टोयोटा किर्लोस्कर मोटर्स
नॅशनल ऑटोमोबाइल ऑलिम्पियाड २०२५चे आयोजन
कर्नाटकमधील बिदादी येथील प्लांटमध्ये यशस्वी आयोजन
सहावी ते बारावीपर्यंतच्या १८८ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
टोयोटा किर्लोस्कर मोटर देशातील एक लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन वाहनांचे उत्पादन करत असते. त्यामध्ये नवनवीन फीचर्स आणि सुविधा ग्राहकांना मिळते. दरम्यान टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने कर्नाटकमधील बिदादी येथील त्यांच्या प्लांटमध्ये १७ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२५ पर्यंत नॅशनल ऑटोमोबाइल ऑलिम्पियाड (एनएओ)चे यशस्वीरित्या आयोजन केले. हा उपक्रम ऑटोमोबाइल स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिल (एएसडीसी) आणि टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (टीटीटीआय) यांच्यामधील सहयोगाला सादर करतो, जो स्किल इंडिया मिशनशी संलग्न आहे. या इव्हेण्टमध्ये भारत व यूएईमधील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या १८८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, ज्यांना दोन्ही देशांमधील ९७० शाळांमधील १,३६,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सुरूवातीच्या समूहामधून शॉर्टलिस्ट करण्यात आले.
जागतिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा ऑटोमोबाइल कौशल्य विकास उपक्रम ‘एनएओ २०२५’चे प्रख्यात प्रमुख अतिथींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, जसे ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष विंकेश गुलाटी आणि सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)चे संचालक डॉ. बिस्वजीत साह. यासह सहभागींसाठी सर्वोत्तम ऑटोमोटिव्ह शिक्षणासाठी स्तर स्थापित झाला. इव्हेण्टमध्ये उद्योगाबाबत मास्टरक्लासेस्, स्पर्धांच्या दोन फेऱ्यांचा समावेश होता, जेथे सहभागींचे ऑटोमोटिव्ह सिस्टम्स, रोबोटिक्स, वेल्डिंग अचूकता, टेक्निकल समस्या निवारण, भावी गतीशीलता संकल्पना यांबाबत असलेल्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली, तसेच उद्योगामधील तज्ञांच्या नेतृत्वांतर्गत प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रे देखील होती.
ग्रँड फिनालेनंतर विजेत्यांची घोषणा करत या इव्हेंटची सांगता झाली, ज्यामध्ये विविध श्रेणींमधील चॅम्पियन्सचा सन्मान करण्यात आला. इयत्ता सहावी ते आठवी या गटामध्ये मध्यप्रदेशातील भोपाळ येथील दि ओरिएण्टल स्कूलमधील अबीर वर्मा याने पहिले स्थान पटकावले, तर गाझियाबाद येथील अॅमिटी इंटरनॅशनल स्कूलमधील आराध्य प्रधान आणि इंदौर येथील न्यू दिगंबर पब्लिक स्कूलमधील दक्ष कुमावत यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. इयत्ता नववी ते दहावी या गटात महाराष्ट्रातील विस्डम वर्ल्ड स्कूलमधील अंचित सहायने पहिले स्थान पटकावले, चेन्नई येथील सर चैतन्य स्कूलमधील अर्जुन अन्नामलाई याने दुसरे स्थान मिळवले, तर राजस्थानातील जयपूर येथील कॅम्ब्रिज कोर्ट वर्ल्ड स्कूलमधील महत्व जैन याने तिसरे स्थान पटकावले. इयत्ता अकरावी ते बारावी या गटात चेन्नई पब्लिक स्कूलमधील निशांत सुधाकर याने पहिले स्थान मिळवले, त्यानंतर दुबई येथील अवर ओन हायस्कूलमधील विधान हरपलानी याने दुसरे स्थान पटकावले आणि टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील पुनित कुमार याने तिसरे स्थान मिळवले.
निवडलेल्या सहभागींमधून टॉप १८८ उत्तम कामगिरी केलेले विद्यार्थी, जवळपास १५० पालक आणि शिक्षकांना टीकेएमचा संपूर्ण अनुभव मिळाला, ज्यामध्ये प्लांटला भेटी, प्रतिष्ठित टीटीटीआयचा एक्स्पोजर, गुरूकुल सुविधेचा अनुभव, उद्योग व्यावसायिकांसोबत नेटवर्क निर्माण करण्याच्या संधी आणि टेस्ट ट्रॅकवर टोयोटा वेईकल्स ड्राइव्ह करण्याचा अनुभव यांचा समावेश होता.
टीकेएमच्या उपक्रमाचे कौतुक करत ऑटोमोटिव्ह स्किल्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष विंकेश गुलाटी म्हणाले, ”नॅशनल ऑटोमोबाइल ऑलिम्पियाडमधून तरूण टॅलेंटला अधिक निपुण करण्याप्रती, तसेच जनरेशन झेडला ऑटोमोटिव्ह क्षेत्राकडे अर्थपूर्ण व भविष्यासाठी सुसज्ज करिअर मार्ग म्हणून पाहण्यास प्रेरित करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. आम्ही तरूण सहभागींना जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म आणि सर्वोत्तम अध्ययन अनुभव देण्यासाठी टीकेएमचे आभार व्यक्त करतो. या सहयोगाने भारतातील ऑटोमोटिव्ह कर्मचारीवर्गाचा पाया मजबूत केला आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह, जिज्ञासू वृत्ती आणि टॅलेंट अत्यंत प्रेरणादायी आहे.”
TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या फायनान्स अँड अॅडमिनिस्ट्रेशनचे कार्यकारी उपाध्यक्ष जी. शंकर म्हणाले, ”आम्ही भारतातील ऑटोमोटिव्ह टॅलेंटच्या भावी पिढीला प्रेरित व निपुण करण्याप्रती कटिबद्ध आहोत. एनएओ २०२५ काही तरूण विचारवंतांमध्ये ऑटोमोटिव्ह उत्कृष्टतेप्रती आवड जागृत करण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे, ज्यामुळे ते शिक्षण घेण्यासेाबत नाविन्यता आणू शकतील आणि गतीशीलतेच्या भविष्याला आकार देऊ शकतील. या उपक्रमाच्या माध्यमातून आमचा विद्यार्थ्यांना अनुभवात्मक ज्ञान व जागतिक दर्जावरील कामकाज पद्धतींचा अनुभव देण्याचा, तसेच भारत सरकारच्या स्किल इंडिया मिशनप्रती योगदान देण्याचा मनसुबा आहे.”






