Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Nexon Camo: सणासुदीच्या काळात टाटाचा धमाका; नवीन नेक्सॉन कॅमो झाली लाँच!

टाटा मोटर्सने ९.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत नवीन 'नेक्सॉन कॅमो' लाँच केली आहे. मुन्नार मिस्ट आणि कूर्ग क्लाउड या प्रीमियम रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या कारमध्ये ADAS, ३६०° कॅमेरा, पॅनोरामिक सनरुफ आणि डिजिटल कॉकपीट यांसारखे प्रगत फीचर्स समाविष्ट आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 07, 2026 | 06:19 PM
Tata Nexon Camo: सणासुदीच्या काळात टाटाचा धमाका; नवीन नेक्सॉन कॅमो झाली लाँच!
Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्सने ९.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली नवीन ‘नेक्सॉन कॅमो’ बाजारात लाँच केली आहे.
  • ही कार मुन्नार मिस्ट आणि कूर्ग क्लाउड या दोन आकर्षक आणि प्रीमियम रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.
  • यात ADAS, ३६०-डिग्री कॅमेरा, व्हॉईस-असिस्टेड पॅनोरामिक सनरुफ आणि अल्ट्रा व्ह्यू ट्विन एचडी डिजिटल कॉकपीट असे हाय-टेक फीचर्स मिळतात.

नेक्सॉनचे एक दशक आणि ११ लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास साजरा करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स (टीएमपीव्ही) या भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज ९.९९ लाख रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या सुरुवातीच्या किमतीत नेक्सॉन कॅमोच्या लाँचची घोषणा केली. मुन्नार मिस्ट आणि कूर्ग क्लाउड या दोन प्रिमियम रंगांमध्ये उपलब्ध असलेली नेक्सॉन कॅमो हर्मनTM द्वारे अल्ट्रा व्ह्यू ट्विन एचडी डिजिटल कॉकपीट ३१.२४ सेमी (१२.३-इंच) इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ३६०° कॅमेरा सराउंड व्ह्यू सिस्टमचा भाग म्हणून एम्बेडेड नेव्हिगेशन व एकात्मिक डॅशकॅम रेकॉर्डरसह हर्मनTM द्वारे २६.०३ सेमी (१०.२५-इंच) डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानासह आकर्षक स्टायलिंग एकत्र आणते. या अतिरिक्त वैशिष्ट्यांना पूरक म्हणून या वेईकलमध्ये एडीएएस, व्हॉईस-असिस्टेड पॅनोरामिक सनरुफ, व्हेंटिलेटेड लेदरेट सीट्स आणि जेबीएल ऑडिओ सिस्टम यांसारख्या प्रिमियम आरामदायी, सुरक्षितता आणि इंटेलिजंट तंत्रज्ञान वैशिष्ट्यांचा समावेश आहे. विविध ट्रान्समिशन पर्यायांसह पेट्रोल, डिझेल आणि आयसीएनजी पॉवरट्रेन्समध्ये उपलब्ध असलेली नेक्सॉन कॅमो प्रत्येक प्रकारच्या एसयूव्ही ग्राहकांसाठी विशिष्ट मालकीहक्काचा प्रस्ताव सादर करते.

गेल्या काही वर्षांत, टाटा नेक्सॉनने ग्राहकांच्या बदलत्या आकांक्षांनुसार सतत विकसित होत भारतातील सर्वात यशस्वी आणि आयकॉनिक एसयूव्ही ब्रँड म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे. सुरक्षितता, प्रगत तंत्रज्ञान आणि टर्बोचार्ज्ड कार्यक्षमता सर्वांपर्यंत पोहोचवण्यापासून ते अद्वितीय पॉवरट्रेन पर्याय उपलब्ध करून देण्यापर्यंत, नेक्सॉनने सातत्याने कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागातील अपेक्षांना नव्या उंचीवर नेले आहे आणि नाविन्यता व ग्राहकांच्या विश्वासाचा दृढ वारसा तयार केला आहे. आगामी सणासुदीच्या काळानिमित्त लाँच करण्यात आलेली नेक्सॉन कॅमो सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वैविध्यतेसंदर्भात नेक्सॉनच्या सिद्ध झालेल्या ताकदीसह विशेष स्टायलिंग, वर्धित तंत्रज्ञान आणि प्रिमियम नवीन रंगांचे एकत्रीकरण करून त्याच तत्त्वज्ञानावर पुढे जाते. पेट्रोल, डिझेल आणि आयसीएनजी पॉवरट्रेन्समधील उपलब्धतेसह, तसेच अनेक ट्रान्समिशन पर्यायांसह, प्रत्येक ग्राहकासाठी आणि प्रत्येक ड्रायव्हिंग पसंतीसाठी नेक्सॉन कॅमो उपलब्ध आहे.

गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट! नो ड्रायव्हींग लायसन्स! नो टोल! नो इन्शुरंस! ही आहे भारतातील नो झंझट स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर!

या लाँचबाबत मत व्यक्त करत, टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, “एका दशकापूर्वी लाँच झाल्यापासून, नेक्सॉनने १.१ दशलक्षांहून अधिक कुटुंबांना आरामदायी, सुरक्षित आणि आनंददायी प्रवास प्रदान केला आहे, आणि रस्त्यांवर अद्वितीय उपस्थिती असलेली भारतातील सर्वात आयकॉनिक नेमप्लेट बनली आहे. हे यश सुरक्षितता, तंत्रज्ञान आणि डिझाइनमध्ये सातत्याने दर्जा उंचावत ठेवण्यावर आधारित आहे, तसेच या नाविन्यपूर्ण गोष्टी ग्राहकांच्या मोठ्या वर्गासाठी सुलभ ठेवल्या आहेत. नेक्सॉन कॅमो ही भावना दोन आकर्षक नवीन रंग आणि वर्धित तंत्रज्ञानाच्या पॅकेजसह पुढे घेऊन जाते, जे या नवीन वेईकलला आतापर्यंतची सर्वात विशिष्ट नेक्सॉन बनवतात. सणासुदीच्या काळासाठी ही उत्तम वेळ आहे, यामुळे ग्राहकांना नेक्सॉन खरेदी करण्याचे आणखी एक महत्त्वपूर्ण कारण मिळते.”

नेक्सॉनला कॉम्पॅक्ट एसयूव्ही विभागाचा मापदंड बनवणाऱ्या त्याच यशस्वी पायावर डिझाइन केलेली नेक्सॉन कॅमो विशेष डिझाइन घटक, प्रिमियम तंत्रज्ञान आणि विशिष्ट वैशिष्ट्यांसह मालकीहक्काचा अनुभव अधिक उत्साहवर्धक करते. ही नवीन वेईकल ग्राहकांना आपली एसयूव्ही इतरांपेक्षा वेगळी दिसावी असे वाटते त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यांनी परिपूर्ण पॅकेज तयार करते.

या गाडीच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये अल्ट्रा व्ह्यू ट्विन एचडी डिजिटल कॉकपीट समाविष्ट आहे, ज्यामध्ये हर्मन™ द्वारे ३१.२४ सेमी (१२.३-इंच) इन्फोटेनमेंट सिस्टम आणि एम्बेडेड नेव्हिगेशनसह २६.०३ सेमी (१०.२५-इंच) डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. गाडीच्या केबिनला मोकळा आणि हवेशीर अनुभव देण्यासाठी व्हॉईस-असिस्टेड पॅनोरामिक सनरुफ आणि सर्व हवामान परिस्थितीत उत्कृष्ट आरामासाठी व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स उपलब्ध आहेत. मनोरंजनासाठी सबवुफरसह ९-स्पीकर जेबीएल ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे, तर सुरक्षेच्या दृष्टीने ३६०° सराउंड व्ह्यू कॅमेरा, ब्लाइंड स्पॉट व्ह्यू मॉनिटर आणि इम्पॅक्ट-इव्हेंट प्रोटेक्शन व २५६ जीबीपर्यंत स्टोरेज सपोर्टसह एकीकृत डॅश कॅम रेकॉर्डर समाविष्ट आहे.

Honda Unicorn vs Pulsar 150: रोजच्या वापरासाठी आणि रिसेलसाठी कोणती बाइक ठरेल तुमच्यासाठी भारी? जाणून घ्या

डिझाइनच्या बाबतीत, दोन्ही फेंडर्सवर सिग्नेचर कॅमो बॅजिंग आणि फ्रंट सीट हेडरेस्टवर कॅमो-थीम असलेली पर्फोरेशन या गाडीला एक विशेष ओळख देतात. सुरक्षेसाठी ६ एअरबॅग्ज, ईएसपी (इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम) आणि भारतीय ड्रायव्हिंग परिस्थितीनुसार कॅलिब्रेट केलेल्या ७ इंटेलिजंट ड्रायव्हर असिस्टन्स फंक्शन्ससह एडीएएस (ADAS) देण्यात आले आहे. ही कार तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे: १२० पीएस पॉवर आणि १७० एनएम टॉर्क देणारा १.२ लीटर टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन, ११४.५ पीएस पॉवर आणि २६० एनएम टॉर्क देणारा १.५ लीटर टर्बोचार्ज्ड रेव्होटॉर्क डिझेल इंजिन, आणि ट्विन सिलेंडर तंत्रज्ञानासह या सेगमेंटमधील एकमेव १.२ लीटर टर्बोचार्ज्ड आयसीएनजी इंजिन जो १०० पीएस पॉवर आणि १७० एनएम टॉर्क प्रदान करतो.

नेक्सॉन कॅमो दोन खास आणि आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. मुन्नार मिस्ट ही अद्वितीय ड्युअल-टोन व्यक्तिमत्त्व असलेली एक डायनॅमिक गडद हिरवी रंगछटा आहे. सावलीत असताना ही छटा अत्याधुनिक राखाडी रंगासारखी दिसते, तर सूर्यप्रकाशात तिच्यातील आकर्षक ग्रीनटोन आणि सूक्ष्म सोनेरी छटा स्पष्टपणे उभरून येते; यामुळे गाडीच्या सभोवतालच्या वातावरणानुसार नेक्सॉन कॅमोला एक विशिष्ट आणि बदलणारी उपस्थिती मिळते. दुसरा पर्याय कूर्ग क्लाउड हा समकालीन राखाडी-सोनेरी फिनिशचा रंग असून, त्यात अत्याधुनिकता आणि प्रबळ विशिष्टतेचे सुंदर संयोजन पाहायला मिळते. या रंगातील सूक्ष्म मेटॅलिक हायलाइट्स त्यात सखोलता आणि हालचालींची भावना निर्माण करतात, ज्यामुळे गाडीला एक शांत, सलीकेदार आणि स्पष्टपणे प्रीमियम लुक मिळतो. नेक्सॉन कॅमोच्या विविध व्हेरिएंट्सच्या एक्स-शोरूम दिल्लीतील किंमती इंधन आणि ट्रान्समिशनच्या पर्यायांनुसार ठरवण्यात आल्या आहेत.

पेट्रोल व्हेरिएंट्स मध्ये ‘क्रिएटिव्ह कॅमो’ची किंमत एमटीसाठी ९.९९ लाख रुपये, एएमटीसाठी ११.०९ लाख रुपये आणि डीसीएसाठी ११.५९ लाख रुपये आहे. ‘क्रिएटिव्ह + एस कॅमो’ एमटीमध्ये १०.६४ लाख रुपये आणि एएमटीमध्ये ११.३४ लाख रुपये किमतीत उपलब्ध आहे. तसेच, ‘क्रिएटिव्ह + पीएस कॅमो’ एमटीची किंमत ११.६४ लाख रुपये आणि डीसीएची किंमत १२.७९ लाख रुपये आहे. उच्च व्हेरिएंट्सचा विचार केल्यास ‘फिअरलेस + पीएस कॅमो’ एमटी १२.५९ लाख रुपये किमतीत येतो, तर टॉप-एंड ‘फिअरलेस + ए पीएस कॅमो’ डीसीए ट्रान्समिशनसह १३.९४ लाख रुपये किमतीत उपलब्ध आहे.

Web Title: Tata nexon camo launched in india price features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा
1

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
2

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
4

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.