
फोटो सौजन्य: Pinterest
नुकतेच टाटा सिएरा ईव्ही टेस्टिंग करताना दिसली, ज्यामुळे त्यात एक महत्त्वाचा बदल दिसून आला. या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये स्वतंत्र रियर सस्पेंशन दिले गेले आहे, ज्यामुळे ती पेट्रोल आणि डिझेल व्हर्जन्सपेक्षा वेगळी दिसते. हे फिचर सामान्यतः फक्त प्रीमियम वाहनांमध्येच दिसून येते.
KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स
कारच्या स्पाय फोटोमधून स्पष्टपणे दिसून येते की टाटा सिएरा ईव्हीमध्ये स्वतंत्र रियर सस्पेंशन सेटअप आहे. या सेगमेंटमधील एसयूव्हीमध्ये सामान्यतः खर्च कमी ठेवण्यासाठी एक साधा बीम एक्सल असतो. मात्र, स्वतंत्र रियर सस्पेंशन वाहनाच्या राइडची गुणवत्ता चांगली सुधारते. तसेच, यामुळे खडबडीत रस्त्यांवरील धक्के कमी होतात आणि कॉर्नरिंग दरम्यान अधिक स्टेबिलिटी मिळते, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या ड्राईव्ह अधिक आरामदायी होतात.
टेस्टिंग दरम्यान आढळलेल्या वाहनात एक्झॉस्ट पाईप नाही, ज्यामुळे हे स्पष्ट होते की ते इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. खाली दिसणारा नवीन सस्पेंशन लेआउट पुष्टी करतो की टाटा मोटर्स सिएरा ईव्हीला पूर्णपणे एका नवीन लेव्हलवर घेऊन जात आहे.
Maruti Suzuki चा प्लॅन ठरला! 2029 पर्यंत नवीन हायब्रीड MPV लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स
टाटा सिएरा ईव्हीमध्ये Harrier EV प्रमाणेच 65 किलोवॅट आणि 75 किलोवॅट क्षमतेचे बॅटरी पॅक असण्याची अपेक्षा आहे. ही टू-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्ह दोन्ही पर्यायांमध्ये दिली जाऊ शकते. मात्र, जास्त रेंज देण्यासाठी, सिएरा ईव्हीचे पॉवर आउटपुट हॅरियर ईव्हीपेक्षा थोडे कमी असू शकते.
टाटा सिएरा ईव्हीची सुरुवातीची किंमत 18 लाखांपासून सुरु होण्याची अपेक्षा आहे. ती आयसीई व्हर्जनपेक्षा महाग असूनही हॅरियर ईव्हीपेक्षा स्वस्त असेल. लाँचिंगबाबत बोलायचे झाले तर असे मानले जाते की ती पुढील 12 ते 18 महिन्यांत लाँच केली जाऊ शकते.