
फोटो सौजन्य: @vishalahlawat92/ X.com
टोयोटा भारतात अनेक सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करते. कंपनीने Toyota Urban Cruiser Ebella ही इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून सादर केली आहे. चला या कारच्या फीचर्स आणि पॉवरफुल बॅटर आणि मोटरबद्दल जाणून घेऊयात.
1 लाख रुपयांच्या आत बाईक शोधताय? ‘या’ पर्यायांवर एकदा नजर फिरवाच
टोयोटाने अर्बन क्रूझर एबेला ही इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून सादर केली आहे. ही कंपनीची भारतात सादर केलेली पहिली ऑल-इलेक्ट्रिक (BEV) एसयूव्ही आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत. यामध्ये फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, अँबियंट लाइटिंग, स्लाईड आणि रिक्लाइन रिअर सीट्स, वायरलेस मोबाईल चार्जर, जेबीएल ऑडिओ सिस्टम, लेव्हल-2 एडीएएस, 360-डिग्री कॅमेरा, सात एअरबॅग्ज, ड्युअल-टोन इंटीरियर, 10.1-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, एलईडी लाईट्स आणि 18-इंच अलॉय व्हील्स यांचा समावेश आहे.
टोयोटा एबेला ईव्ही दोन बॅटरी पर्यायांसह देते: 49 किलोवॅट प्रति तास आणि 61 किलोवॅट प्रति तास. ही बॅटरी एका चार्जवर 543 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. त्याची मोटर 106 ते 128 किलोवॅट पॉवर आणि 189 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. तसेच, कंपनी या कारच्या बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी देत आहे.
Ola आणि Ather साठी नवा धक्का! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची 100+ किमी रेंज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
कंपनीने या एसयूव्हीची किंमत अजून तरी जाहीर केलेली नाही. मात्र, या कारची बुकिंग तुम्ही 25000 रुपये भरून करून शकता.
टोयोटाने इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये अर्बन क्रूझर एबेला सादर केली आहे. लाँच झाल्यावर, ही कार थेट Hyndai Creta Electric, Mahindra XUV 3XO आणि MG Windsor EV सोबत स्पर्धा करणार आहे.