Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टाटा लाँच करणार 2 नवीन इलेक्ट्रिक SUV! पावरट्रेन AWD फीचर्स सह पुढच्या पाचच महिन्यात येणार मार्केटमध्ये!

भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्स आता दोन नव्या इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 30 जून 2026 रोजी टाटा सिएरा EV सादर करणार असून त्यानंतर दिवाळीच्या सुमारास टाटा सफारी EV बाजारात दाखल होणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 14, 2026 | 03:06 PM
टाटा लाँच करणार 2 नवीन इलेक्ट्रिक SUV! पावरट्रेन AWD फीचर्स सह पुढच्या पाचच महिन्यात येणार मार्केटमध्ये!
Follow Us
Follow Us:

भारतातील इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्यासाठी टाटा मोटर्स आता दोन नव्या इलेक्ट्रिक SUV लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी 30 जून 2026 रोजी टाटा सिएरा EV सादर करणार असून त्यानंतर दिवाळीच्या सुमारास टाटा सफारी EV बाजारात दाखल होणार आहे. या दोन नव्या मॉडेल्समुळे टाटा मोटर्सची इलेक्ट्रिक SUV श्रेणी आणखी व्यापक होणार आहे.

सध्या कंपनीकडे टियागो EV, टिगोर EV, पंच EV, नेक्सॉन EV, कर्व्ह EV आणि हॅरियर EV अशी विविध सेगमेंटमधील इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध आहेत. आता सिएरा EV आणि सफारी EVच्या आगमनामुळे लोकप्रिय SUV विभागातील जवळपास प्रत्येक श्रेणीत टाटाची उपस्थिती दिसून येणार आहे.

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रामचे उद्घाटन!ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी नवी संधी!

टाटा सिएरा EVची पहिली झलक 2020 च्या ऑटो एक्स्पोमध्ये संकल्पना मॉडेलच्या स्वरूपात दाखविण्यात आली होती. त्यानंतर 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्येही हे वाहन प्रदर्शित करण्यात आले. कर्व्ह EV आणि हॅरियर EV यांच्या दरम्यान स्थान मिळवणारी ही SUV कंपनीच्या अत्याधुनिक acti.ev+ प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. सिएरा EV रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) तसेच ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. विशेषतः 75 kWh बॅटरी पॅकसह AWD आवृत्ती ग्राहकांना मिळू शकते. तिची संभाव्य किंमत 18 ते 25 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

ही होती भारतात तयार झालेली पहिली SUV कार! ९०च्या दशकात लाँच झालेल्या या SUV बद्दल जाणून घ्या

दुसरीकडे, टाटा सफारी EV ही कंपनीची फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV ठरणार आहे. सात आसनी आणि तीन-रांगांच्या लेआउटसह येणारी ही SUV दिवाळीच्या काळात बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे. हॅरियर EVप्रमाणेच 65 kWh आणि 75 kWh बॅटरी पर्यायांसह ड्युअल-मोटर AWD तंत्रज्ञानही यात दिले जाऊ शकते. अंदाजे 23 लाख रुपयांपासून तिची किंमत सुरू होऊ शकते.

या दोन नव्या इलेक्ट्रिक SUVच्या लॉन्चमुळे भारतीय EV बाजारातील स्पर्धा आणखी वाढणार असून टाटा मोटर्सची आघाडी अधिक मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

Web Title: Tata to launch 2 new electric suv auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Electric Vehicles
  • SUV cars
  • Tata

संबंधित बातम्या

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
1

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स
2

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या
3

Mahindra Thar OG vs Mahindra Thar ROXX: 3-डोअर की 5-डोअर, कोणत्या ग्राहकासाठी कोणती योग्य? जाणून घ्या

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
4

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.