Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TATA Punch vs Hyundai Exter: पॉवर, इंजिन आणि फीचर्सच्या बाबतीत कोणती SUV पैसा वसूल?

भारतात एसयूव्ही वाहनांना इतर वाहनांच्या तुलनेत जास्त मागणी मिळतेय. याच सेगमेंटमधील दोन लोकप्रिय कार म्हणजे टाटा पंच आणि ह्युंदाई एक्स्टर.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 22, 2026 | 05:22 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी
  • TATA Punch आणि Hyundai Exter दोन्ही ग्राहकांच्या आवडत्या कार्स
  • जाणून घ्या दोन्ही कार्सच्या इंजिनबद्दलची माहिती
कार खरेदी करताना ग्राहक नेहमीच SUV वाहनांना जास्त प्राधान्य देत असतात. म्हणूनच तर 2025 मध्ये सर्वाधिक विक्री एसयूव्ही वाहनांची झाली. आता हाच ट्रेंड 2026 मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. या सेगमेंटमध्ये आपल्याला अनेक लोकप्रिय कार पाहायला मिळतात. अशाच दोन लोकप्रिय मायक्रो एसयूव्ही म्हणजे TATA Punch आणि Hyundai Exter.

भारताच्या मायक्रो-SUV सेगमेंटमधील स्पर्धा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चालली आहे. नुकतीच 2026 Hyundai Exter Facelift ने बाजारात पदार्पण केले आहे. मात्र, नवीन एक्स्टरच्या डिझाइनमध्ये कोणतेही लक्षणीय बदल करण्यात आलेले नाहीत. मग या दोन कार्सपैकी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता ठरेल? चला याबद्दल जाणून घेऊयात.

2026 Mahindra Thar Facelift ची टेस्टिंग सुरु! एक्सटिरिअरची मिळाली माहिती

इंजिन आणि पॉवर

या दोन्ही SUVs मध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, तरीही त्यांच्या परफॉर्मन्समध्ये काही फरक दिसून येतो. ह्युंदाई एक्स्टरचे इंजिन साधारणपणे 83 bhp इतकी पॉवर निर्माण करते, तर टाटा पंचचे इंजिन त्यापेक्षा थोडे अधिक शक्तिशाली असून, ते 87 bhp इतकी पॉवर निर्माण करते. याव्यतिरिक्त, टाटा पंचच्या ग्राहकांसाठी टर्बो-पेट्रोल इंजिनचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

लूक आणि डिझाइन

या नवीन ‘फेसलिफ्ट’ मॉडेलला आधुनिक लूक प्रदान करण्यात आला आहे. यात पूर्वीपेक्षा अधिक रुंद ‘ग्रिल’ असून, त्यासोबतच आकर्षक अशा ‘सिल्व्हर ट्रिम’चा समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, ‘Exter’ हे बॅजिंग बंपरवरून हलवून, DRLs च्या जवळ म्हणजेच थोड्या उंचावर लावण्यात आले आहे. या मॉडेलने आपली वैशिष्ट्यपूर्ण, दणकट आणि बॉक्सी रचना मात्र कायम राखली आहे.

सोपा साधा हिशोब! Maruti Suzuki ची नवखी SUV फक्त 16 हजारांच्या EMI वर होईल तुमची; जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन

इंटीरियर आणि फीचर्स

फीचर्सच्या बाबतीत Tata Punch थोडी पुढे असल्याचे दिसते. यात 10.25-इंचची मोठी टचस्क्रीन, वायरलेस कनेक्टिव्हिटी, रियर आर्मरेस्ट आणि अधिक USB पोर्ट्ससारखे फीचर्स दिले आहेत. याचे केबिन प्रीमियम फील देते. कार्बन-ब्लॅक 3D डिझाइनसोबत नेव्ही ब्लू आणि ग्रे कलर थीममुळे इंटिरिअर अधिक आकर्षक वाटते.

सेफ्टी आणि स्पेस

Hyundai Exter मध्ये ESC, हिल स्टार्ट असिस्ट आणि सेंट्रल लॉकिंगसारखी सेफ्टी फीचर्स मिळतात. सामान ठेवण्यासाठी यात 391 लिटरचे मोठे बूट स्पेस उपलब्ध आहे. दुसरीकडे, Tata Punch ला 5-स्टार भारत NCAP रेटिंग मिळाल्यामुळे सेफ्टीमध्ये ती आघाडीवर आहे. यात 360-डिग्री कॅमेरा आणि ॲडव्हान्स ड्रायव्हिंग एड्सही दिले आहेत. मात्र, याचे बूट स्पेस 366 लिटर असून ते Exter पेक्षा कमी आहे.

किंमत किती?

2026 मधील Hyundai Exter ची किंमत सुमारे 5.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, तर टॉप मॉडेलची किंमत 9.42 लाख रुपयांपर्यंत जाते. Tata Punch ची सुरुवातीची किंमत 5.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) असून टॉप व्हेरिएंटसाठी सुमारे 10.54 लाख रुपये (एक्स-शोरूम) मोजावे लागतात.

Web Title: Tata punch vs hyundai exter which compact suv is best in engine power and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • SUV
  • tata punch

संबंधित बातम्या

अमेरिका पाकिस्तान नाहीतर ‘या’ देशात मिळते सगळ्यात महाग पेट्रोल, किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का
1

अमेरिका पाकिस्तान नाहीतर ‘या’ देशात मिळते सगळ्यात महाग पेट्रोल, किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का

Hero Passion+ Disc ची दमदार एन्ट्री! स्टायलिश लूक आणि दमदार मायलेजने वेधलं लक्ष… खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्व माहिती
2

Hero Passion+ Disc ची दमदार एन्ट्री! स्टायलिश लूक आणि दमदार मायलेजने वेधलं लक्ष… खरेदीपूर्वी जाणून घ्या सर्व माहिती

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे
3

महिंद्रा बोलेरो भारताच्या पर्यटन क्षेत्राच्या बाजारात एवढी यशस्वी कशी ठरली? जाणून घ्या सविस्तरपणे

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!
4

बजाज ऑटो दक्षिण भारतात उभारणार नवे प्लांट! तामिळनाडू आणि तेलंगणा पहिल्या नंबरवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.