
फोटो सौजन्य: Pinterest
जरी MG Hector facelift मध्ये फार मोठे बदल करण्यात आले नसले, तरी त्याचा बेस व्हेरिएंट Style पूर्वीपेक्षा अधिक फीचर-लोडेड करण्यात आला आहे. आता दोन्ही SUVs ची सुरुवातीची किंमत जवळपास समान झाली असल्याने, Tata Sierra आणि MG Hector facelift च्या बेस व्हेरिएंटमध्ये कोणती कार चांगली? हा प्रश्न उपस्थित होतो. चला दोन्ही कार्सबद्दल जाणून घेऊयात.
Ola चं टेन्शन वाढलं! ‘ही’ कंपनी आणतेय स्वस्त Electric Scooter, कधी होणार लाँच?
किमतीच्या बाबतीत पाहिले तर Tata Sierra चा बेस व्हेरिएंट MG Hector Style पेक्षा सुमारे 50 हजार रुपयांनी स्वस्त आहे. दोन्ही कार्सच्या किमती सध्या इंट्रोडक्टरी असल्याने भविष्यात यामध्ये बदल होऊ शकतो. मात्र कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी सध्या Sierra अधिक परवडणारी ठरते.
MG Hector च्या बेस व्हेरिएंटमध्ये फक्त पेट्रोल इंजिनचा पर्याय उपलब्ध असून डिझेलचा पर्याय दिलेला नाही. त्याउलट Tata Sierra मध्ये पेट्रोलसोबतच डिझेल इंजिनचाही पर्याय आहे. दोन्ही SUVs Front wheel drive आणि 6-speed manual gearbox सह येतात. मात्र इंजिनच्या पर्यायांमुळे Tata Sierra अधिक बहुपर्यायी ठरते.
बेस व्हेरिएंटमध्येही Tata Sierra काही असे डिझाइन एलिमेंट्स देते, ज्यामुळे ती अधिक प्रीमियम भासते. यामध्ये LED projector headlamps आणि flush type door handles मिळतात, जे MG Hector मध्ये नाहीत. Hector मध्ये साधे हेडलॅम्प्स आणि पूल टाइप डोअर हॅण्डल्स देण्यात आले आहेत. दोन्ही SUVs मध्ये LED DRLs आहेत आणि दोन्ही 17-इंच स्टील व्हील्ससह येतात. मात्र Hector मध्ये wheel कव्हर्स दिले जातात. मागील बाजूस सिएराची कनेक्टेड LED taillights तिला अधिक आकर्षक लूक देतात.
नितीन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात मदत करण्याऱ्या व्यक्तीला मिळणार 25,000 रुपयांचे बक्षीस
दोन्ही SUVs चे बेस व्हेरिएंट्स आतून तुलनेने साधे आहेत. कोणत्याही मॉडेलमध्ये टचस्क्रीन infotainment system किंवा स्पीकर्स दिलेले नाहीत. Tata Sierra मध्ये 4-inch display, तर MG Hector मध्ये 3.5-inch unit मिळते. Sierra मध्ये पुश बटन स्टार्ट फीचर दिले आहे, जे Hector च्या बेस व्हेरिएंटमध्ये उपलब्ध नाही. मात्र Hector मध्ये रिअर सीट रिक्लाइन फीचर आहे, जे Sierra च्या बेस मॉडेलमध्ये नाही.
सेफ्टीच्या बाबतीत दोन्ही SUVs जवळपास समान आहेत. दोन्ही कार्समध्ये 6 एअरबॅग्स, ABS with EBD, hill hold assist आणि ISOFIX चाइल्ड सीट मौमाउंट्स दिले आहेत. फरक फक्तपार्किंग ब्रेकमध्ये आहे. MG Hector मध्ये मॅन्युअल हँडब्रेक, तर Tata Sierra मध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देण्यात आली आहे.