Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो 2026 मध्ये Toyota Kirloskar Motor चा सहभाग; दळवी म्‍हणाले, “सरकारचे…”

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने नुकतेच सरकारसोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली, ज्‍यासह राज्‍यामध्‍ये संरचित व मोठ्या प्रमाणात कौशल्‍य विकास परिसंस्‍थेच्‍या विकासाला साह्य करण्‍यासाठी सरकारसोबत सहयोग अधिक दृढ केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 09, 2026 | 09:44 PM
अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो 2026 मध्ये Toyota Kirloskar Motor चा सहभाग; दळवी म्‍हणाले, “सरकारचे…”
Follow Us
Close
Follow Us:

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरचा अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो २०२६ मध्‍ये सहभाग
छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा प्रांतामधील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन
महाराष्‍ट्र सरकारसोबत सहयोगाने प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो 2026 मध्‍ये सहभाग घेतला, जेथे महाराष्‍ट्रातील कौशल्‍य विकास उपक्रमांच्‍या माध्‍यमातून शाश्वत गतीशीलता, जबाबदार उत्‍पादन आणि तरूणांचे सक्षमीकरण करण्‍याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. या एक्‍स्‍पोमध्‍ये सहभाग घेण्‍यासह टोयोटा फ्लेक्‍स-फ्यूएल स्‍ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल (एसएचईव्‍ही) तंत्रज्ञानाच्‍या क्षमतेला प्रकाशझोतात आणत आहे. एक्‍स्‍पोमधील पॅव्हिलियनमधून उद्योग सहयोग आणि तंत्रज्ञानाबाबत जागरूकतेप्रती टीकेएमचा केंद्रित दृष्टिकोन देखील दिसून आला, जो भारताच्‍या ऊर्जा परिवर्तन ध्‍येयांशी संलग्‍न आहे.

अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो २०२६ छत्रपती संभाजीनगर व मराठवाडा प्रांतामधील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन आहे, जे दर तीन वर्षांनी एकदा आयोजित केले जाते. आघाडीची उद्योग संस्‍था एमएएसएसआयए (मराठवाडा असोसिएशन ऑफ स्‍मॉल-स्‍केल इंडस्‍ट्रीज अँड अॅग्रीकल्‍चर) महाराष्‍ट्र सरकारसोबत सहयोगाने या प्रदर्शनाचे आयोजन करते.

टेक्‍नॉलॉजी पॅव्हिलियनमध्‍ये टीकेएमने हायक्रॉस फ्लेक्‍झी-फ्यूएल स्‍ट्राँग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकल (एफएफव्‍ही एसएचईव्‍ही)सह प्रगत वेईकल तंत्रज्ञानांच्‍या उत्‍कृष्‍ट प्रदर्शनाला सादर केले. यासह टीकेएमचा दृष्टिकोन दिसून आला, ज्‍यामधून शाश्वत गतीशीलतेमध्‍ये संतुलन राखणारे कार्बन न्‍यूट्रॅलिटी संपादित करण्‍याप्रती बहु-मार्गीय दृष्टिकोनावर केंद्रित तत्त्व दिसून येते.

या एक्‍स्‍पोमधील आपला सहभाग अधिक दृढ करत टीकेएमने उद्योग व शैक्षणिक संस्‍थांमधील प्रतिनिधींसाठी टोयोटा कल्‍चरवर सत्राचे आयोजन केले. या सत्रामध्‍ये दर्जा-केंद्रित उत्‍पादन, सतत सुधारणा, कौशल्‍य विकास आणि ग्राहक केंद्रित नेतृत्‍व या टीकेएमच्‍या मुलभूत मूल्‍यांना दाखवण्‍यात आले, ज्‍यांचा महाराष्‍ट्रातील दीर्घकालीन सहयोग अधिक प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे.

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरचे चीफ कम्‍युनिकेशन ऑफिसर, वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष व संचालक सुदीप दळवी म्‍हणाले, ”टोयोटा किर्लोस्‍कर मोटर महाराष्‍ट्र सरकारचे राज्‍यातील आमच्‍या ग्रीनफिल्‍ड उत्‍पादन प्रकल्‍पाला सतत पाठिंबा देण्‍यासाठी आभार व्‍यक्‍त करते. आमची आगामी सुविधा राज्‍यातील टीकेएमच्‍या ऑपरेशनल उपस्थितीला अधिक वाढवेल, जेथे स्‍थानिकीकरणावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्‍यात येईल. तसेच स्‍थानिक विकासासाठी अधिक संधी निर्माण करण्‍यात येतील. अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पोमधील सहभागामधून प्रांतामध्‍ये सुरू असलेले सहयोगात्‍मक उपक्रम दिसून येतात, तसेच महाराष्‍ट्रामध्‍ये शाश्वत विकास, नाविन्‍यता आणि सामुदायिक सक्षमीकरणाला चालना देण्‍याप्रती आमची कटिबद्धता देखील दिसून येते. टीकेएमने आपल्‍या संरचित कौशल्‍य विकास व सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्रात सतत मुलभूत क्षमता निर्माण करण्‍यावर आणि शैक्षणिक परिसंस्‍था प्रबळ करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रयत्‍नांना पूरक म्‍हणून आम्‍ही तंत्रज्ञान उपक्रम प्रगत करत राहू, जे शुद्ध गतीशीलता आणि अधिक कार्यक्षम पॉवरट्रेन यंत्रणांना पाठिंबा देतील.”

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरने नुकतेच महाराष्‍ट्र सरकारसोबत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली, ज्‍यासह राज्‍यामध्‍ये संरचित व मोठ्या प्रमाणात कौशल्‍य विकास परिसंस्‍थेच्‍या विकासाला साह्य करण्‍यासाठी सरकारसोबत सहयोग अधिक दृढ केला आहे. याव्‍यतिरिक्‍त औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांचे सक्षमीकरण करण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. तसेच, शिक्षणावरील आपल्‍या सीएसआर फोकसचा भाग म्‍हणून टीकेएमने छत्रपती संभाजीनगरमधील ११ सरकारी शाळांमध्‍ये पायाभूत सुविधा व शैक्षणिक सुविधा अपग्रेड केल्‍या आहेत आणि स्‍थानिक समुदायांसाठी शैक्षणिक वातावरणांना सुधारण्‍याप्रती योगदान देत आहे.

Web Title: Toyota kirloskar motor is participating in advantage maharashtra expo 2026 chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 09:44 PM

Topics:  

  • automobile news
  • Chhatrapati Sambhajinagar
  • toyota

संबंधित बातम्या

Ajanta Polluted Water Supply: अजिंठ्यात दूषित पाण्याचा विळखा! महिनाभरापासून व्हॉल्व्हला गळती, ग्रामपंचायत दखल घेईना
1

Ajanta Polluted Water Supply: अजिंठ्यात दूषित पाण्याचा विळखा! महिनाभरापासून व्हॉल्व्हला गळती, ग्रामपंचायत दखल घेईना

Chhatrapati Sambhajinagar : अभ्यासाबरोबरचं स्वसंरक्षण काळाची गरज; विद्यार्थांना करुन दिली शस्त्रांची ओळख
2

Chhatrapati Sambhajinagar : अभ्यासाबरोबरचं स्वसंरक्षण काळाची गरज; विद्यार्थांना करुन दिली शस्त्रांची ओळख

Crime News: संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्…., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू
3

Crime News: संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्…., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू

राजकीय नेत्यांची आवडती SUV महागली! नवीन वर्षात किंमत 74000 रुपयांनी वाढली
4

राजकीय नेत्यांची आवडती SUV महागली! नवीन वर्षात किंमत 74000 रुपयांनी वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.