Nissanने आज भारतात त्यांची नवीन बजेट MPV, Nissan Gravite लाँच केली. ही उत्पादकाची भारतात सादर केलेली पहिली MPV आहे. निर्मात्यांनी या कारमध्ये बरेच नवीन फिचर्स अॅड केले आहेत.यात LED लाईट्स, बॉडी क्लॅडिंग, क्रूझ कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, EBDसह EBS, आयसोफिक्स चाइल्ड अँकरेज, TPMS, ESC आणि ट्रॅक्शन कंट्रोल यासारखे खरतनाक फिचर्स एकत्रितरित्या या कारमध्ये दिले गेले आहेत. MPV 3 वर्षांची किंवा 100000 किलोमीटरची वॉरंटीसह आहे. जी 10 वर्षे किंवा 200000 किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकते.ॉ
या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची ‘फ्लेक्सिबल सीटिंग’. तुम्ही ही कार 2-सीटर, 4-सीटर, 5-सीटर किंवा 6-सीटर म्हणून वापरू शकता. जर तुम्ही शेवटची 3rd Row काढून टाकली, तर तुम्हाला ६२५ लिटरचा मोठा बूट स्पेस मिळतो. जो तुम्ही लांबच्या प्रवासासाठी वापरु शकता.
Nissanची Gravite MPV इंजिन 1-लिटर पेट्रोल क्षमतेचं आहे. जी 72 PS पॉवर आणि 96 NM टॉर्क निर्माण करते. ती मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहे. यात 5 -स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT) गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो. मायलेजचा विचार करता ही कार प्रति लिटर 19.3 ते 19.6 किमी मायलेज देते, जे एका मोठ्या फॅमिली कारसाठी अत्यंत समाधानकारक आहे.
बजेट कार असूनही Nissanने फीचर्समध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. 8-इंच टचस्क्रीन सिस्टम दिलेली आहे. जी वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्लेसह उपलब्ध आहे. ड्रायव्हरसाठी 7-इंच डिजिटल क्लस्टर दिलेली आहे. यासह इतर फिचर्स पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, की-लेस एन्ट्री आणि दुसऱ्या व तिसऱ्या रांगेसाठी स्वतंत्र रिअर एसी व्हेंट्ससारख्या गोष्टीही यात दिलेल्या आहेत.
कारच्या उत्पादकांनी ही MPV ₹5.65 लाख रुपया या प्रारंभिक X-शोरूम किमतीवर लाँच केली आहे. याच किमतीला पहिल्या 5000 लोकांना ही कार विकली जाणार आहे. या किमतीमुळे ती भारतातील सर्वात परवडणारी MPV कार ठरणार आहे. या कारचं बुकिंग देखील सुरू झालं आहे. Nissan Gravite ही बजेट MPV सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यातले फिचर्स आणि याची किमत पाहता या कारची तगडी स्पर्धा थेट मारुती एर्टिगा आणि रेनॉल्ट ट्रायबरशी असणार आहे.






