं. गहू, जिरे, बाजरी, एरंडी असे धान्यांची शेती करत होते. त्यातून त्यांना वर्षाला 50 ते 80 हजार रुपये कसेबसे मिळायचे. त्यात पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. तिथे जमिनीतलं पाणी 1000 फूट खाली गेलं होतं. गेनाभाईंना त्यांच्या पायामुळे शेतातलं जड काम करणं शक्यच नव्हतं. त्यांनी विचार केला की कमी पाण्यात कोणती शेती केली जाते.

यासाठी त्यांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली, इंटरनेटवर माहिती घेतली. त्यांना कळलं की महाराष्ट्रात नाशिकला डाळिंबाची शेती होते आणि त्याला कमी पाणी लागतं.  बाकीच्या शेतकऱ्यांशी बोलणं केल्यानंतर 2005-06 साली त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. नाशिकवरुन डांळिबाची रोपं आणली. प्रति रोप 5 रुपयांप्रमाणे 18 हजार रोपं आणली आणि आपल्या कोरड्या जमिनीवर डाळिंबाची रोप लावली.

सुरुवातीला गावकऱ्यांनी त्यांना वेड्यात काढले, मात्र त्यांनी डाळिंबासाठी एकदम शास्त्रीय पद्धत वापरली. जमिनीत खड्डे करून ते उन्हात उघडे ठेवले, जेणेकरून मातीतले खराब जिवाणू मरतील. पाणी वाचवण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन लावलं. जेणेकडून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे जपून वापरला जाईल.

गेनाभाईंची सर्वात भन्नाट कल्पना

गेनाभाईंनी सर्वात भन्नाट कल्पना केली. त्यांनी ‘फ्रूट थिनिंग’. संकल्पना आणली. म्हणजेच.एका झाडावर फक्त 100 ते 125 चांगली फळंच ठेवली जातात. त्यामुळे जी फळं राहतात ती एकदम मोठी आणि चांगल्या क्वालिटीची होतात. ह सर्व प्रक्रिया सेंद्रीय शेतीमध्ये होते. त्यामध्ये शेण आणि गोमूत्रापासून बनवलेलं जीवामृत असतात. कोणतेही केमिकलचा वापर केला जात नाही.

आज त्यांना 12 एकरातून 1 कोटीचा फायदा होतो. एका एकरातून 12 टन डाळिंब मिळतं. 12 एकरातून वर्षाला 144 टन माल निघतो. आधी जिथे एका एकरातून 5 ते 10 हजार मिळायचे, तिथे आता 6 ते 8 लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात पुन्हा मोठा बदल! चांदीही तेजीत; आजचा भाव पाहून बदलणार दागिने खरेदीचा निर्णय?

एका किलोला 60 ते 70 रुपये दर मिळतो. त्यामुळे वर्षाला 96 लाख ते 1 कोटीचा टर्नओव्हर आहे.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना माल विकायला बाजारात जावं लागत नाही. मोठे व्यापारी स्वतः त्यांच्या शेतावर येतात आणि अख्खी बाग विकत घेतात. त्यांची डाळिंबं भारतातमध्ये नाहीतर, दुबई, मलेशिया, बांगलादेशला सुद्धा जातो.

अनार शाळा आणि पद्मश्री

गेनाभाईंनी फक्त स्वतःचं नाहीतर सगळ्या गावाचं भलं केलं आहे. त्यांनी आपल्या शेतातच ‘अनार शाळा’ सुरू केली आहे. तिथे ते शेतकऱ्यांना फुकट ट्रेनिंग दिले जाते. आतापर्यंत 80 हजार लोकांनी त्यांचं शेत बघितलं आहे तसेच 3 ते 4 लाख शेतकऱ्यांना त्यांनी शिकवलं आहे. त्यांच्यामुळे बनासकांठा, कच्छ आणि राजस्थानमध्ये 12 ते 14 हजार हेक्टरवर डाळिंबाची शेती सुरू झाली आहे.

RBI चा थेट निशाणा! ‘या’ 5 Financial Companies वर झाली मोठी कारवाई; थेट 27 लाखांचा Penalty भरण्याचे आदेश

गावातले रस्ते झाले, लोकांकडे ट्रॅक्टर आले, मुलं शिकायला लागली. त्यांच्या या कामासाठी 2017 साली राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.खरंच, एका अपंग माणसाने नापीक जमिनीतून सोनं पिकवून दाखवलं आहे.

Web Title: Gujarat farmer ganabhai patel earns 1 crore annually from pomegranate farming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Business Man
  • Business News
  • inspiration
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?
1

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
2

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
3

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
4

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.