फोटो सौजन्य: @ramaswami120 (X.com)
भारतात मोठ्या प्रमाणात बाईक्सची विक्री होताना दिसत असते. नुकतेच नवीन Hero Splendor Plus काही अपडेट्ससह लाँच करण्यात आली आहे. चला या बाईकच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.
भारतीय बाजारात अनेक बाईक उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट बजेट फ्रेंडली बाईक ऑफर करत असतात. ग्राहक देखील अशीच बाईक खरेदी करतात जी स्वस्तात मस्त परफॉर्मन्स देईल. म्हणूनच तर अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या स्वस्तात मस्त परफॉर्मन्स आणि मायलेज देणाऱ्या बाईक्स मार्केटमध्ये लाँच करत असतात.
भारतात लवकरच लाँच होणार 2025 Hyundai Ioniq 5, मिळणार अनेक हाय-फाय फीचर्स
नुकतेच Hero कंपनीने आपली एक नवीन बाईक ऑफर केली आहे. भारतीय मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी आणि सर्वात लोकप्रिय बाईक, हिरो स्प्लेंडर प्लसला अपडेट केले आहे. या अपडेटनंतर ही बाईक आणखी चांगली झाली आहे. त्याचे इंजिन आता पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. ही बाईक अनेक व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. 2025 Hero Splendor Plus बद्दलच्या 5 सर्वात महत्त्वाच्या वैशिष्टयांबद्दल जाणून घेऊया.
2025 मधील हिरो स्प्लेंडर प्लस ही OBD-2B प्रकारातील एक लोकप्रिय बाईकची किंमत ही विविध मॉडेल्सनुसार वेगळी आहे. Splendor Plus Drum Brake मॉडेलची किंमत 78,926 रुपये आहे. तर i3s व्हेरियंटची किंमत 80,176 रुपये इतकी आहे. याच किमतीत Splendor Plus i3s Black And Accent व्हेरियंटही उपलब्ध आहे. Splendor Plus Xtec Drum मॉडेल 82,751 ला मिळते, तर एक्सटेक डिस्क व्हेरियंट 86,051 मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, Splendor Plus Xtec 2.0 Drum व्हेरियंटची किंमत 85,501 इतकी आहे.
या नवीन बाईकमध्ये अजूनही तेच 97.2 सीसी, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले जाते. त्याचे इंजिन 7.9 पीएस पॉवर आणि 8.05 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन आता OBD-2B सुसंगत आहे. या बाईकचे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
डोंगराळ भागात कार चालवताना Hill Hold Control फिचर कसे काम करते? सुरक्षित राइडसाठी महत्वाचा आहे फिचर
स्प्लेंडर प्लसच्या सर्व व्हेरियंट्समध्ये अंडरपिनिंग्ज म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर एकसारखेच आहेत. या बाईकच्या दोन्ही टोकांना 80-सेक्शन ट्यूबलेस टायरसह 18-इंचचे अलॉय व्हील्स दिले आहेत. टेलिस्कोपिक फोर्क आणि 5-स्टेप प्रीलोड अॅडजस्टेबल ट्विन शॉक अब्जॉर्बर्स हे देखील पूर्वीच्या नॉन-OBD-2B मॉडेल्समधूनच घेण्यात आले आहेत. दोन्ही टोकांना 130 मिमीचे ड्रम ब्रेक्स दिले आहेत, परंतु एक्सटेक डिस्क व्हेरियंट वगळता, ज्यात 240 मिमीचा फ्रंट डिस्क ब्रेक मिळतो. हा व्हेरियंट 100cc सेगमेंटमधील एकमेव बाईक आहे ज्यामध्ये फ्रंट डिस्क ब्रेकचा पर्याय उपलब्ध आहे.
या बाईकमध्ये हॅलोजन हेडलॅम्प, स्पीडोमीटरसह ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट कन्सोल, फ्युएल गेज आणि टेल-टेल लाईट्स आहेत. त्याच वेळी, त्याच्या Xtec 2.0 मध्ये ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह हॅलोजन हेडलॅम्प आणि LED DRL सह LCD इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आला आहे. Plendor Xtec 2.0 मध्ये समान डिजिटल कनेक्टेड कन्सोल तसेच इंटिग्रेटेड डीआरएलसह पूर्ण-एलईडी हेडलाइट आहे. यात हॅझर्ड लाइट फंक्शन मिळते, जे सर्व इंडिकेटर चालू करते.
बेस व्हेरियंट वगळता, इतर सर्व व्हेरियंटमध्ये i3S सिस्टीम असते जी बाईक काही काळ निष्क्रिय असताना इंजिन बंद करते आणि फक्त क्लच दाबून ही बाईक सुरू देखील करता येते.