फोटो सौजन्य: iStock
भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांना मोती मागणी मिळत आहे. त्यामुळेच तर ज्या ऑटो कंपन्या पूर्वी फक्त डिझेलवर चालणाऱ्या कार उत्पादित करत होत्या, त्याच आता इलेक्ट्रिक कार देखील मार्केटमध्ये लाँच करत आहे. वाढत्या इंधनाच्या किंमतीमुळे देखील ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना जास्त प्राधान्य देत आहे. आता टोयोटा कंपनी देखील ईव्ही सेगमेंटमध्ये 7 Seater MPV आणायच्या तयारीत आहे.
टोयोटा, जपानची आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी, अनेक देशांमध्ये वाहने विकते. कंपनीने फेब्रुवारी 2025 मध्ये इंडोनेशिया मोटर शो दरम्यान त्यांच्या 7 सीटर एमपीव्हीच्या ईव्ही व्हर्जनचे प्रदर्शन केले आहे. ICE व्हर्जनच्या तुलनेत त्यात कोणते बदल केले आहेत? टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ईव्ही भारतात आणता येईल का? चला याबद्दल आपण जाणून घेऊया.
एलोन मस्क आणि पंतप्रधान मोदींची भेट, आता Tesla च्या ‘या’ कार भारतात एंट्री मारण्यास सज्ज?
टोयोटा भारतात इनोव्हा क्रिस्टा 7 सीटर एमपीव्ही म्हणून विक्रीसाठी सादर करत आहे. सध्या, कंपनी ही गाडी डिझेल इंजिनसह आणते. पण लवकरच ही कार ईव्ही व्हर्जनमध्येही आणण्याची तयारी सुरू आहे. इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या मोटर शो दरम्यान कंपनीने त्याची कॉन्सेप्ट व्हर्जन सादर केली आहे.
Toyota Innova Crysta BEV कॉन्सेप्ट व्हर्जन इंडोनेशिया मोटर शोमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. त्याची रचना भारतात उपलब्ध असलेल्या इनोव्हा क्रिस्टा डिझेलसारखीच आहे. पण EV चा पुढचा ग्रिल बंद ठेवण्यात आला आहे आणि ग्राफिक्सच्या मदतीने वेगळा लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कारमधील लाईट्समध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत, तसेच कनेक्टेड एलईडी डीआरएल देखील देण्यात आले आहेत. एमपीव्हीला काळे छत आणि खांब तसेच काळे आवरण देण्यात आले आहे.
रिपोर्ट्सनुसार, टोयोटा यामध्ये 59.3 किलोवॅट क्षमतेची बॅटरी देऊ शकते. याशिवाय, त्यात बसवलेल्या मोटरमधून ते 134 किलोवॅट पॉवर आणि 700 न्यूटन मीटर टॉर्क मिळवू शकते. कारमध्ये 16 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. सध्या, त्याची रेंज आणि चार्जिंग वेळ वगळता, ती फक्त एका बॅटरी पॅकसह लाँच केली जाईल की भविष्यात त्याच्या उत्पादन आवृत्तीमध्ये अधिक बॅटरी पॅक पर्याय आणले जाऊ शकतात याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा बीईव्ही सध्या इंडोनेशिया मोटर शोमध्ये केवळ कॉन्सेप्ट व्हर्जन म्हणून प्रदर्शित करण्यात आली आहे. सध्या, या कारला कॉन्सेप्टपासून उत्पादनाकडे जाण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. ही कार भारतात आणली जाईल की नाही याबद्दल कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण भारतात ज्या पद्धतीने ईव्हीची विक्री वाढत आहे, त्यामुळे टोयोटा भविष्यात ती सादर करू शकते.