Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या आठवड्यात Tata Punch Facelift लाँच होणार, ‘हा’ असेल महत्वाचा बदल

टाटा मोटर्स या आठवड्यात Tata Punch चे Facelift व्हर्जन लाँच करणार आहे. चला या नवीन कारच्या मॉडेलबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 11, 2026 | 04:19 PM
फोटो सौजन्य: @BunnyPunia/ X.com

फोटो सौजन्य: @BunnyPunia/ X.com

Follow Us
Follow Us:
  • टाटा मोटर्स देशातील आघाडीची ऑटो कंपनी
  • टाटा पंच ही कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही
  • 13 जानेवारी 2026 रोजी टाटा पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन होणार लाँच
भारतीय ऑटो इंडस्ट्रीमधील सर्वात महत्वाची आणि लोकप्रिय ऑटो कंपनी Tata Motors. टाटाने नेहमीच मार्केटमध्ये ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर केल्या आहेत. त्यामुळेच तर बाजारात टाटाच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Tata Punch.

भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेली टाटा मोटर्स अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनी लवकरच कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Tata Punch Facelift लाँच करण्याची तयारी करत आहे. या एसयूव्हीमध्ये देण्यात येणारी फीचर्स, याचे पॉवरफुल इंजिन आणि अपेक्षित किमतीबद्दल जाणून घेऊयात.

Tata Motors ची सर्वात किफायतशीर कार! फक्त 1 लाखाचे डाउन पेमेंट आणि EMI दहा हजारांपेक्षा कमी

फीचर्स कसे असतील?

एसयूव्हीच्या व्हेरिएंट्ससोबतच तिच्या काही प्रमुख फीचर्सची माहिती समोर आली आहे. अपडेटनंतर या एसयूव्हीमध्ये नवीन स्टिअरिंग व्हील, 360 डिग्री कॅमेरा, कनेक्टेड टेल लाइट, ऑटो-डिमिंग IRVM, कॉर्नरिंग फंक्शनसह ABS, LED फॉग लॅम्प, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच ब्लाइंड स्पॉट मॉनिटर यासारखे आधुनिक फीचर्स देण्यात येणार आहेत.

इंजिन

मिळालेल्या माहितीनुसार, या एसयूव्हीच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.2 लीटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येऊ शकते. हेच इंजिन टाटा अल्ट्रोज ते पंच या मॉडेल्समध्ये ऑफर केले जाऊ शकते. या इंजिनमधून 118 BHP पॉवर आणि 170 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण होतो.

व्हेरिएंट्सची माहिती

टाटा मोटर्सकडून पंच फेसलिफ्टच्या लाँचपूर्वीच त्याच्या व्हेरिएंट्स आणि फीचर्सची माहिती उघड झाली आहे. कंपनीकडून ही एसयूव्ही एकूण 6 व्हेरिएंट्समध्ये सादर केली जाणार आहे. यामध्ये Pure, Pure+, Adventure, Adventure+, Accomplished आणि Accomplished+ या व्हेरिएंट्सचा समावेश असेल.

ग्राहकांनी Mahindra च्या ‘या’ Electric SUV ला दिला डच्चू! 4 लाखांचा डिस्काउंट देऊनही केवळ 59 युनिट्सची विक्री

कधी होणार लाँच?

निर्मात्याने आधीच स्पष्ट केले आहे की या एसयूव्हीचा फेसलिफ्ट भारतीय बाजारात अधिकृतपणे 13 जानेवारी 2026 रोजी लाँच केली जाणार आहे.

किंमत

टाटा मोटर्स सध्या पंचला 5.50 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत ऑफर करते. त्याच्या टॉप-स्पेक व्हेरिएंटची किंमत 9.30 लाख (एक्स-शोरूम) आहे. फेसलिफ्टची किंमत 6 लाख ते 10 लाख (एक्स-शोरूम) च्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच होण्याची अपेक्षा आहे.

स्पर्धा

टाटा कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये पंचची ऑफर देते. त्याचे फेसलिफ्ट Hyundai Exter,Renault Kiger, Nissan Magnite, आणि Maruti Suzuki Ignis सारख्या एसयूव्हीशी देखील स्पर्धा करते.

 

Web Title: Tata punch facelift launching on 13 january 2026 know about features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors
  • tata punch

संबंधित बातम्या

या आहेत जगातल्या सर्वात महागड्या नंबर प्लेट्स! किंमत ऐकून व्हाल थक्क!
1

या आहेत जगातल्या सर्वात महागड्या नंबर प्लेट्स! किंमत ऐकून व्हाल थक्क!

ऑटोमोबाईल क्षेत्राचा देशसुरक्षेसाठी वापर! भारतीय सैन्यदलात वापरली जाणारी ही वाहने तुम्हाला माहित आहेत का?
2

ऑटोमोबाईल क्षेत्राचा देशसुरक्षेसाठी वापर! भारतीय सैन्यदलात वापरली जाणारी ही वाहने तुम्हाला माहित आहेत का?

टोयोटा ने सादर केली नवी इनोव्हा क्रिस्टा – प्रीमियम स्टायलिंग आणि नवे डिझाइन एलिमेंट्ससह
3

टोयोटा ने सादर केली नवी इनोव्हा क्रिस्टा – प्रीमियम स्टायलिंग आणि नवे डिझाइन एलिमेंट्ससह

टाटा नॅनो चा फसलेला कार प्रयोग! टाटा नॅनो भारतीय बाजारात का अयशस्वी ठरली?
4

टाटा नॅनो चा फसलेला कार प्रयोग! टाटा नॅनो भारतीय बाजारात का अयशस्वी ठरली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.