
फोटो सौजन्य: Pinterest
भारतामधील आघाडीच्या वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या टाटा मोटर्सकडून विविध सेगमेंटमध्ये वाहने विक्रीस आणली जातात. कंपनीकडून इलेक्ट्रिक कार म्हणून Tata Tiago EV ऑफर केली जाते. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्स भारतात Tiago EV Facelift लाँच करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. ही इलेक्ट्रिक कार कधीपर्यंत लाँच होऊ शकते आणि यात कोणते बदल पाहायला मिळू शकतात, याबद्दल जाणून घेऊयात.
Maruti Ertiga ला भरली धडकी! Nissan ची नवीन MPV दमदार फीचर्ससह होणार लाँच
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा मोटर्सकडून Tiago EV चा फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच बाजारात सादर करण्याची तयारी सुरू आहे. ही इलेक्ट्रिक कार कंपनीकडून गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात उपलब्ध आहे.
रिपोर्ट्सनुसार, Tiago EV Facelift मध्ये डिझाइन आणि फीचर्स या दोन्ही बाबतीत महत्त्वाचे बदल करण्यात येऊ शकतात. कारचे बंपर्स आणि हेडलाइट्स नव्या डिझाइनमध्ये सादर केले जाऊ शकतात. तसेच मोठी इंफोटेनमेंट स्क्रीन, नवे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, दोन-स्पोक स्टिअरिंग व्हील आणि नव्या डिझाइनचा डॅशबोर्ड देण्यात येण्याची शक्यता आहे.
निर्मात्याकडून या इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी आणि मोटरमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. सध्याच्या मॉडेलप्रमाणेच 19.2 kWh आणि 24 kWh क्षमतेच्या बॅटरी पर्यायांसह Tiago EV Facelift उपलब्ध होऊ शकते. यामुळे एका सिंगल चार्जमध्ये सुमारे 315 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळण्याची शक्यता आहे.
Hero Splendor साठी कमीतकमी किती Down Payment करावा लागेल? जाणून घ्या EMI
Tata Tiago EV Facelift च्या लाँचबाबत टाटा मोटर्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, अंदाजानुसार ही इलेक्ट्रिक कार पुढील काही महिन्यांत भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकते.
Tata Tiago EV ही इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये उपलब्ध असून, या सेगमेंटमध्ये तिचा सामना MG Comet EV या कारशी होत आहे.