Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Factory Scam: संत एकनाथ साखर कारखान्यात महाघोटाळा; सचिन घायाळसह भागीदारांवर गुन्हा दाखल

पैठण येथील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात १६ कोटी ६२ हजार रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी सचिन घायाळ आणि भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 01, 2026 | 03:50 PM
संत एकनाथ साखर कारखान्यात महाघोटाळा

संत एकनाथ साखर कारखान्यात महाघोटाळा

Follow Us
Follow Us:

 

  • संत एकनाथ साखर कारखान्यात महाघोटाळा
  • सचिन घायाळसह भागीदारांवर गुन्हा दाखल
Sugar Factory Scam News: छत्रपती संभाजीनगर पैठण तालुक्यातील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना येथे आधुनिकीकरण व विस्तारीकरणासाठी उचललेल्या कर्जातून १६ कोटी ६२ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सचिन घायाळ शुगर प्रा. लि.चे संचालक सचिन विक्रमराव घायाळ व त्यांच्या भागीदारांविरुद्ध एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षणातून निधीचा विनियोग उद्देशबाह्य झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित कंपनीने बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून ३० कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेतले होते. हे कर्ज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच्या एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत थकबाकी निकाली काढण्यासाठी आणि कारखान्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी वापरणे अपेक्षित होते. त्यासाठी मुधलवाडी येथील कारखान्याची जमीन, इमारती, गोडाऊन व यंत्रसामग्री गहाण ठेवण्यात आली होती.

कर्ज वितरणानंतर १३.१७ कोटी रुपये राज्य सहकारी बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले; मात्र उर्वरित १६.६२ कोटी रुपये कंपनीच्या खासगी खात्यात वळवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. या निधीचा वापर कारखान्याच्या कामासाठी न करता विविध खासगी बँका व संस्थांकडे वर्ग करण्यात आल्याची नोंद आहे.

लेखापरीक्षणादरम्यान आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ८० अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव मांडण्यात आला. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या आदेशानंतर झालेल्या सखोल चौकशीत कर्जाचा विनियोग नियमानुसार न झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar हादरले! ४ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; शरीरावर १०० हून अधिक जखमा

नियमबाह्य व्यवहार

कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी कोणतेही सविस्तर अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया किंवा तांत्रिक अहवाल तयार करण्यात आले नव्हते. शासन नियुक्त यंत्रसामुग्री खरेदी समितीची पूर्वपरवानगी न घेता निधीचे व्यवहार करण्यात आल्याची नोंद चौकशीत आहे. संबंधित रक्कम खासगी बैंका आणि इतर संस्थांच्या खात्यांवर वळविण्यात आली.

लेखापरीक्षणात अडथळे

चाचणी लेखापरीक्षणादरम्यान वास्वार लेखी सूचना देऊनही आवश्यक दप्तर, लेखे व पुरावे उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. या निष्क्रयतेमुळे शंका अधिक गडद झाली आणि विशेष तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

विश्वास डळमळीत

कोटचवधींची मालमत्ता गहाण ठेवून उचललेले कर्ज कारखान्याच्या हितासाठी न वापरता इतरत्र वळविल्याचा ठपका संचालकांवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कागदपत्रांची छाननी सुरू असून आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेतला जात आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: थापटी तांड्यात मध्यरात्री गोंधळ; हवेत गोळीबार, 300 गावकऱ्यांचा संतप्त जमाव बेकाबू

Web Title: Major scam in sant eknath sugar factory case registered against sachin ghayal and partners

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • scam
  • Sugar Factory

संबंधित बातम्या

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!
1

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
2

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.