GST कमी झाल्यास देशातील सर्वात स्वस्त कारची किंमत किती होईल? (फोटो सौजन्य: @Arjit_Garg)
अनेकदा कार खरेदी करताना त्यावर जास्तीतजास्त डिस्काउंट कसे मिळेल याचा विचार कार खरेदीदार करत असतात. यातही कारवरील टॅक्स जास्त असल्याने एक्स शोरूम किंमत आणि ऑन रोड किंमतीत फरक दिसून येतो. अशातच आता केंद्र सरकार छोट्या कारवरील टॅक्स कमी करण्याच्या तयारीत दिसत आहे.
या दिवाळीत सरकार अनेक गोष्टींवरील GST कमी करण्याच्या विचार करत आहे. अशा परिस्थितीत, कारवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी केला जाऊ शकतो, म्हणजेच लोकांना थेट 10% जीएसटीपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. जर तुम्ही येत्या काळात मारुती अल्टो खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर GST कमी झाल्यानंतर कारची नवी किंमत काय असू शकते? त्याबद्दल जाणून घेऊयात.
Tata Motors ग्राहकांवर मेहेरबान! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळताय लाखोंचे डिस्काउंट
Maruti Suzuki Alto K10 ची सध्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.23 लाख रुपये आहे. सध्या त्यात 29% टॅक्स म्हणजेच 1.22 लाख रुपये जोडले आहेत. जर जीएसटी 18% पर्यंत कमी केला तर टॅक्स म्हणून फक्त 80,000 रुपये होईल. म्हणजेच, ग्राहकांना मारुती अल्टोवर 420000 रुपयांपर्यंत बचत मिळेल.
मारुती अल्टो K10 ही कंपनीच्या नव्या आणि मजबूत Heartect प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या कारमध्ये K-Series 1.0 लिटर ड्युअल जेट आणि ड्युअल VVT इंजिन दिले असून, ते 66.62 PS इतकी पॉवर आणि 89 Nm टॉर्क निर्माण करते.
याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटला प्रति लिटर 24.90 किमी मायलेज मिळते, तर मॅन्युअल व्हेरिएंट 24.39 किमी प्रति लिटर इतके अंतर पार करतो. CNG व्हेरिएंटच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ही कार प्रति किलो 33.85 किमीचे मायलेज देते.
मारुतीने अल्टो K10 मध्ये अनेक आधुनिक फीचर्सची भर घातली आहे, ज्यामुळे ही कार आधीपेक्षा अधिक स्मार्ट आणि सुरक्षित ठरते. या कारमध्ये आता 6 एअरबॅग्स स्टँडर्ड स्वरूपात दिले जातात, जे या सेगमेंटसाठी एक मोठा बदल मानला जातो. कारमध्ये 7-इंच फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असून ते Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते.
याशिवाय, USB, ब्लूटूथ आणि AUX सारखे इनपुट पर्यायदेखील उपलब्ध आहेत. यात नवीन मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील दिले असून, त्यावर माउंटेड कंट्रोल्स बसवलेले आहेत, ज्यामुळे ड्रायव्हिंग आणखी सोपे होते. हे सर्व फीचर्स याआधी S-Presso, Celerio आणि WagonR सारख्या मॉडेल्समध्ये उपलब्ध होते, पण आता ते अल्टो K10 मध्येही देण्यात आले आहेत.