Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार

टाटा.इव्ही ने बाजारपेठेतील बदलांचे नेतृत्व केले असून नेक्सॉन.इव्ही ही या परिवर्तनाची अग्रदूत ठरली असून, एकूण विक्रीत १,००,००० चा टप्पा पार करणारी ती भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार ठरली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 23, 2025 | 05:42 PM
स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार

स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय रस्त्यांवर २,५०,००० पेक्षा अधिक टाटा इव्ही
  • इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहन सेगमेंटमध्ये अग्रणी
  • मार्केट लीडर म्हणून आपले स्थान अधिक मजबूत
मुंबई : टाटा मोटर्सने आज भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या प्रवासात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारतीय रस्त्यांवर २,५०,००० पेक्षा अधिक टाटा इव्ही वाहनांसह कंपनीने भारतातील वेगाने वाढणाऱ्या इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहन सेगमेंटमध्ये अग्रणी आणि मार्केट लीडर म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.

ही कामगिरी अशा टप्प्यावर साध्य झाली आहे. ज्या वेळी भारताच्या ऑटोमोटिव्ह बाजारात इलेक्ट्रिक मोबिलिटी काठावरून मुख्य प्रवाहात निर्णायकपणे प्रवेश करत आहे. या परिवर्तनात टाटा मोटर्सने सातत्याने मोलाची भूमिका बजावली आहे. २०२० मध्ये नेक्सॉन.इव्ही ही भारतातील पहिली मुख्य प्रवाहातील इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्यापासून टाटा.इव्ही ने बाजारपेठेतील बदलांचे नेतृत्व केले आहे. नेक्सॉन.इव्ही ही या परिवर्तनाची अग्रदूत ठरली असून, एकूण विक्रीत १,००,००० चा टप्पा पार करणारी ती भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार ठरली.

TVS Apache RTX ने जिंकला इंडियन मोटरसायकल ऑफ द इयर 2026 चा प्रतिष्ठित पुरस्कार

आज भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेइकल्सपैकी सुमारे दोन-तृतीयांश म्हणजेच ६६ टक्के वाटा टाटा मोटर्सकडे आहे. ही कामगिरी कंपनीच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाची, मजबूत नेतृत्वाची आणि शाश्वत राष्ट्रनिर्मितीप्रती असलेल्या ठाम वचनबद्धतेची साक्ष देते. व्यक्तिगत मोबिलिटीसाठी भारतातील सर्वात व्यापक इव्ही पोर्टफोलिओ टियागो.इव्ही, पंच.इव्ही, नेक्सॉन.इव्ही, कर्व्ह.इव्ही आणि हॅरियर.इव्ही, तसेच फ्लीट सेगमेंटसाठी एक्स्प्रेस-टी इव्ही यांच्या माध्यमातून टाटा मोटर्स सर्व प्रमुख बॉडी स्टाइल्स आणि किंमत श्रेणींमध्ये इलेक्ट्रिक मोबिलिटी सुलभ करत आहे.

या यशाबद्दल आनंद व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्रा यांनी सांगितले, “२,५०,००० ईव्ही विक्रीचा टप्पा पार करणे हे इलेक्ट्रिक मोबिलिटी कशा वेगाने भारतीय जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे, याचे स्पष्ट द्योतक आहे. आमचे ग्राहक अधिक प्रवास करत आहेत, लांब पल्ल्याचे अंतर पार करत आहेत आणि दैनंदिन वाहन म्हणून इव्ही वर वाढता विश्वास दर्शवत आहेत. २०१८ मध्ये सुरू झालेला आमचा प्रवास केवळ वाहनविक्रीपुरता मर्यादित नव्हता. तर स्वच्छ मोबिलिटीकडे वाटचाल करणाऱ्या भारतासाठी एक सक्षम ईकोसिस्टम उभारण्याचा तो प्रयत्न होता.

सरकारची दूरदृष्टीपूर्ण धोरणे, पुरवठादार व चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर भागीदारांचे भक्कम पाठबळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टाटा.इव्ही ग्राहकांचा विश्वास व उत्साह, या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ही प्रगती शक्य झाली आहे. इव्ही स्वीकार झपाट्याने वाढत असताना, इलेक्ट्रिक मोबिलिटी सर्व सेगमेंटमध्ये सहजप्राप्य करणे, ईकोसिस्टम अधिक मजबूत करणे आणि इंडिया-फर्स्ट तंत्रज्ञान व लोकलायझेशनमध्ये गुंतवणूक करणे ही आमची स्पष्ट वचनबद्धता आहे. या मार्गावर पुढे जात आम्ही भारतातील वाढत्या इव्ही बाजाराचे नेतृत्व करत राहू.”

प्रत्यक्ष वापरातून वाढता विश्वास

टाटा.इव्ही ची मालकी आता केवळ महानगरांपुरती मर्यादित न राहता देशभरातील १,००० पेक्षा अधिक गावे आणि शहरांपर्यंत पोहोचली आहे. टाटा.इव्ही ग्राहकांपैकी सुमारे ८४ टक्के ग्राहक आपली इव्ही हीच प्राथमिक वाहन म्हणून वापरत असून, यामुळे इव्ही ची दैनंदिन वापरातील विश्वासार्हता अधोरेखित होते. याशिवाय, २६ टक्क्यांहून अधिक टाटा.इव्ही ग्राहक हे पहिल्यांदाच कार खरेदी करणारे असून, नव्या ग्राहकांमध्येही इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार वाढत असल्याचे स्पष्ट होते.

वास्तविक वापराच्या आकडेवारीनुसार, टाटा इव्ही मालक सरासरी दरवर्षी सुमारे २०,००० किलोमीटर वाहन चालवतात, तर जवळपास २६,००० ग्राहकांनी १,००,००० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पार केले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाबाबतही ग्राहकांचा आत्मविश्वास वाढत असून, सुमारे ५० टक्के टाटा.इव्ही मालकांनी किमान एकदा तरी ५०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे. टाटा.इव्हीने भारतातील प्रत्येक प्रमुख राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गांवरून यशस्वी प्रवास करत महामार्गांसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे सिद्ध केले आहे.

एकत्रितपणे पाहता, टाटा.इव्हीनी आतापर्यंत सुमारे १२ बिलियन किलोमीटर अंतर पार केले असून, यामुळे अंदाजे १.७ मिलियन टन कार्बनडाय ऑक्साइड उत्सर्जन टाळले गेले आहे आणि सुमारे ८०० मिलियन लीटर इंधनाची बचत झाली आहे. जे पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण योगदान आहे.

मजबूत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे इव्ही प्रवासाला बळ

एका सक्षम आणि व्यापक ईकोसिस्टमच्या माध्यमातून टाटा मोटर्स भारतातील इव्ही क्रांतीला गती देत आहे. होम चार्जिंग, सामुदायिक चार्जिंग आणि भागीदार सीपीओज यांच्या सहाय्याने टाटा.इव्ही नेटवर्कमध्ये सध्या २ लाखांहून अधिक चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध आहेत. टाटा.इव्ही चा चार्जिंग अ‍ॅग्रीगेटर २०,००० पेक्षा अधिक नोंदणीकृत सार्वजनिक चार्जिंग पॉइंट्ससह देशातील सर्वात व्यापक कव्हरेज प्रदान करतो.

याशिवाय, टाटा.इव्हीचे सुपरफास्ट चार्जर्सचे नेटवर्कही देशातील सर्वात मोठ्यांपैकी एक आहे. भारतातील प्रमुख कॉरिडोर्सवर सध्या १०० मेगाचार्जिंग हब्स कार्यरत असून, प्रत्येक हबमध्ये १६ पर्यंत चार्जिंग पॉइंट्स आणि १२० केडब्ल्यू+ चार्जिंग वेग उपलब्ध आहे.

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरतर्फे National Automobile Olympiad चे आयोजन; कर्नाटकमध्ये तब्बल 188…

भारताच्या इव्ही ईकोसिस्टमचे सशक्त लोकलायझेशन

टाटा.इव्ही ईकोसिस्टममध्ये देशभरात इव्ही-समर्पित सर्व्हिस आउटलेट्सचे सर्वात मोठे नेटवर्क आहे, ज्यामध्ये सुमारे १,५०० बे केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी राखीव आहेत. ही सेवा व्यवस्था ५,००० पेक्षा अधिक विशेष प्रशिक्षित इव्ही तंत्रज्ञांद्वारे समर्थित असून, प्रत्येक टाटा.इव्ही वाहनासाठी तज्ज्ञ दर्जाची देखभाल सुनिश्चित करते.

Web Title: Tata ev crosses 2 lakh sales in electric vehicles car new offers on prices detail marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 05:42 PM

Topics:  

  • auto news
  • Electric Vehicle
  • Tata

संबंधित बातम्या

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय
1

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय

Yuzvendra Chahal ने खरेदी केली Luxury Car, BMW Z4 ची किंमत वाचून म्हणाल, ‘एक घर खरेदी होऊ शकतं’, वाचा फिचर्स
2

Yuzvendra Chahal ने खरेदी केली Luxury Car, BMW Z4 ची किंमत वाचून म्हणाल, ‘एक घर खरेदी होऊ शकतं’, वाचा फिचर्स

भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती
3

भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स
4

KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.