फोटो सौजन्य: iStock
जागतिक मार्केटमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता टेस्ला भारतात एंट्री मारणार आहे. कंपनीने मुंबईतील कुर्ला परिसरात 24,565 चौरस फूट वेअरहाऊस भाड्याने घेतले आहे. हे वेअरहाऊस फक्त डिलिव्हरी आणि सर्व्हिस सेंटर म्हणून वापरले जाणार आहे. या ठिकाणी बॉडीवर्क किंवा पेंट सारखी कामे केली जाणार नाहीत, ज्यामुळे हे स्पष्ट होते की टेस्ला सध्या Local Manufacturing किंवा असेंब्लीपेक्षा ग्राहक सेवा इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहे. बीकेसी, मुंबई आणि एरोसिटी, दिल्ली येथे शोरूम उघडण्याची योजना देखील समोर आली आहे, ज्यांना या वेअरहाऊसकडून पाठिंबा मिळेल.
टेस्ला या वेअरहाऊससाठी दरमहा 37.5 लाख रुपये भाडे देईल आणि 2.25 कोटी रुपये सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून जमा करण्यात आले आहे. प्रति चौरस फूट 153 रुपयांच्या भाड्यात ते मुंबईच्या महागड्या व्यावसायिक जागेत समाविष्ट आहे. यावरून हे स्पष्ट होते की कंपनी भारतातही आपली प्रीमियम ब्रँड इमेज टिकवून ठेवू इच्छित आहे.
18 कॅरेट सोन्याने मढवलेल्या ‘या’ कारचा विषयच हार्ड! James Bond च्या चित्रपटाशी आहे खास कनेक्शन
भारत सरकारच्या नवीन ईव्ही धोरणात लोकल मॅन्युफॅक्चरिंगवर इम्पोर्ट ड्युटीत सूट देण्यात आली असली तरी, टेस्लाने अद्याप भारतात फॅक्टरी स्थापन करण्याची कोणतीही योजना जाहीर केलेली नाही. सध्याचे लक्ष सीबीयू (Completely Built Unit) कारच्या आयात, स्टोरेज, तपासणी आणि डिलिव्हरीवर आहे. मुंबईतील कुर्ला वेअरहाऊस या कामाचे प्राथमिक केंद्र बनेल.
टेस्ला आधीच पुण्यात एक इंजिनिअरिंग सेंटर चालवत आहे. आता मुंबई आणि दिल्लीमध्ये रिटेल आणि सर्व्हिस नेटवर्क सुरू होत आहेत. या धोरणातून असे दिसून येते की टेस्ला भारतात Multi-city network स्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
माहितीनुसार, कुर्ला वेअरहाऊस जून 2025 पासून कार्यान्वित होईल आणि वर्षाच्या अखेरीस पहिली डिलिव्हरी सुरू होऊ शकते. टेस्ला मॉडेल 3 आणि Model Y ची होमोलोगेशन प्रक्रिया भारतात सुरू आहे. त्यांची किंमत 50 लाख ते 70 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. दोन्ही कार प्रीमियम इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये येतील आणि ग्राहकांना रेंज, तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत उत्तम अनुभव देतील.
भारतात Audi A4 Signature Edition लाँच, ग्राहकांना मिळणार लक्झरी आणि स्टाईलचे दमदार कॉम्बिनेशन
टेस्लाचे हे वेअरहाऊस केवळ कार डिलिव्हरीबद्दलच नाही तर सर्व्हिस आणि विक्रीनंतरच्या सपोर्टबद्दल देखील गांभीर्य दाखवते. भारतात लक्झरी कार ब्रँडची देखभाल हा अनेकदा चिंतेचा विषय राहिला आहे. या वेअरहाऊसद्वारे टेस्ला हे सांगू इच्छिते की ते केवळ कार विकण्यासाठीच नाही तर लॉन्गटर्म सर्व्हिस देण्यासाठी देखील आले आहे. मात्र, स्थानिक उत्पादनाच्या अभावामुळे, या कारच्या किमती केवळ श्रीमंत ग्राहकांना आकर्षित करू शकतील.