Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Motors : टाटा मोटर्सची मोठी घोषणा; सनरूफसह नेक्सॉन Pure+ PS व्हेरिएंट बाजारात दाखल

Tata Motors India: टाटा मोटर्सने नेक्सॉन Pure+ PS व्हेरिएंट लॉन्च करत 10 लाख ग्राहकांचा टप्पा पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला आहे. या SUV मध्ये 10 लाखांखाली पॅनोरामिक सनरूफसारखे प्रीमियम फीचर देण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 10, 2026 | 07:02 PM
टाटा मोटर्सची मोठी घोषणा; सनरूफसह नेक्सॉन Pure+ PS व्हेरिएंट बाजारात दाखल

टाटा मोटर्सची मोठी घोषणा; सनरूफसह नेक्सॉन Pure+ PS व्हेरिएंट बाजारात दाखल

Follow Us
Follow Us:

Tata Motors India : भारतातील रस्त्यांवर धावणाऱ्या १ दशलक्ष टाटा नेक्सॉनचा टप्पा गाठल्याचा आनंद साजरा करताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स (टीएमपीव्‍ही) या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज नेक्सॉन प्‍युअर+ पीएसच्‍या लाँचची घोषणा केली. या कारची किंमत ९.५९ लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते. उद्योगातील पहिल्या अशा क्रांतिकारी पाऊलासह टाटा नेक्सॉन १० लाख रूपयांच्या आत पॅनोरामिक सनरूफ देणारी भारतातील एकमेव कार बनली आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या पसंतीचे हे प्रगत वैशिष्ट्य आता अधिकाधिक ग्राहकांच्‍या आवाक्यात आले आहे. कंपनीच्या मल्टी पॉवरट्रेन धोरणाला पुढे नेत नेक्सॉन प्‍युअर+ पीएस ही भारतातील सर्वाधिक इंधन-क्षम डिझेल इंजिन (एमटी व एएमटी) आणि पेट्रोल (एमटी व एएमटी), तसेच ट्विन सिलेंडर आयसीएनजी (एमटी)मध्ये या सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली १.२-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनसह उपलब्ध असेल.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या ताफ्यात नवे बदल! मुख्यमंत्र्यांसाठी आधुनिक ‘बुलेटप्रूफ’ गाडी खरेदी होणार; जुन्या वाहनांचा लिलाव

या लाँचप्रसंगी मत व्‍यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, “आर्थिक वर्ष २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आणि आर्थिक वर्ष २०२६ मधील भारतातील नंबर १ एसयूव्‍ही म्हणून नेक्सॉन ही देशभरातील ग्राहकांची पहिली पसंती राहिली आहे. १० लाखांहून अधिक कुटुंबांचा विश्वास असलेल्या नेक्सॉनने नेहमी प्रत्येक किंमतीत ग्राहकांना सर्वोत्कृष्ट पॅकेज देण्याचा प्रयत्‍न केला आहे. १० लाख रूपयांच्या आत भारतातील पहिले पॅनोरामिक सनरूफ असलेल्या प्‍युअर+ पीएस व्‍हेरिएण्‍टच्‍या सादरीकरणामुळे याचे मूल्य अधिक वाढले आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक अशा चारही प्रकारच्या पॉवरट्रेन देणारी भारतातील एकमेव एसयूव्‍ही म्हणून नेक्सॉन ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करत राहील, तसेच कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही सेगमेंटमध्‍ये आपले अपील अधिक प्रबळ करेल.”

सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेल्या नेक्सॉन प्‍युअर+ पीएस बद्दल माहिती

नेक्सॉन ही तिच्या विशिष्ट कूप-सारख्‍या डिझाइनमुळे, उत्कृष्ट सुरक्षा मानांकनांमुळे आणि एक परिपूर्ण पॅकेज असल्यामुळे भारतातील सर्वात आवडती एसयूव्‍ही राहिली आहे. नेक्सॉन प्‍युअर+ पीएस आता या लोकप्रियतेला एका नवीन उंचीवर घेऊन जात आहे. आरामदायीपणा, तंत्रज्ञान आणि ग्राहकांची पसंती यांचा सुरेख संगम साधून ही कार दैनंदिन ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक सुखद करण्यासाठी एक अत्यंत फायदेशीर आणि आकर्षक पर्याय ठरते.

या वाहनामध्ये अनेक सर्वोत्तम वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला असून, १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत भारतातील पहिले ‘वॉईस-असिस्टेड पॅनोरॅमिक सनरूफ’ हे याचे मुख्य आकर्षण आहे, ज्यामुळे केबिनला अधिक प्रीमियम आणि मोकळा अनुभव मिळतो. मनोरंजनासाठी यात २६.०३ सेमी हार्मन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली असून ती वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेला सपोर्ट करते. तसेच, उत्कृष्ट ऑडिओ अनुभवासाठी यात ६-स्पीकर साउंड सिस्टमची जोड देण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, यात मार्गदर्शन आणि सेन्सर्ससह एचडी रिअर-व्ह्यू कॅमेरा, अधिक स्पष्ट दृश्यमानतेसाठी ऑटो एलईडी हेडलॅम्प्स आणि बदलत्या हवामानानुसार सोयीसाठी रेन-सेन्सिंग फ्रंट व रिअर वायपर्स देण्यात आले आहेत. लांबचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी यात क्रूझ कंट्रोलची सुविधा आहे, तर ऑटो फोल्डसह इलेक्ट्रिक ओआरव्हीएम व्यावहारिक सुलभता प्रदान करतात. याशिवाय, वाहनाला आधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण लूक देण्यासाठी मागील बाजूस आकर्षक एलईडी टेल लॅम्प्स बसवण्यात आले आहेत.

या मॉडेलच्या विविध व्‍हेरिएण्‍ट्ससाठी आकर्षक किमती निश्चित करण्यात आल्या असून, पेट्रोल एमटी व्‍हेरिएण्‍टची किंमत ९.५९ लाख रुपये (एक्‍स-शोरूम, दिल्‍ली) पासून सुरू होते. पेट्रोल एएमटी व्‍हेरिएण्‍टसाठी ग्राहकांना १०.१४ लाख रुपये मोजावे लागतील, तर ट्विन सिलिंडर आयसीएनजी एमटी पर्यायाची किंमत १०.३९ लाख रुपये इतकी आहे. डिझेल इंजिन प्रेमींसाठी, डिझेल एमटी व्‍हेरिएण्‍ट १०.५४ लाख रुपयांमध्ये उपलब्ध असून, यातील अधिक सुलभ डिझेल एएमटी व्‍हेरिएण्‍टची किंमत ११.१९ लाख रुपये आहे. या सर्व किमती दिल्लीतील एक्स-शोरूम दरांनुसार आहेत.

MG 7 Seater Cars: मार्केटमध्ये खळबळ! MG ची 7-सीटर SUV बंपर ऑफरमध्ये; तब्बल 4 लाखांनी स्वस्त झाली कार

Web Title: Tata nexon pure plus ps launch panoramic sunroof under 10 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • automobile news
  • tata motors

संबंधित बातम्या

टाटा सफारी EV मध्ये मिळणार Triple-Screen डॅशबोर्ड; 65 आणि 75 kWh बॅटरीचा पर्याय
1

टाटा सफारी EV मध्ये मिळणार Triple-Screen डॅशबोर्ड; 65 आणि 75 kWh बॅटरीचा पर्याय

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये  Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच
3

Mahindra xuv 3xo revx edge: SUV प्रेमींसाठी खुशखबर! 10 लाखांच्या बजेटमध्ये Mahindra XUV 3XOचं नवं व्हेरियंट लाँच

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क
4

Maruti Suzuki चा मोठा धमाका! Swift, Dzire आणि Baleno आता CNG Automatic; किंमत-मायलेज पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.