Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेतल्या प्रांगणात पुस्तकांचा मेळा! झाडाला लगडली पुस्तके, ढोरेगाव शाळेची अभिनव ‘ट्री लायब्ररी’

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ढोरेगाव येथील शाळेत ‘ट्री लायब्ररी’चा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. झाडांच्या फांद्यांवर पुस्तके टांगून विद्यार्थ्यांना निसर्गात वाचनाची संधी देण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 01, 2026 | 06:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘ट्री लायब्ररी’ अर्थात झाडावरील पुस्तके या संकल्पनेतून शाळेच्या आवारातील झाडांच्या फांद्यांवर दोरीच्या सहाय्याने विविध पुस्तके टांगण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात बसून वाचनाचा आनंद घेण्याची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. शाळेत प्रवेश करताच झाडांवर लटकलेली रंगीबेरंगी पुस्तके सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि ‘झाडाला पुस्तके लागली’ हे दृश्य विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करते.

Success Story : NASA सोडून भारतात परतले; 5 वेळा करिअर बदललं… कधीकाळी स्पेस सायंटिस्ट होते अंकुर वारिकू

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचवणे आणि वाचन संस्कृतीचा प्रसार करणे हा आहे. विद्यार्थी झाडाखाली सावलीत बसून आवडीची पुस्तके वाचतात आणि वाचन पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा झाडावर टांगतात. यामुळे स्वयंशिस्त, जबाबदारी आणि पुस्तकांविषयी जपणूक करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत आहे. शिक्षकांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ग्रामीण भागात वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी अशा प्रकारचे प्रयोग अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. ‘झाडाला लगडली पुस्तके’ ही संकल्पना विद्यार्थ्यांना पुस्तकांकडे आकर्षित करत असून वाचनाची गोडी वाढवण्यास मदत करत आहे. हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत असून शिक्षणाला नवा आयाम देत आहे.

निसर्गाच्या सानिध्यात वाचन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना वाढीस लागते, तर दुसरीकडे ज्ञानार्जनाची प्रक्रिया अधिक आनंददायी बनते. झाडांवर सहज दिसतील अशा पद्धतीने लटकवलेली पुस्तके विद्यार्थ्यांचे लक्ष वेधतात आणि वाचनाविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण करतात. पर्यावरण आणि शिक्षण यांचा सुंदर संगम साधणारा हा उपक्रम विशेष ठरत आहे.

एमबीएसाठी १. ८० लाख परीक्षार्थी! अर्जातील दुरुस्तीसाठी २८ फेब्रु. ते २ मार्चदरम्यान सुविधा

या उपक्रमासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुन्हे, तसेच शिक्षक राजेश हिवाळे, मनोज घुले, शंकर राऊत, बसवराज उद्दे, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाढवे, परमेश्वर मस्के, सचिन पाटसकर, अली बाकोदा, कल्याणी जगताप आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

Web Title: Dhoregaon schools innovative tree library in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.