फोटो सौजन्य: Pinterest
भारतामध्ये निसान कंपनी सध्या प्रामुख्याने एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली वाहने विक्रीस आणते. मात्र, आता कंपनी आपला पोर्टफोलिओ वाढवण्याच्या तयारीत असून, याच आठवड्यात भारतात Nissan Gravite ही नवी एमपीव्ही लॉन्च केली जाणार आहे. या एमपीव्हीमध्ये कोणत्या खास सुविधा दिल्या जाऊ शकतात, इंजिन किती शक्तिशाली असू शकते आणि ती कोणत्या किंमत श्रेणीत लॉन्च होऊ शकते, याची माहिती या बातमीतून जाणून घेऊया.
Skoda Kushaq Facelift च्या टिझरने रान पेटवलं! दिसला फ्यूचरिस्टिक अवतार, लवकरच होणार लाँच
निसानकडून भारतात याच आठवड्यात नवी एमपीव्ही Nissan Gravite अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे. ही भारतात निसानकडून सादर होणारी पहिली एमपीव्ही असणार आहे. त्यामुळे कारप्रेमी या कारच्या प्रतीक्षेत आहेत.
निर्मात्याकडून या एमपीव्हीच्या डिझाइनबाबत थोडी माहिती डिसेंबर 2025 मध्येच देण्यात आली होती. मात्र, या वाहनात नेमकी कोणती फीचर्स आणि इंजिनचे पर्याय असतील, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ही एमपीव्ही CMF-A+ प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली असून, त्यामुळे ती चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या सेगमेंटमध्ये उपलब्ध होणार आहे.
निसानकडून Gravite एमपीव्हीमध्ये नवे LED DRLs, वेगळ्या डिझाइनचे बंपर्स, नवीन व्हील डिझाइन, आकर्षक नवीन कलर ऑप्शन्स आणि मोठी फ्रंट ग्रिल देण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे या एमपीव्हीला अधिक आधुनिक आणि प्रीमियम लुक मिळेल.
निर्मात्याकडून Nissan Gravite मध्ये अनेक उपयुक्त आणि आधुनिक फीचर्स दिले जाऊ शकतात. यामध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, रेन-सेन्सिंग वायपर्स, वायरलेस चार्जिंग पॅड तसेच कूल्ड ग्लोव्हबॉक्स यांसारख्या फीचर्सचा समावेश असू शकतो.
फुल चार्जवर 810 KM रेंज! पहिल्यांदाच Google Gemini AI सह सुसज्ज असणारी EV ‘या’ दिवशी होणार सादर
निसानकडून Gravite एमपीव्हीमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात येण्याची शक्यता आहे. हेच इंजिन पर्याय रेनॉ Triber मध्येही वापरला जातो. या इंजिनमधून सुमारे 72 हॉर्सपॉवर आणि 96 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण होऊ शकतो. यासोबतच या एमपीव्हीमध्ये पाच-स्पीड मॅन्युअल आणि पाच-स्पीड AMT ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध असण्याची शक्यता आहे.
निसानकडून Gravite एमपीव्ही भारतात अधिकृतपणे 21 जानेवारी 2026 रोजी लॉन्च केली जाणार आहे. लॉन्चच्या वेळीच या वाहनाची अधिकृत किंमत जाहीर केली जाईल. मात्र, अंदाजानुसार ही एमपीव्ही सुमारे 6 लाख रुपयांच्या आसपास (एक्स-शोरूम) किमतीत बाजारात दाखल होऊ शकते.
Nissan Gravite ला बजेट एमपीव्ही सेगमेंटमध्ये लॉंच करण्यात येणार असून, या सेगमेंटमध्ये तिचा सामना Renault Triber आणि Maruti Ertiga यांसारख्या लोकप्रिय एमपीव्हींशी होणार आहे.






