फोटो सौजन्य: @Hyundai (X.com)
भारतात अनेक उत्तम विदेशी ऑटो कंपन्या आहेत, ज्या दमदार फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या कार ऑफर करत आहे. यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे ह्युंदाई. कंपनी नेहमी ग्राहकांच्या मागणी आणि आवडीनुसार बेस्ट कार ऑफर करत असते. आता लवकरच कंपनी अजून एक उत्तम परफॉर्मन्स देणारी कार मार्केटमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.
Hyundai Ioniq 5 ही भारतात 2023 मध्ये लाँच करण्यात आली होती आणि तेव्हापासून या कारला कोणतेही मोठे अपडेट मिळालेले नाहीत. कंपनी लवकरच यात एक मोठे अपडेट देणार आहे आणि त्याचे फेसलिफ्ट व्हर्जन ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 पर्यंत भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. नवीन Hyundai Ioniq 5 च्या इंटिरिअर आणि एक्सटिरिअर दोन्हीच्या डिझाइनमध्ये अनेक बदल दिसून येत आहे. चला जाणून घेऊया 2025 च्या Hyundai Ioniq 5 मध्ये कोणत्या नवीन गोष्टी दिसू शकतात?
डोंगराळ भागात कार चालवताना Hill Hold Control फिचर कसे काम करते? सुरक्षित राइडसाठी महत्वाचा आहे फिचर
2025 च्या ह्युंदाई आयोनिक 5 फेसलिफ्टमध्ये पुन्हा डिझाइन केलेले फ्रंट आणि रिअर बंपर आहे. त्यात दिलेल्या अलॉय व्हील्समध्ये आता नवीन ड्युअल-टोन एरोडायनामिक डिझाइन आहे. बॉक्सी एलईडी हेडलाइट्स, सिग्नेचर डीआरएल आणि पिक्सेल-स्टाईल टेल लाइट्ससह हे अपडेट्स इंडिया-स्पेक मॉडेलमध्ये देखील आणले जाऊ शकतात.
2025 च्या ह्युंदाई आयोनिक 5 फेसलिफ्टच्या आतील भागात इंटरॅक्टिव्ह पिक्सेल डॉट्ससह नवीन 3-स्पोक स्टिअरिंग व्हील आणि सीट हीटिंग, स्टीअरिंग व्हील हीटिंग आणि पार्क असिस्ट सारख्या फंक्शन्ससाठी अतिरिक्त फिजिकल बटणे दिसू शकतात.
या कारच्या केबिनमध्ये पूर्वीच्या पांढऱ्या बेझलऐवजी काळे बेझल देण्यात आले आहेत, जे त्याला स्पोर्टी फील देतात. त्याच्या सेंटर कन्सोलमध्ये कपहोल्डर्स आणि वायरलेस फोन चार्जरसाठी नवीन लेआउट अपडेट करण्यात आला आहे.
Electric Car मालकांनो लक्ष द्या ! उन्हाळ्यात करू नका ‘या’ 2 चुका, अन्यथा जीव…
यामध्ये 12.3-इंच ड्युअल स्क्रीन (एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरी इन्स्ट्रुमेंटेशनसाठी), पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ॲम्बियंट लाइटिंग आणि ड्युअल-झोन ऑटो एसी सारखी प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतात.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 360-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), लेन कीप असिस्ट आणि अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यांसारखी प्रगत फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
2025 च्या Hyundai Ioniq 5 मध्ये 84 kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो, जो 228 PS पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करेल. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर, त्याची बॅटरी 570 किमी पर्यंतची रेंज देऊ शकेल.
2025 च्या ह्युंदाई आयोनिक 5 ची एक्स-शोरूम किंमत 45 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. भारतात, ते BYD Sealion 7, BYD Seal, BMW iX1 LWB आणि Kia EV6 शी स्पर्धा करेल.