फोटो सौजन्य: @MKBHD/X.com
15 जुलै रोजी भारतीय मार्केटमध्ये Elon Musk च्या Tesla कंपनीने दिमाखात एंट्री मारली. याच दिवशी मुंबईतील BKC येथे कंपनीच्या पहिल्या शोरूमच्या उद्घाटनासह Tesla Model Y लाँच झाली. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच होताच तिची एक वेगळीच क्रेझ निर्माण झाली होती. आता कंपनीने या कारचा नवा व्हेरिएंट सादर केला आहे.
इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्लाची विक्री वाढवण्यासाठी, कंपनीने मॉडेल Y चा एक नवीन व्हेरिएंट सादर केला आहे. त्यात कोणते फीचर्स समाविष्ट आहेत? त्याची बॅटरी आणि मोटर किती पॉवरफुल आहे? याची किंमत किती? ही कार कोणत्या देशांमध्ये ऑफर केली जात आहे? भारतात देखील ही लाँच केली जाईल का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊयात.
TATA ची दिवाळी भेट! Tiago ते Safari पर्यंत गाड्यांच्या खरेदीवर मिळणार बंपर सूट
टेस्लाने मॉडेल Y कारचा एक नवीन व्हेरिएंट म्हणजेच स्टँडर्ड सादर केला आहे. कंपनीने सादर केलेला हा नवीन व्हेरिएंट कारचा बेस व्हेरिएंट म्हणून देण्यात आला आहे, ज्यामध्ये कमी फीचर्स आणि वेगळी बॅटरी आहे.
या व्हेरिएंटमध्ये कंपनीने स्टँडर्ड रेंज बॅटरी दिली आहे, ज्यामुळे कारला एकाच चार्जमध्ये तब्बल 517 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळते. यात फिट केलेली इलेक्ट्रिक मोटर कारला केवळ 6.8 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास स्पीडने धावण्याची क्षमता देते. हा व्हेरिएंट रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) व्हेरिएंट उपलब्ध आहे.
Jeep Compass चा Track Edition लाँच, जाणून घ्या फीचर्सपासून ते किमतीपर्यंत सर्वकाही
टेस्लाच्या या स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये 18 आणि 19 इंच अलॉय व्हील्स, 15.4 इंच सेंट्रल टचस्क्रीन डिस्प्ले, फ्रंट-फेसिंग कॅमेरा, फुल सेल्फ-ड्रायव्हिंग सिस्टम, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, रिमोट क्लायमेट कंट्रोल, फोन की, सेंट्री मोड, डॉग मोड, मेटल रूफ, एलईडी लाईट्स आणि फॅब्रिक सीट्स अशी फीचर्स देण्यात आली आहेत. हे फीचर्स इतर प्रीमियम व्हेरिएंट्सपेक्षा थोडे साधे असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहेत.
कंपनीच्या माहितीनुसार, Tesla Model Y च्या स्टँडर्ड व्हेरिएंटची अमेरिकेतील किंमत 38,630 डॉलर्स आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 37 लाख रुपयांच्या आसपास येते.
टेस्लाने अद्याप हा व्हेरिएंट भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध करून दिलेला नाही, परंतु पुढील काही महिन्यांत हा व्हेरिएंट लाँच होण्याची अपेक्षा आहे.