Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान! विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश

सामाजिक उपक्रम राबवून महिला सन्मान प्रगती करिता विशेष प्रशिक्षण, महिला सबलीकरण, बचत गटाच्या माध्यमातून विशेष सहाय्य, दैनंदिन प्रक्रियेतून वेळ काढून महिलांना स्वतःच्या पायावर उभे काम केले जाते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 02, 2026 | 02:22 PM
देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान

देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान

Follow Us
Close
Follow Us:

 

  • देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान!
  • विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश
  • सहलीत अनेकांचा होता समावेश
दौलताबाद सात वर्षांपासून महिलांच्या पर्यटन सहलीबरोबर ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपण्याचा उपक्रम राबवला जातो. असा एक उपक्रम रविवारी दौलताबाद येथील दौलताबाद किल्ल्यावर पहावयास मिळाला. सामाजिक उपक्रम राबवून महिला सन्मान प्रगती करिता विशेष प्रशिक्षण, महिला सबलीकरण, बचत गटाच्या माध्यमातून विशेष सहाय्य, दैनंदिन प्रक्रियेतून वेळ काढून महिलांना स्वतःच्या पायावर उभे काम केले जाते. रविवारी सकाळी ३०० महिला एकत्रित येऊन देवगिरी किल्ल्याची स्वच्छता करण्याचे काम सुरु केले.

पर्यटनासाठी आलेल्यांनी देखील महिलांच्या या उपक्रमात हातभार लावत श्रमदान केले असल्याची माहिती धनश्री विखे पाटील यांनी उपक्रमाच्या शेवटी दिली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील लोणी येथील सिंधुताई एकनाथ विखे पाटील च्या १५० रणरागिणी महिला मंडळाच्या महिलांनी रविवारी देवगिरी किल्ल्यावर साफसफाई करीत अनोखा संदेश दिला.

संस्थेच्या शालिनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दौलताबाद किल्लातील स्वच्छता झाल्यानंतर म्हैसमाळ येथील बालाजी मंदिर व भद्रा मारुती मंदिरात स्वच्छता अभियान राबवले. उपक्रमाच्या शेवटी मनोगत व्यक्त करताना धनश्री विखे पाटील म्हणाल्य, सरंक्षणाच्या बाबतीत किल्ला उत्तम प्रकारे उदाहरण आहे.

शाळेतल्या प्रांगणात पुस्तकांचा मेळा! झाडाला लगडली पुस्तके, ढोरेगाव शाळेची अभिनव ‘ट्री लायब्ररी’

स्वच्छतेत घेतला जवळपास दीडशे महिलांनी सहभाग

रविवारी सकाळी दौलताबाद किल्ल्यावर पोहोचताच विविध देशांतील पाहुणे, हातात कॅमेरे आणि मोबाइल घेऊन समोर उभ्या असलेल्या हजारो वर्षांच्या इतिहासाकडे आश्चर्याने पाहत मोबाईल ध्ये कैद केले. या प्रतिनिधीना दौलताबाद किल्ल्याचे माहिती गाइड डॉ. सुभाष जाधव यांनी दिली त्यांना महाकोट, अंबरकोट, सरस्वती विहीर, हाथी हौद, भारतमाता मंदिर, चांद मिनार, कळकोट, चिनी महल, रंगमहाल, मेंढा तोप, अंधारी या ठिकाणी जाऊन भेट दिली व किल्ल्याचा इतिहास जाणून घेतले किल्ला खूपच व अभेद असल्याचे मत किल्ला भेट पुस्तकात नमूद केले. यावेळी पर्यटन उपसंचालक विजय जाधव, सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी अजीमुद्दीन शेख, सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी शोएब शाह, पर्यटन सहायक डॉ. शिवाजी गायकवाड, विक्रांत म्हात्रे, साहिल शेख, अमिता खटावकर, दीपाली डिकोस्टा यांची प्रमुख उपस्थिती होती.

सहलीत अनेकांचा होता समावेश

सहलीत आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एजंट, ब्लॉगर्स आणि इन्फ्लुएन्सर्सचा, पत्रकार यांचे समावेश असल्याने त्यांच्या माध्यमातून ऐतिहासिक अनुभव जागतिक पर्यटन समुदायापर्यंत पोहोचणार आहे. यामुळे अनेक देशातील पर्यटक पर्यटनासाठी येथे येतील व आपल्या छत्रपती संभाजीनगर पर्यटन स्थळ येथे रोजगार उपलब्ध होईल असे पर्यटक उपसंचालक विजय जाधव यांनी सांगितले आहे.

Web Title: 300 women warriors volunteered at devagiri fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • tourim

संबंधित बातम्या

Crime News: पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे; सहा जणींवर गुन्हा दाखल
1

Crime News: पोलिस ठाण्यातच महिलांची फ्री-स्टाईल हाणामारी, केस ओढत, एकमेकींचे फाडले कपडे; सहा जणींवर गुन्हा दाखल

Heat Wave News: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! पारा ४१ अंशांवर; दुपारी रस्ते ओस तर…
2

Heat Wave News: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा! पारा ४१ अंशांवर; दुपारी रस्ते ओस तर…

Chhatrapati Sambhajinagar: १० विषय समित्यांसाठी ८३ सदस्यांची बिनविरोध निवड, जिल्हा परिषदेचा अखेर ‘कोरम’ पूर्ण !
3

Chhatrapati Sambhajinagar: १० विषय समित्यांसाठी ८३ सदस्यांची बिनविरोध निवड, जिल्हा परिषदेचा अखेर ‘कोरम’ पूर्ण !

Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर! प्रशासनाकडून ‘हीट वेव्ह’चा इशारा; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर
4

Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर! प्रशासनाकडून ‘हीट वेव्ह’चा इशारा; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.