TATA ची दिवाळी भेट! Tiago ते Safari पर्यंत गाड्यांच्या खरेदीवर मिळणार बंपर सूट (Photo Credit- X)
नवीन कार खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहक धनतेरस आणि दिवाळीसारख्या सणांची वाट पाहत असतात. नुकत्याच झालेल्या जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या किमती कमी झाल्यानंतर, आता टाटा मोटर्सने त्यांच्या वाहनांवर विशेष सणांच्या सवलती जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही अल्ट्रोज, पंच, नेक्सॉन, टियागो, सफारी यांसारखी टाटा वाहने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीच्या या ऑफर 3 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर 2025पर्यंत वैध असून, त्या ₹1,35,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. हे फायदे MY24 (उत्पादन वर्ष 2024) आणि MY25 (उत्पादन वर्ष 2025) या दोन्ही मॉडेल्सवर लागू आहेत.
उत्पादन वर्ष 2024 (MY24) असलेल्या मॉडेल्सवर ग्राहकांना लक्षणीय सवलती मिळत आहेत.
मॉडेल | प्रकार | एकूण फायदा |
टाटा टियागो | पेट्रोल आणि CNG | ₹ 35,000 पर्यंत |
टाटा टिगोर | पेट्रोल आणि CNG | ₹ 45,000 पर्यंत |
टाटा पंच | पेट्रोल आणि CNG | ₹ 25,000 पर्यंत थेट सूट |
टाटा नेक्सॉन | (सर्व प्रकार) | ₹ 45,000 पर्यंत (₹ 10,000 एक्सचेंज बोनससह) |
हॅरियर/सफारी | डिझेल | ₹ 75,000 पर्यंत |
Altroz वर मोठे फायदे: अल्ट्रोजचे पेट्रोल/सीएनजी (रेसर प्रकार वगळता) आणि डिझेल प्रकार एकूण ₹1,00,000 पर्यंतचे फायदे देत आहेत. यात ₹50,000 ची थेट सूट आणि ₹50,000 चा एक्सचेंज व स्क्रॅपेज बोनस समाविष्ट आहे.
रेकॉर्ड ब्रेक विक्री! नवरात्रीत गाड्यांची बंपर खरेदी, ऑटो सेक्टरमध्ये 34% वाढीचा विक्रम
टाटाच्या सर्व मॉडेल्समध्ये Altroz Racer पेट्रोल प्रकारावर सर्वाधिक सवलत मिळत आहे.
नवीन उत्पादन वर्ष २०२५ (MY25) असलेल्या मॉडेल्सवर देखील ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत:
या सवलतींचा फायदा घेऊन ग्राहक कमी किमतीत आपली आवडती टाटा कार घरी आणू शकतात.
TVS Raider 125: या दिवाळीला घरी आणा स्टायलिश आणि दमदार बाईक; किंमत आहे १ लाखापेक्षाही कमी