फोटो सौजन्य: @CitroenIndia (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट विदेशातील ऑटो कंपन्यांसाठी व्यापाराचे एक विशेष आणि महत्वाचे केंद्र आहे. म्हणूनच तर देशात अनेक ऑटो कंपन्या दमदार कार ऑफर करत असतात. आता लवकरच फ्रेंच ऑटो कंपनी Citroen भारतात त्यांची नवीन कार लाँच करणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ही कार फक्त 11,000 रुपयात बुक करू शकता.
सिट्रोएनने घोषणा केली आहे की त्यांच्या आगामी Basalt X रेंजसाठी भारतात प्री-बुकिंग सुरू झाले आहे. ग्राहक कंपनीच्या डीलरशिप किंवा अधिकृत वेबसाइटवरून फक्त 11 हजार रुपयांची बुकिंग रक्कम देऊन कार बुक करू शकतात. सिट्रोएनच्या “न्यू चेंज 2.0” धोरणाचा भाग म्हणून बेसाल्ट एक्स सादर केली जात आहे.
Tata Harrier EV चा ‘हा’ फिचर सुरु झाला अन् होत्याचं नव्हतं झालं! अगदी काही सेकंदातच गमावला जीव
कंपनीने आधीच C3X बाजारात लाँच केली आहे. ते स्टॅंडर्ड C3 वर आधारित आहे, परंतु आता त्यात काही नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. Citroën C3X ला प्रॉक्सी-सेन्स पॅसिव्ह एंट्री आणि पुश स्टार्ट सिस्टम मिळते, जी त्याच्या सेगमेंटमध्ये प्रथमच हँड्स-फ्री ॲक्सेस देते.
या SUV मध्ये स्पीड लिमिटरसोबत क्रूझ कंट्रोल आणि कंपनीचे नवे HALO 360-डिग्री कॅमेरा सिस्टीम दिले आहे, जे एकूण सात वेगवेगळे व्ह्यूइंग अँगल उपलब्ध करून देते. तसेच यात ऑटो-डिमिंग इनसाइड रियर-व्यू मिरर, LED व्हिजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, प्रोजेक्टर फॉग लॅम्प, LED DRL आणि LED केबिन लाइटिंगची सुविधाही आहे.
Tata Motors ग्राहकांवर मेहेरबान! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळताय लाखोंचे डिस्काउंट
इंटिरियरमध्ये लेदर-फिनिश्ड इन्स्ट्रुमेंट पॅनेल आणि 10.25-इंच Citroen Connect टचस्क्रीन देण्यात आले आहे, जे वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट करते. याशिवाय यात एअर-कंडिशनिंग, रिअर USB Type-C चार्जिंग पोर्ट यांसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने, Citroen C3X मध्ये 6 एअरबॅग्स, Electronic Stability Program (ESP), EBDसह ABS, हिल होल्ड असिस्ट, ISOFIX माउंट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि हाय-स्पीड अलर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.
यातही HALO 360-डिग्री कॅमेरा सिस्टीम काही व्हेरिएंट्समध्ये ॲड-ऑन म्हणून दिले आहे. Citroen Basalt X मध्ये 1.2-लिटर, 3-सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळेल, जे ट्रान्समिशनच्या पर्यायांनुसार 108 BHP पॉवर आणि 205 Nm टॉर्क निर्माण करू शकते. या कारमध्ये 470 लिटर बूट स्पेस आणि 180 मिमी ग्राउंड क्लीयरन्स असेल.