Suzuki Hayabusa चा स्पेशल एडिशन ग्लोबल लेव्हलवर सादर
अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या भारतीय Automobile मार्केटसह जागतिक मार्केटमध्ये सुद्धा दमदार बाईक (Bike) ऑफर करत असतात. बजेट फ्रेंडली बाईकसोबतच ग्राहकांमध्ये हाय परफॉर्मन्स बाईकची सुद्धा एक वेगळीच क्रेझ असते. या बाईक दिसण्यात तर पॉवरफुल असतातच. मात्र, त्यासोबतच परफॉर्मन्समध्ये सुद्धा या बाईक धमाकेदार असतात. अनेक ॲडव्हेंचर राइड करणाऱ्यांच्या कलेक्शनमध्ये तर हाय परफॉर्मन्स बाईक पाहायला मिळतेच.
सुजुकीने आपली जगभरात लोकप्रिय आणि पॉवरफुल हायपरबाईक Suzuki Hayabusa चे एक नवीन स्पेशल एडिशन ग्लोबल लेव्हलवर सादर केली आहे. या स्पेशल एडिशनमध्ये हायाबुसा आकर्षक आणि लक्षवेधी कलर ऑप्शन्ससह आणली गेली आहे. मात्र, यात कोणताही मेकॅनिकल बदल करण्यात आलेला नाही. चला तर मग जाणून घेऊया की या Suzuki Hayabusa Special Edition मध्ये नेमकं काय खास आहे?
लवकरच ‘या’ 5 Mid Size SUVs लाँच होण्याच्या तयारीत, MG Hector, Seltos सारख्या कारला मिळणार टक्कर
हायाबुसाची स्पेशल एडिशनला पांढऱ्या रंगांसह चमकदार निळ्या रंगात रंगवण्यात आली आहे. हा निळा आणि पांढरा रंग अनेक वर्षांपासून सुझुकी बाईक्सची ओळख आहे. कंपनीने त्यावर काही खास कॉस्मेटिक टच देखील दिले आहेत.
Suzuki Hayabusa Special Edition च्या टँकवर एक नवीन स्पेशल एडिशन एम्बलम आहे. टँकवरील सुझुकी लोगोसाठी एक ठळक आणि रेट्रो-शैलीचा फॉन्ट वापरण्यात आला आहे. एक्झॉस्ट मफलर टिप आणि हीट शील्डला पावडर-कोटेड ब्लॅक फिनिश देण्यात आला आहे. बाईक खरेदी करताना स्टँडर्ड फिटमेंट म्हणून रंग-मॅचिंग पिलियन सीट काऊल देखील देण्यात येईल.
हायाबुसाच्या स्पेशल एडिशनमध्ये कोणतेही यांत्रिक बदल नाहीत. यात पूर्वीसारखेच शक्तिशाली 1,340 सीसी, इनलाइन-फोर सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 188 एचपी पॉवर आणि 149 एनएम टॉर्क जनरेट करते.
मुंबईत नवीन इलेक्ट्रिक कार Volvo EX30 सादर, सप्टेंबर 2025 च्या अखेरीस होणार लाँच
लेटेस्ट हायाबुसा अनेक उत्तम फीचर्ससह येते. क्रूझ कंट्रोल, हिल-होल्ड कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर, पॉवर मोड्स आणि ड्युअल-चॅनेल एबीएस हे सर्व स्टॅंडर्ड म्हणून दिले जातात.
Suzuki Hayabusa special edition जागतिक स्तरावर सादर करण्यात आली आहे. ही खास ‘पर्ल व्हिगर ब्लू’ हायाबुसाची भारतात येणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरेल आहे. सध्या, सुझुकी हायाबुसाची एक्स-शोरूम किंमत 16.90 लाख रुपये आहे.