Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! संपूर्ण EV लाइनअपवर Battery-as-a-Service योजना, 4.69 लाखांपासून मिळणार कार

टाटा मोटर्सने आपल्या संपूर्ण EV लाइनअपवर BaaS योजना लागू केली असून कारची सुरुवातीची किंमत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. पण प्रति किलोमीटर बॅटरी शुल्कामुळे तुमच्या वापरानुसार ही योजना किती फायदेशीर ठरेल?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 28, 2026 | 05:47 PM
टाटा मोटर्सचा मोठा निर्णय! संपूर्ण EV लाइनअपवर Battery-as-a-Service योजना, 4.69 लाखांपासून मिळणार कार
Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्सने टियागो EV पासून हॅरियर EV पर्यंत संपूर्ण इलेक्ट्रिक लाइनअपवर BaaS योजना उपलब्ध केली आहे.
  • BaaS पर्यायामुळे कारची सुरुवातीची किंमत कमी होते, पण बॅटरी वापरासाठी प्रति किलोमीटर शुल्क आकारले जाते.
  • जास्त प्रवास करणाऱ्या ग्राहकांनी BaaS निवडण्यापूर्वी दीर्घकालीन बॅटरी वापराचा एकूण खर्च तपासणे गरजेचे आहे.
इलेक्ट्रिक कार खरेदी करताना सर्वात मोठा खर्च बॅटरीचा असतो. त्यामुळे सुरुवातीची किंमत कमी ठेवण्यासाठी टाटा मोटर्सने आपल्या संपूर्ण इलेक्ट्रिक कार लाइनअपवर Battery-as-a-Service म्हणजेच BaaS स्कीम अवेलेबल केली आहे. यामुळे कस्टमर्सना कार आणि बॅटरीचा खर्च वेगळ्या पद्धतीने भरता येणार आहे.

या योजनेत टाटा टियागो EV, पंच EV, नेक्सॉन EV, कर्व्ह EV, सिएरा EV आणि फ्लॅगशिप हॅरियर EV यांचा समावेश आहे. BaaS पर्याय निवडल्यास कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत कमी होते. उदाहरणार्थ, टियागो EV ची BaaS किंमत 4.69 लाख रुपयांपासून सुरू होते, तर पंच EV 6.59 लाख आणि नेक्सॉन EV 8.99 लाखांपासून अवेलेबल होते.

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना

कर्व्ह EV ची BaaS किंमत 10.99 लाख, सिएरा EV 11.99 लाख आणि हॅरियर EV 14.49 लाख रुपयांपासून सुरू होते. याशिवाय बॅटरी वापरासाठी प्रति किलोमीटर शुल्क आकारले जाते. हे शुल्क मॉडेलनुसार 2.6 रुपये ते 5.9 रुपये प्रति किलोमीटरपर्यंत आहे. या शुल्कामध्ये चार्जिंग, मेंटेनन्स किंवा दुरुस्तीचा खर्च समाविष्ट नाही.

सोप्या भाषेत सांगायचे तर, ग्राहक कारसाठी एक आर्थिक करार आणि बॅटरीसाठी वेगळा खर्च अशा स्वरूपात पेमेंट करतो. डाउन पेमेंट, बॅटरीची क्षमता आणि कर्जाचा कालावधी यानुसार प्रत्यक्ष मासिक खर्च बदलू शकतो. त्यामुळे कार घेण्यापूर्वी आपल्या रोजच्या ड्रायव्हिंगचा अंदाज घेणे महत्त्वाचे आहे.

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

कमी रोजचे अंतर कापणाऱ्या ग्राहकांसाठी सुरुवातीचा खर्च कमी करण्याचा हा पर्याय उपयोगी ठरू शकतो. पण जास्त किलोमीटर प्रवास करणाऱ्यांनी प्रति किलोमीटर शुल्क आणि दीर्घकालीन खर्चाची गणना करणे गरजेचे आहे. कस्टमर्सना ट्रेडीशनल पद्धतीने कार आणि बॅटरी एकत्र खरेदी करण्याचा ऑप्शनही कायम उपलब्ध आहे.

Web Title: Tata ev baas scheme all electric cars prices auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Electric Vehicles
  • tata motors

संबंधित बातम्या

ऑक्टोबरमध्ये लाँच होणार 10 पेक्षा जास्त नवीन कार! SUV, EV आणि सेडानचा बाजार भरणार!
1

ऑक्टोबरमध्ये लाँच होणार 10 पेक्षा जास्त नवीन कार! SUV, EV आणि सेडानचा बाजार भरणार!

7-सीटर कार घ्यायची आहे? रेनॉल्ट ट्रायबर टर्बो लॉन्च! 7.84 लाखांत मिळणार 100 PS पॉवर आणि 21 kmpl मायलेज
2

7-सीटर कार घ्यायची आहे? रेनॉल्ट ट्रायबर टर्बो लॉन्च! 7.84 लाखांत मिळणार 100 PS पॉवर आणि 21 kmpl मायलेज

ऑल इन वन राइड्ससाठी फक्त हीच एक अडव्हेंचर बाईक ठरेल बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या या बाईकबद्दल
3

ऑल इन वन राइड्ससाठी फक्त हीच एक अडव्हेंचर बाईक ठरेल बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या या बाईकबद्दल

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या
4

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.