(फोटो सौजन्य-AI एआय)
ब्लॅक लूकसोबत मिळणार खास डिझाइन
सिएरा Dark Edition मध्ये Friesian Black एक्सटीरियर कलर देण्यात आला आहे. या काळ्या रंगाला Purple Chrome अॅक्सेंट्सची जोड मिळते, ज्यामुळे SUV चा लूक नियमित सिएरापेक्षा वेगळा दिसतो. केबिनमध्ये Violet Eclipse थीम, ऑल-ब्लॅक लेदरेट सीट्स आणि पर्पल क्रोम डिटेलिंग देण्यात आले आहे. म्हणजेच बाहेरपासून आतपर्यंत संपूर्ण SUV ला डार्क थीममध्ये सजवण्यात आले आहे.
टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
इंजिनमध्ये कोणताही बदल नाही
Dark Edition मध्ये मेकॅनिकल पातळीवर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्हेरिएंटनुसार 1.5-लिटर Revotron पेट्रोल, 1.5-लिटर Kryojet डिझेल आणि 1.5-लिटर Hyperion टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय मिळतात. त्यासोबत मॅन्युअल, DCA आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. Adventure+ L Dark मध्ये पॉवरट्रेनचे सर्वात जास्त पर्याय मिळतात.
किंमत ₹21.59 लाखांपर्यंत
Pure L Dark ची किंमत ₹13.99 लाखांपासून सुरू होते, तर टॉप-स्पेक Accomplished+ Dark ची किंमत ऑटोमॅटिक व्हेरिएंटसाठी ₹21.59 लाखांपर्यंत जाते. Dark Edition मध्ये फीचर्सची स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात आलेली नाही. संबंधित रेग्युलर व्हेरिएंटमध्ये मिळणारी फीचर्सच या एडिशनमध्ये कायम ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ग्राहकांना जास्त फीचर्सपेक्षा खास डिझाइन आणि वेगळ्या लूकसाठी ही आवृत्ती आकर्षक ठरू शकते.
New Maruti Baleno vs Hyundai i20 vs TATA Altroz; तुमच्यासाठी कोणती हॅचबॅक कार ठरेल बेस्ट? जाणून घ्या
टाटा मोटर्सच्या Dark Edition कुटुंबात सिएराचीही आता भर पडली आहे. स्टायलिश ब्लॅक थीम आणि जास्त आकर्षक रोड प्रेझेन्स पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी ही नवीन आवृत्ती सिएरा रेंजमधील वेगळा पर्याय ठरते.






