Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेट्रोल आणि डिझेलनंतर, आता महागाईचा पुढील धक्का! 1 जूनपासून ‘या’ आकर्षक बाईक्स आणखी होऊ शकतात महाग

ट्रायम्फ आपल्या लोकप्रिय ४०० सीरीज मधील मोटरसायकलींच्या किमती १ जून २०२६ पासून वाढवण्याच्या तयारीत आहे. Triumph Speed 400, Scrambler 400 आणि Thruxton 400 च्या किमतीत ५ ते १० हजारांची वाढ होऊ शकते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 26, 2026 | 05:39 PM
1 जूनपासून 'या' आकर्षक बाईक्स आणखी होऊ शकतात महाग (Photo Credit- X)

1 जूनपासून 'या' आकर्षक बाईक्स आणखी होऊ शकतात महाग (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • पेट्रोल आणि डिझेलनंतर, आता महागाईचा पुढील धक्का!
  • 1 जूनपासून या आकर्षक बाईक्स आणखी होऊ शकतात महाग
Triumph Bike Price Hike News: प्रीमियम बाईक उत्पादक कंपनी ‘ट्रायम्फ’ची (Triumph) बाईक खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. कंपनी आपल्या लोकप्रिय ‘400 सीरीज’ (Triumph 400 Series) मधील मोटरसायकलींच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. जर तुम्ही Triumph Speed 400, Scrambler 400 किंवा अगदी अलीकडेच लाँच झालेली नवीन Thruxton 400 खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर 1 जून 2026 पूर्वी ती बुक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाड्यांच्या किमतीत 5 हजार रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

‘या’ मॉडेल्सच्या किमतीत होणार मोठी वाढ

मिळालेल्या अहवालानुसार, ट्रायम्फ कंपनी आपल्या संपूर्ण 400 रेंजच्या किमतींमध्ये सुधारणा करणार आहे. या प्रीमियम लाइनअपमध्ये खालील मॉडेल्सचा प्रामुख्याने समावेश आहे:

  • Triumph Speed T4
  • Triumph Speed 400
  • Triumph Scrambler 400 X
  • Triumph Scrambler 400 XC
  • Triumph Thruxton 400

कंपनीने अद्याप या दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, मुंबईतील काही आघाडीच्या डीलरशिप्सकडून 1 जूनपासून किमती वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत ग्राहकांना दिले जात आहेत.

मॉडेलनुसार किंमत बदलणार

ट्रायम्फच्या 400 सीरीजमधील प्रत्येक मॉडेलनुसार ही दरवाढ वेगवेगळी असण्याची शक्यता आहे. कंपनीच्या काही बेस मॉडेल्सच्या किमतीत 5 हजार रुपयांपर्यंत वाढ केली जाऊ शकते, तर काही टॉप-एंड आणि प्रीमियम मॉडेल्स तब्बल 10 हजार रुपयांपर्यंत महाग होऊ शकतात. ही नवीन दरवाढ 1 जून 2026 पासून देशभरात लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

वर्ष 2026 च्या सुरुवातीलाच कंपनीने घटवले होते दर!

या वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये ट्रायम्फने आपल्या 400 सीरीजला महत्त्वपूर्ण अपडेट दिले होते. कंपनीने या बाईक्समध्ये नवीन 350 सीसी (350cc Engine) क्षमतेचे इंजिन समाविष्ट केले होते, जेणेकरून सरकारकडून मिळणाऱ्या जीएसटी (GST) सवलतीचा फायदा ग्राहकांना आणि कंपनीला घेता येईल. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारने 350 सीसी पर्यंतच्या दुचाकी वाहनांवर 18 टक्के जीएसटी दर निश्चित केला होता.

40 हजार पगारात कोणती Car ठरेल ‘पैसा वसूल’? निर्णय चुकला तर होईल पश्चात्ताप

नवीन इंजिन अपडेटनंतर गाड्या झाल्या होत्या स्वस्त

नवीन कमी सीसी (350cc) इंजिन कॅटेगरीमध्ये आल्यानंतर कंपनीने आपल्या काही लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती लक्षणीयरीत्या कमी केल्या होत्या. त्यावेळी Triumph Scrambler 400 आणि Thruxton 400 सारख्या बाईक्सच्या किमतीत सुमारे 10 ते 11 हजार रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. यामुळे ग्राहकांना प्रीमियम सेगमेंटमधील या बाईक्स अगदी परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. मात्र, आता जर कंपनीने पुन्हा 5 ते 10 हजार रुपयांची दरवाढ केली, तर या गाड्यांच्या किमती पुन्हा एकदा जुन्या दरांच्या पातळीवर पोहोचतील. म्हणजेच, ग्राहकांना इंजिन तर लहान मिळेल, परंतु किंमत मात्र पूर्वीइतकीच मोजावी लागणार आहे. याच कारणामुळे बाईक प्रेमींमध्ये सध्या या आगामी दरवाढीची जोरदार चर्चा सुरू आहे.

Triumph Speed T4 अजूनही सर्वात परवडणारी बाईक

सध्याच्या घडीला ट्रायम्फच्या पोर्टफोलिओमध्ये ‘Speed T4’ हे सर्वात किफायतशीर आणि लोकप्रिय मॉडेल मानले जाते. या बाईकची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 1.95 लाख रुपये आहे. विशेष बाब म्हणजे, कंपनीने नवीन 349 सीसी इंजिन अपडेट केल्यानंतरही या विशिष्ट मॉडेलच्या किमतीत कोणतीही कपात केली नव्हती. त्यामुळे या मॉडेलच्या किमतीत 1 जून रोजी किती वाढ होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व मॉडेल्समध्ये मिळते शक्तिशाली 349 सीसी इंजिन

अपडेटेड 400 रेंजच्या सर्व मोटरसायकलींमध्ये कंपनीने 349 सीसीचे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे. जरी सर्व गाड्यांमध्ये एकच इंजिन ब्लॉक वापरला गेला असला, तरी प्रत्येक बाईकच्या स्वरूपानुसार आणि वापराच्या पद्धतीनुसार (क्रूझर, स्क्रॅम्बलर, कॅफे रेसर) हे इंजिन वेगवेगळ्या पद्धतीने ट्यून करण्यात आले आहे. जेणेकरून ग्राहकांना प्रत्येक मॉडेल चालवताना एक वेगळा परफॉर्मन्स आणि राईडिंग स्टाईल अनुभवता येईल.

Tires Of Vehicles : गाड्यांच्या टायरचा रंग काळाच का असतो? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Web Title: Starting june 1st these attractive bikes could become even more expensive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • auto news
  • bike
  • Petrol and diesel

संबंधित बातम्या

राज्यात पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत अचानक प्रचंड वाढ! जालन्यात डिझेल खरेदी १५४ टक्क्यांवर; अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट
1

राज्यात पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत अचानक प्रचंड वाढ! जालन्यात डिझेल खरेदी १५४ टक्क्यांवर; अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट

Tatkal Ticket Booking Rules: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘तत्काळ’ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल
2

Tatkal Ticket Booking Rules: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! ‘तत्काळ’ तिकीट बुकिंगच्या नियमात मोठा बदल

निव्वळ कमाल! Tata Tiago EV चे केबिन पाहून डोळेच विस्फारतील! Dual Display आणि प्रिमीयम फिचर्सने व्हाल अवाक्
3

निव्वळ कमाल! Tata Tiago EV चे केबिन पाहून डोळेच विस्फारतील! Dual Display आणि प्रिमीयम फिचर्सने व्हाल अवाक्

Ferrari ची पहिलीच इलेक्ट्रिक कार फसली वादात, कसे आहेत कारचे फिचर्स आणि काय आहे Range
4

Ferrari ची पहिलीच इलेक्ट्रिक कार फसली वादात, कसे आहेत कारचे फिचर्स आणि काय आहे Range

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.