मर्सिडीजची नवीन तंत्रज्ञान सध्या एकाच मॉडेलमध्ये उपलब्ध असेल, CLA 250+. यात मोठी आणि शक्तिशाली अशी 85.5 kWh ची बॅटरी आहे. त्याची मोटर मागील चाकांना power देते, ज्यामुळे प्रचंड 268 bhp जनरेट होते. वेगाच्या बाबतीत, ती फक्त 6.7 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेगाने चालते. आणखी महत्तवाचं म्हणजे तिला 2-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेली आहे.
ही मर्सिडीज-बेंझ कार बाहेरून खूपच आकर्षक दिसते. यात LED हेडलाइट्स आणि डेटाइम DRL आहेत. दरवाजाचे हँडल बॉडीमध्ये रीसेस केलेले आहेत आणि गरज पडल्यासच ते बाहेर पडतात. कारमध्ये मोठे, स्टायलिश १८-इंच अलॉय व्हील्स देखील आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार अंदाजे ४.७ मीटर लांब आहे आणि चाकांमधील मोठे अंतर असल्याने कारमध्ये बसण्यासाठी पुरेशी जागा मिळते. रंगानुसार, ती राखाडी, लाल, काळा, निळा आणि पांढरा अशा विविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. कारच्या डिझाइनमुळे प्रकर्षाने दिसून येते आणि रंगांमुळे ती प्रचंड आकर्षक दिसते.
कारमध्ये मध्यभागी १४ इंचाचा स्क्रीन आहे. त्यात चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनी सारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा समावेश आहे. मुख्य म्हणजे यात स्क्रीन तंत्रज्ञानासह आणखी काही तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या कारच्या पुढच्या सीटवर मसाज आणि हीटिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर कारचाचा डॅशबोर्ड हटके लूकमध्ये आहे. तो रात्रीच्या वेळी चमकतो. आणि कारचे एसी व्हेंट विमानाच्या इंजिनसारखे दिसतात. त्यामुळे ही कार इतरांपासून वेगळी दिसते.
मर्सिडीजने या कारमध्ये ADAS सिस्टम बसवली आहे. संपूर्ण कारमध्ये कॅमेरे देखील बसवले आहेत, ज्यामुळे तुम्ही स्क्रीनवर संपूर्ण कारमध्ये नजर ठेवू शकता. म्हणजे कारचा प्रत्येक भाग तुम्हाला पाहता येऊ शकतो. यामुळे पार्किंग करणे खूप सोपे होते. शिवाय, कारमध्ये पुढील आणि मागील बाजूस सेन्सर आहेत. ज्यामुळे विशेष सुरक्षा मिळते काहीतरी जवळ येत असल्यास त्यापासून तुम्हाला अलर्ट करतात.






