
Toyota Hiluxचं ‘रेस्क्यू व्हॅन’मध्ये रूपांतर! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
टोयोटा हिलक्स म्हटलं की डोळ्यासमोर येते ती एकदम दणकट, कुठेही जाऊ शकणारी गाडी. डोंगर, दगड, चिखल कुठेही ही गाडी जाते. आतापर्यंत ही गाडी लोक हौस म्हणून किंवा सामान वाहण्यासाठी घेत होते. पण आता या गाडीला एक नवीनच काम मिळालं आहे, लोकांचे जीव वाचवण्याचं काम. Toyota Hilux
अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा म्हणजे AFES ने आपल्या ताफ्यात 15 टोयोटा हिलक्स गाड्या घेतल्या आहेत. पण या साध्या गाड्या नाहीत, यांना पूर्णपणे बदलून अग्निशमन आणि बचाव कार्यासाठी तयार केलं आहे. जिथे मोठी अग्निशमन गाडी जाऊ शकत नाही, तिथे ही हिलक्स जाईल.
त्याचं कारण आहे ते इंजिन आणि गाडीचे मॉडेल. या गाडीत 2.8 लिटरचं टर्बो-डिझेल इंजिन असून 204 HP पॉवर आणि 500 Nm टॉर्क देतं. गाडीची बॉडी लॅडर-फ्रेमवर बनलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4×4 चारही चाकात पॉवर आहे. एखादी इमारत कोसळली आणि त्याठिकाणी रस्त्यावर सगळीकडे ढिगारा असेल अशावेळी अग्निशमन दलाची मोठी गाडी जात नाही. अशावेळी ही हिलक्स छोटी गाडी जाऊ शकते. त्यामुळेच महापालिकेने या गाडीला निवडले आहे. या गाड्या फक्त आग विझवणार नाहीतर बचावकार्य, अपघातात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सुद्धा होऊ शकतो.
या 15 गाड्यांसाठी किती खर्च आला? तर अहमदाबाद महापालिकेने या 15 गाड्यांसाठी जवळपास 19.74 कोटी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान एका गाडीमागे तब्बल एक कोटीपेक्षा जास्त खर्च केला विशेष म्हणजे या जुन्या मॉडेलच्या हिलक्स आहेत, नवीन फेसलिफ्ट वाला मॉडेल नाही. तरी पण त्यांना खास बनवून घेतलं आहे.एवढंच नाही तर महापालिकेने आणखी 10 बचाव बोटी पण घेतल्या आहेत, त्यासाठी 3.40 कोटी रुपये खर्च केले आहेत. पूर आला तर पाण्यातून पण लोकांना वाचवता येईल. एकूणच आपत्तीच्या वेळी तयारी पूर्ण ठेवली आहे.
एक छोटं हॉस्पिटलचया गाड्यांना असं सजवलं आहे की त्या एक छोटं बचाव केंद्रच वाटतील.गाडीत हायड्रॉलिक कटर आणि स्प्रेडर आहे, म्हणजे जर अपघातात गाडीचा दरवाजा जाम झाला असेल किंवा इमारत पडून कोणी अडकलं असेल तर लोखंड कापून बाहेर काढता येईल. जड ढिगारा काढण्यासाठी वेल्डिंग आणि कटिंग मशीन पण आहे.
ई-स्कूटरच्या निर्यातीत ‘या’ कंपनीचा धुमाकूळ! TVS, Bajaj, Hero अन् Atherलाही टाकलं मागे
रात्रीच्या वेळी किंवा अंधारात काम करण्यासाठी गाडीवर मोठा टेलिस्कोपिक लाईट लावला आहे, ज्यात हाय-पॉवर LED फ्लडलाईट आहेत. म्हणजे अंधारात पण दिवसासारखा उजेड पडेल.मागच्या बाजूला एक खास कप्पा बनवला आहे, त्यात दोरखंड, लाईफ जॅकेट, प्रथमोपचाराचं साहित्य सगळं ठेवलं आहे. रस्ता अपघात असो, इमारत कोसळणं असो, पूर असो किंवा लिफ्टमध्ये कोणी अडकलं असो, ही गाडी सगळीकडे धावून जाईल.
पहिल्या एक तासात जर मदत मिळाली तर जीव वाचण्याचे चान्स जास्त असतात, यालाच गोल्डन अवर म्हणतात. आणि हिलक्स त्याच गोल्डन अवरमध्ये घटनास्थळी पोहोचून जीव वाचवणार आहे. मोठ्या गाड्यांपेक्षा ही लहान आणि वेगवान असल्यामुळे अहमदाबादच्या अरुंद गल्ल्यांमध्ये पण ती सहज जाईल.