Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’

ऑगस्ट २०२६ मध्ये भारतातील ई-स्कूटर बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. TVS आणि बजाज आघाडीवर असताना मोटोव्हॉल्टने तब्बल ५०९% वार्षिक वाढ नोंदवून सर्वांचे लक्ष वेधले, तर ओला इलेक्ट्रिक पाचव्या स्थानावर घसरली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 05, 2026 | 04:40 PM
‘या’ आहेत ऑगस्ट मधील टॉप १० ‘ई-स्कूटर’! TVS पासून बजाज पर्यंत; पाहा कोण आहे अव्वल आणि कोण आहे ‘ऑन द वे’
Follow Us
Follow Us:
  • TVS ने ऑगस्टमध्ये ४८,८७३ युनिट्स विकून २७ टक्के बाजारहिस्स्यासह अव्वल स्थान पटकावले.
  • बजाजने चेतकच्या जोरावर ४१,०१९ युनिट्स विकत २३५ टक्के वार्षिक वाढ नोंदवली.
  • मोटोव्हॉल्टने १,३६५ युनिट्स विकून तब्बल ५०९ टक्के वार्षिक वाढीसह दहावे स्थान मिळवले.
या ऑगस्ट महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरची तुफान विक्री झालेली आपल्याला आलेल्या आकड्यांवरून दिसत आहे.  याच एकूण आकडेवारी मध्ये  टीव्हीएस मोटर कंपनीने सर्वाधिक विक्री नोंदवत भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या काळात बजाज ऑटोने तब्बल २३५ टक्के वार्षिक वाढ नोंदवत दुसरं स्थान मिळवले.

इलेक्ट्रिक दुचाकी बाजाराची सविस्तर माहिती

ऑगस्ट २०२६ मध्ये टीव्हीएस मोटर कंपनीने ४८,८७३ युनिट्सच्या नोंदणीसह बाजारपेठेत २७ टक्के हिस्सा व्यापला आहे. कंपनीच्या विक्रीत ऑगस्ट २०२५ च्या तुलनेत ९१ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे, मात्र जुलै २०२६ मधील ५५,८२३ युनिट्सच्या तुलनेत मासिक विक्रीत १२ टक्क्यांची घसरण झाली आहे. iQube आणि Orbiter या मॉडेल्सने या विक्रीत महत्त्वाचा वाटा उचलला आहे.

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बजाज ऑटोने ४१,०१९ युनिट्सची विक्री केली आहे. चेतक मॉडेलच्या जोरावर बजाजने तब्बल २३५ टक्के वार्षिक वाढ नोंदवत २२ टक्के बाजारपेठ काबीज केली आहे.

तीसऱ्या क्रमांकावर असलेल्या अथेर एनर्जीने ऑगस्ट महिन्यात २८,७०८ युनिट्सची विक्री केली असून, ही ४९ टक्के वार्षिक वाढ आहे. बाजारात अथेरचा हिस्सा १६ टक्के आहे.

चौथ्या स्थानावर असलेल्या हिरो मोटोकॉर्पच्या ‘विडा’ ब्रँडने १८,९७८ युनिट्सची नोंदणी केली असून, त्यात ३८ टक्के वार्षिक वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, कधीकाळी अव्वल स्थानी असणारी ओला इलेक्ट्रिक १३,८४९ युनिट्सच्या विक्रीसह पाचव्या स्थानावर घसरली आहे. ओलाच्या विक्रीत वार्षिक २९ टक्के आणि मासिक ३ टक्क्यांची घसरण झाली आहे.

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

इतर प्रमुख ब्रँड्समध्ये ग्रीव्हज ई-मोबिलिटी ८,६१२ युनिट्ससह सहाव्या स्थानावर आहे, ज्याने ८९ टक्के वार्षिक वाढ नोंदवली आहे. रिव्हर मोबिलिटीने आपल्या ‘इंडि’ स्कूटरच्या ५,१३४ युनिट्सची विक्री करत १७० टक्के वार्षिक वाढ मिळवली आहे. बी-गाउस ऑटो ४,८४४ युनिट्स आणि १८० टक्के वाढीसह आठव्या स्थानावर आहे.

यादीत शेवटी सिम्पल एनर्जी १,६३५ युनिट्ससह नवव्या स्थानावर, तर मोटोव्हॉल्ट मोबिलिटी १,३६५ युनिट्सच्या विक्रीसह दहाव्या स्थानावर आहे. मोटोव्हॉल्टने ५०९ टक्के इतकी मोठी वार्षिक वाढ नोंदवली आहे.

Web Title: Top ten electric scooters august 2026 sales ranking auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या
1

फोक्सवॅगनच्या गाड्यांवर मिळवा ६ लाखांची बंपर सूट! या सप्टेंबर मध्ये कंपनीच्या मोठ्या ऑफर्स! जाणून घ्या

१० वर्षांनंतर ‘OG’ हिमालयनचा नवा अवतार! रॉयल एनफिल्ड Himalayan 440 लाँच; ₹२.२९ लाखांत क्लासिक ॲडव्हेंचर बाईकची रिएंट्री
2

१० वर्षांनंतर ‘OG’ हिमालयनचा नवा अवतार! रॉयल एनफिल्ड Himalayan 440 लाँच; ₹२.२९ लाखांत क्लासिक ॲडव्हेंचर बाईकची रिएंट्री

Skoda Octavia RS Relaunched: स्कोडा ऑक्टाव्हिया RS भारतात पुन्हा लाँच; ५६.६९ लाखांच्या किंमतीत ५० युनिट्स उपलब्ध
3

Skoda Octavia RS Relaunched: स्कोडा ऑक्टाव्हिया RS भारतात पुन्हा लाँच; ५६.६९ लाखांच्या किंमतीत ५० युनिट्स उपलब्ध

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार
4

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.