फोटो सौजन्य: @JeepIndia/X.com
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट म्हणजे इतर विदेशी ऑटो कंपन्यांसाठी व्यापाराची सुवर्ण संधी! याच संधीचं सोनं करण्यासाठी अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार कार ऑफर करत असतात. नुकतेच अमेरिकन ऑटो कंपनी Jeep ने मार्केटमध्ये त्यांची नवीन कार लाँच केली आहे.
Jeep ने भारतीय ऑटो बाजारपेठेत अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. कंपनीने अलीकडेच Jeep Compass ची ट्रॅक एडिशन लाँच केली. चला या कारच्या नवीन एडिशनच्या फीचर्स आणि किमतीबद्दल जाणून घेऊयात.
जीप भारतात कंपास एसयूव्ही विकते. कंपनीने 8 ऑक्टोबर रोजी एसयूव्हीची ट्रॅक एडिशन लाँच केली. ही एडिशन लिमिटेड संख्येत विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे.
Hardik Pandya कडून Lamborghini Car खरेदी; किंमत अशी की, मुंबईत नव्हे तर दुबईतही बांधता येईल बंगला
जीप कंपनीने कंपास SUV चा “ट्रेल एडिशन” अनेक खास फीचर्ससह सादर केला आहे. या नव्या एडिशनमध्ये एक्स्टेरिअरवर विशेष डेकल्स, तसेच केबिनमध्ये अनेक अपग्रेड्स करण्यात आले आहेत. यामध्ये 10.1 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पॅनोरामिक सनरूफ, ABS, EBD, हिल-स्टार्ट असिस्ट, आणि रेन ब्रेक असिस्ट यांसारखे अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
या SUV मध्ये 2.0-लिटर टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 170 हॉर्सपावर आणि 350 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यात 6-स्पीड मॅन्युअल तसेच 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत. ग्राहकांना ही SUV 2WD आणि 4WD या दोन्ही पर्यायांमध्ये मिळू शकते.
कंपनीने हा नवीन एडिशन तीन व्हेरिएंटमध्ये देत आहे, ज्याची किंमत 26.78 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. या एडिशनसह टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंटची किंमत 30.58 लाख (एक्स-शोरूम) आहे.
TATA ची दिवाळी भेट! Tiago ते Safari पर्यंत गाड्यांच्या खरेदीवर मिळणार बंपर सूट
स्टेलॅन्टिस इंडियाचे संचालक कुमार प्रियेश म्हणाले, “कंपास ट्रेल एडिशनद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना अधिक उत्कृष्ट SUV अनुभव देत आहोत. प्रत्येक घटक काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आला आहे, जो ग्राहकांच्या विशिष्टतेचे प्रतीक आहे. या मॉडेलमध्ये जीपच्या सामर्थ्य, परफॉर्मन्स आणि रोमांचाचा डीएनए कायम राखला आहे.”