फोटो सौजन्य: @AudiIN (X.com)
भारतात बजेट फ्रेंडली कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. असे जरी असले तरी लक्झरी कार्सची देखील वेगळीच क्रेझ आहे. रस्त्यांवर लक्झरी कार धावताना जरी दिसल्या तरी अनेकांच्या नजरा त्यावर रोखल्या जातात. तसेच, अनेक राजकारणी आणि सेलिब्रेटी सुद्धा आपल्या कार कलेक्शनमध्ये लक्झरी कार्सचा समावेश करत असतात.
भारतीय मार्केटमध्ये अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत, त्यातीलच एक कंपनी म्हणजे Audi. नुकतेच कंपनीने त्यांची लोकप्रिय सेडान Audi A4 Signature Edition व्हर्जन लाँच केली आहे. हे नवीन व्हर्जन केवळ उत्तम परफॉर्मन्स आणि अनेक प्रीमियम फीचर्ससह येत नाही. ही आलिशान कार विशेष डिझाइन एलिमेंट आणि प्रीमियम फीचर्ससह सुसज्ज आहे. भारतात ही कार 57.11 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया Audi A4 एडिशन कोणत्या खास फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे?
या लक्झरी कारमध्ये 360 डिग्री कॅमेरासह पार्क असिस्ट, नवीन वुड ओक डेकोरेटिव्ह, प्रीमियम केबिन फील, ऑडी रिंग्ज एंट्री एलईडी लॅम्प, जबरदस्त वेलकम लाईट, ऑडी रिंग्ज डेकल्स, डायनॅमिक व्हील हब कॅप्स, प्रीमियम फ्रेग्रन्स डिस्पेंसर, एरोडायनामिक स्पॉयलर लिप, स्पोर्टी प्रोफाइल, कस्टम कलर की, स्टेनलेस स्टील पेडल कव्हर, इंटिरिअरला स्पोर्टी टोन देणे, आणि स्पेशल अलॉय व्हील पेंट डिझाइनचा समावेश आहे.
TVS Jupiter Electric मार्केटमध्ये लाँच होणार? Ola, Ather, आणि Bajaj च्या टेन्शनमध्ये वाढ !
या कारमध्ये 19 स्पीकर्स बी अँड ओ 3D प्रीमियम साउंड सिस्टम, 25.65 सेमी हाय-रिझोल्यूशन स्क्रीन, व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, नेव्हिगेशन, व्हॉइस कंट्रोल आणि ऑडी स्मार्टफोन इंटरफेस आहे. यासोबतच, 30 रंग पर्यायांसह ॲम्बियंट लाइटिंग, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री आणि जेश्चर बेस्ड बूट ओपनिंग, वायरलेस चार्जिंगसह ऑडी फोन बॉक्स, ड्रायव्हर सीटसाठी मेमरी फंक्शनसह पॉवर्ड सीट्स प्रदान करण्यात आल्या आहेत.
ही कार 5 उत्तम रंगांच्या पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे, जे ग्लेशियर व्हाइट मेटॅलिक, मायथोस ब्लॅक मेटॅलिक, नवारा ब्लू मेटॅलिक, प्रोग्रेसिव्ह रेड मेटॅलिक आणि मॅनहॅटन ग्रे मेटॅलिक आहेत.
पेट्रोल किंवा डिझेल नाही, तर विजेच्या जोरावर धावते भारतातील सर्वात वेगवान कार; किंमत फक्त…
यामध्ये 2.0 लीटर TFSI पेट्रोल इंजिन वापरले आहे, जे 204 एचपी पॉवर आणि 320 एनएम टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की त्यांची कार फक्त 7.1 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग वाढवू शकते. याचा टॉप स्पीड 241 किमी/तास आहे. 12 व्ही माइल्ड हायब्रिड सिस्टीम आणि ब्रेक रिक्युपरेसनमुळे फ्युएल एफिशियन्सी देखील वाढते.