फोटो सौजन्य: iStock
भारतात प्रीमियम बाइक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक सेलिब्रेटी आणि बाईकप्रेमींचे तर स्वप्न असते की त्यांच्या कलेक्शनमध्ये विविध ऑटो ब्रँड्सच्या प्रीमियम बाईक्स असाव्यात. देशात अनेक प्रीमियम बाईक उत्पादक कंपन्या आहेत. Harley-Davidson ही त्यातीलच एक कंपनी, जिने भारतीय मार्केटमध्ये आपली वेगळीच हवा निर्माण केली आहे. कंपनीच्या बाईक खासकरून हाय परफॉर्मन्स आणि महागड्या किमतीमुळे ओळखल्या जातात. मात्र, आता कंपनी आपली सर्वात स्वस्त बाईक लाँच करण्याच्या तयारीत आहे.
आतापर्यंत त्यांच्या हाय-एंड आणि प्रीमियम बाइक्ससाठी ओळखली जाणारी हार्ले-डेव्हिडसन आता एक नवीन पाऊल उचलणार आहे. यावेळी कंपनी बजेट रेंजमध्ये एक नवीन बाईक “Sprint” लाँच करण्याची तयारी करत आहे. ही बाईक विशेषतः नवीन आणि तरुण रायडर्सना लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे.
Tesla चं नशीबच खराब ! ‘या’ फीचरमुळे लागला मोठा फटका, कोर्टाने ठोकला 370 कोटींचा दंड
माहितीनुसार, या नवीन स्प्रिंट बाईकची संभाव्य किंमत सुमारे $6,000 म्हणजेच सुमारे 5 लाख रुपये असू शकते. जर असे झाले तर ती हार्ले-डेव्हिडसनच्या आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त बाईक्सपैकी एक असेल.
यावेळी कंपनीने बाईकसाठी पूर्णपणे नवीन आर्किटेक्चर डिझाइन केले आहे, जे येत्या काळात अनेक नवीन मॉडेल्ससाठी वापरले जाईल. यासह, हार्ले केवळ नवीन सेगमेंटमध्ये प्रवेश करू शकणार नाही, तर पहिल्यांदाच हार्लेसारखी ब्रँडेड बाईक खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांच्या वर्गाला देखील लक्ष्य करेल.
खरंतर, हार्ले-डेव्हिडसनने कमी किमतीच्या बाईकसह बाजारात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, कंपनीने भारतासारख्या देशांसाठी Street 750 नावाची एंट्री-लेव्हल बाईक लाँच केली होती, जी भारतातच तयार केली जात होती. मात्र, स्ट्रीट 750 ला अपेक्षित विक्री मिळाली नाही आणि कंपनीला ती बंद करावी लागली. आता Harley Sprint च्या माध्यमातून, कंपनी पुन्हा एकदा बजेट सेगमेंटमधील ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.
प्रीमियम बाईकपासून ते EV पर्यंत, ‘या’ आठवड्यात लाँच होणार धमाकेदार ‘या’ बाईक्स
रिपोर्ट्सनुसार, हार्ले-डेव्हिडसन ही नवीन बाईक पहिल्यांदा 2025 च्या EICMA बाईक शोमध्ये प्रदर्शित करेल. काही आठवड्यांनंतर तिचे जागतिक पदार्पण देखील होईल. जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर ही बाईक ब्रँडच्या इतिहासात मोठा बदल घडवून आणू शकते आणि बजेट बाइक सेगमेंटमध्ये हार्लेला एक नवीन ओळख देऊ शकते.