फोटो सौजन्य: Pinterest
एकीकडे इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या मागणीत वाढ होत असतानाच मात्र दुसरीकडे Mahindra च्या एका ई-एसयूव्हीला ग्राहकांनी डच्चू दिला आहे. ही एसयूव्ही म्हणजे XUV 400.
भारतीय ग्राहकांमध्ये महिंद्रा कार खूप लोकप्रिय आहेत. डिसेंबर 2025मध्ये, स्कॉर्पिओच्या जवळपास 16000 युनिट्सची विक्री झाली. त्याचप्रमाणे, बोलेनोने 10 हजाराहून अधिक ग्राहक मिळवले. मात्र, याच काळात, कंपनीची लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही, XUV 400 ने कंपनीला निराश केले आहे.
Fortuner च्या पाठोपाठ आता Toyota ची ‘ही’ कार देखील महागली! 48,000 रुपयांपर्यंत केली वाढ
गेल्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2025 महिंद्रा XUV 400 ला फक्त 59 नवीन ग्राहक मिळाले. या काळात, XUV 400 च्या विक्रीत वर्षानुवर्षे 95 टक्क्यांनी घट झाली. फक्त 1 वर्षापूर्वी, डिसेंबर 2024 मध्ये, हा आकडा 1,296 युनिट्स होता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या महिन्यात, संपूर्ण EV च्या संपूर्ण रेंजवर कंपनीकडून 4 लाखांपर्यंतची सूट उपलब्ध होती. तरी देखील विक्री ढासळली.
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, महिंद्रा XUV400 EV ग्राहकांना दोन बॅटरी पॅकचा पर्याय देते. पहिला बॅटरी पॅक 34.5kWh बॅटरीने सुसज्ज आहे, तर दुसरा 39.4kWh बॅटरीने सुसज्ज आहे. कारचे इंजिन एका इलेक्ट्रिक मोटरने चालवले जाते जे 150bhp कमाल पॉवर आणि 310Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. 34.5kWh बॅटरी पॅकची पूर्ण चार्जवर 375km ची प्रमाणित रेंज आहे, तर 39.4kWh बॅटरी पॅकची पूर्ण चार्जवर 456km ची प्रमाणित रेंज आहे.
‘या’ कारचा मार्केटमध्ये खास Aura! फक्त करा 1 लाखाचं डाउन पेमेंट अन् दरमहा भरा 10000 पेक्षा कमी EMI
या इलेक्ट्रिक SUV च्या इंटिरिअरमध्ये ग्राहकांना 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन एसी, सनरूफ आणि वायरलेस फोन चार्जिंगसारखी आधुनिक फीचर्स मिळतात. सेफ्टीसाठी कारमध्ये 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि रिअर पार्किंग कॅमेरासारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.
महिंद्रा XUV400 EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होत असून टॉप व्हेरिएंटमध्ये ती 17.69 लाख रुपयांपर्यंत जाते.






