फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये बदलत्या काळानुसार वाहनांमध्ये महत्वाचे बदल होत आहे. पूर्वी अनेक ग्राहक कारची किंमत पाहून ती खरेदी करायचे. पण आज ही स्थिती बदलली आहे. आजचा ग्राहक कार खरेदी करताना आपल्या सेफ्टीकडे जास्त लक्षकेंद्रीत करत असतो. म्हणूनच तर अनेक ऑटो कंपन्या आता आपल्या कारमध्ये अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स ऑफर करत आहे.
अलिकडच्या काळात लाँच झालेल्या जवळजवळ सर्वच कारमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. विशेषतः डोंगराळ रस्त्यांसाठी यामध्ये अनेक फीचर्स आहेत, त्यापैकीच एक म्हणजे हिल होल्ड कंट्रोल फिचर. डोंगराळ भागात कार चालवताना हा फिचर खूप उपयुक्त ठरतो. हे केवळ चढ-उतारावर कार चालवतानाच मदत करत नाही तर उतारावर जाताना देखील खूप उपयुक्त ठरतो. हिल होल्ड कंट्रोल कसे काम करते आणि डोंगराळ भागातील रस्त्यांसाठी हा किती उपयुक्त आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
Maruti Baleno च्या CNG व्हेरियंटवर दोन लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यास किती असेल EMI?
हिल होल्ड कंट्रोलला हिल असिस्ट कंट्रोल असेही म्हणतात. अलीकडेच लाँच झालेल्या जवळजवळ सर्व कारमध्ये हा फिचर आढळतो. परंतु हे फिचर कसे काम करते हे तुम्हाला माहिती आहे का? हिल होल्ड कंट्रोल ही एक ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम आहे जी उंच डोंगराळ भागातील रस्त्यांवर कार चालवणे सोपे करते. बऱ्याचदा असे रस्ते असतात जिथे कार थांबवली तर ती मागे जाऊ लागते. अशा परिस्थितीत, ब्रेकवरून पाय काढल्यानंतरही कार मागे जाण्यापासून रोखण्यासाठी हे प्रगत सेफ्टी फिचर काम करते.
जर तुम्ही कार एखाद्या चढणीवर किंवा चढत्या दिशेने असताना अचानक ब्रेक लावला आणि ब्रेकवरून पाय काढला तर कार मागे जायला लागते. त्याच वेळी, ज्या कार्समध्ये हिल होल्ड कंट्रोल फीचर उपलब्ध आहे. ब्रेक सोडणे आणि रेस देणे यामधील प्रेशर ते कायम ठेवते, ज्यामुळे कार मागे जात नाही. या फीचर्समुळे कार चालकाला काही अतिरिक्त वेळ मिळतो, ज्यामध्ये तो रेस देऊन कार पुढे नेऊ शकतो. जेव्हा तुमची कार पुढे होते तेव्हा हे फिचर प्रेशर रिलीज करते.
11 लाख रुपयांची Hyundai Creta सहज होईल तुमची ! फक्त लक्षत ठेवा EMI चं ‘हे’ गणित
ज्या कारमध्ये हा फिचर आहे, ती कार उंच चढण किंवा डोंगराळ भागात कार चालवणे खूप सोपे होऊन जाते. त्याच वेळी, शहरी भागात उड्डाणपुलावर चढताना अचानक ब्रेक लावावा लागतो तेव्हा हे फिचर खूप उपयुक्त ठरते. हे फिचर तुमची कार मागे जाण्यापासून रोखण्यासाठी काम करते, जेणेकरून तुमच्या कारची मागील कारसोबत टक्कर होऊ नये.