फोेटोे सौजन्य: Social Media
दिवाळीचा सण सुरु होण्यास फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या शुभकाळात आपण सर्वच नवनवीन गोष्टी खरेदी करत असतो. काही जण तर या काळात नवीन बाईक किंवा कार घेताना दिसतात. ऑटो कंपनीज सुद्धा जास्तीतजास्त ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी जबरदस्त ऑफर्स लाँच करत असतात. तसेच काही कंपनीज नवीन कार सुद्धा लाँच करताना दिसतात.
जर तुम्ही सुद्धा या काळात आपल्या कुटुंबासाठी एक चांगली कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. परवडणाऱ्या किंमतीत फॅमिली कारचा विचार केला तर, आपल्याकडे आधीच बाजारात अनेक पर्याय आहेत.
हे देखील वाचा: जेट प्लेनचे इंजिन किती CC चे असते? मायलेज ऐकाल तर उडूनच जाल
या पर्यायांमधून सर्वोत्तम कार निवडणे हे खूप कठीण काम असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक अशा कारबद्दल सांगणार आहोत, जिची विक्री दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ही कार म्हणजे मारुती सुझुकी एर्टिगा.
आत तुम्ही मारुती सुझुकी एर्टिगा सीएनजी फक्त 1 लाख रुपये डाउन पेमेंट भरून मिळवू शकता. 1 लाख रुपये भरल्यानंतर किती EMI भरावा लागेल त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
Maruti Suzuki Ertiga CNG ची किंमत 10.78 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. जर तुम्ही ही कार राजधानी दिल्लीतून खरेदी केली तर तुम्हाला या गाडीवर 1 लाख 12 हजार 630 रुपये आरसी फी आणि 40 हजार 384 रुपयांची विमा रक्कम भरावी लागेल. याशिवाय 12 हजार 980 रुपये अतिरिक्त शुल्क समाविष्ट आहे. अशा प्रकारे Ertiga ची एकूण ऑन-रोड किंमत 12 लाख 43 हजार 994 रुपये होते. ही किंमत तुमच्या जवळील शोरूमनुसार बदलू शकते.
हे देखील वाचा: Honda ची ‘ही’ बाईक देते लक्झरी कार्सना टक्कर, किंमत Toyota Fortuner पेक्षा जास्त
12.43 लाख रुपयांच्या ऑन-रोड किंमतीवर तुम्ही 1 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यास, त्यानुसार तुम्हाला 11 लाख 43 हजार 994 रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. अशा प्रकारे, तुम्हाला 10 टक्के वार्षिक व्याजदराने दरमहा 24 हजार 306 रुपयांचे एकूण 60 हप्ते भरावे लागतील. एकूण तुम्हाला 3,14,396 रुपये व्याज द्यावे लागतील.
Ertiga चे CNG व्हेरियंट अंदाजे 26.11 किमी प्रति किलो मायलेज देते. कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्याचे इंजिन 1.5 लीटर पेट्रोल इंजिनसह येते.
मारुती सुझुकी एर्टिगाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार बाजारपेठेतील सर्वोत्तम एमपीव्हींपैकी एक मानली जाते. या 7 सीटर कारमध्ये 1462 सीसी पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 101.64 bhp च्या कमाल पॉवरसह 136.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच यात मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्यायही मिळतो. कंपनीच्या मते, ही कार 20.51 किमी प्रति लीटर मायलेज देखील देते.