भारतात इलेक्ट्रिक कार्सना जोरदार मागणी मिळत आहे. हीच वाढती मागणी अनेक विदेशी ऑटो कंपन्यांना आपल्या इलेक्ट्रिक कार भारतात सादर करण्यास प्रोत्साहित करत आहे. नुकतेच भारतात जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने देशात Tesla Model Y लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 15 जुलै 2025 रोजी लाँच करण्यात आली. यासोबतच, कंपनीने मुंबईतील BKC मध्ये आपले पहिले वाहिले शोरूमचे देखील उद्घाटन केले. ही कार मुंबईत लाँच करण्यात आली असून आता कंपनीने त्यांचे चार्जिंग स्टेशन सुद्धा सुरु केले आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीला, टेस्लाने पहिले सुपरचार्जर देखील बसवले आहे. हे चार्जर प्रथम कोणत्या शहरात बसवले गेले आहे? टेस्लाच्या सुपरचार्जरची वैशिष्ट्य काय? त्याद्वारे वाहन चार्ज करण्यासाठी किती खर्च येईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊयात.
फुल्ल टॅंकवर 700 KM ची रेंज ! लाँच होताच ‘या’ बाईकने दाखवला जलवा, फक्त 10 हजारात करता येईल बुक
Elon Musk च्या टेस्लाने मुंबईत पहिला सुपरचार्जर बसवला आहे. हा सुपरचार्जर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील टेस्लाच्या शोरूममध्ये बसवण्यात आला आहे. टेस्लाने BKC मध्ये एकूण चार सुपरचार्जर बसवले आहेत.
सोशल मीडियावरील टेस्ला क्लब इंडिया अकाउंटवर केलेल्या पोस्टनुसार, टेस्लाच्या सुपर चार्जरवरून ईव्ही चार्ज करण्यासाठी, प्रति किलोवॅट तास 24 रुपये द्यावे लागतील. 4 V4 स्टॉल चार्जरसाठी ही रक्कम द्यावी लागेल. याशिवाय, 11 किलोवॅट तास चार्जरसाठी प्रति किलोवॅट तास 14 रुपये द्यावे लागेल.
महागड्या किमतीसाठी ओळखली जाणारी Harley-Davidson सर्वात स्वस्त बाईक लाँच करणार, किती असेल किंमत?
टेस्लाचा सुपर चार्जर वापरण्यासाठी, टेस्ला इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांना टेस्ला ॲप वापरावे लागेल. हा ॲप प्रथम उपलब्धता तपासेल आणि नंतर स्वतःसाठी स्लॉट बुक केल्यानंतर, ईव्ही प्लग इन करावे लागेल. हे ॲप्लिकेशन चार्जिंगच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी, चार्जिंग करताना सूचना मिळवण्यासाठी आणि चार्जिंगसाठी पैसे देण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.
टेस्लाने पहिल्यांदा मुंबईत आपला शोरूम उघडला. त्यानंतर येथे पहिला सुपर चार्जरही बसवण्यात आला आहे. माहितीनुसार, मुंबईनंतर, कंपनी दिल्लीत आपला दुसरा शोरूम उघडण्याची योजना आखत आहे. अशा परिस्थितीत, मुंबईनंतर, टेस्लाचा सुपर चार्जर दिल्लीत बसवला जाईल अशी अपेक्षा आहे.