Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar News: नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध ‘अंगलट’! एमआयएमच्या लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्यासह एमआयएम नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई प्रस्तावित आहे. शहागंज अतिक्रमण हटाव मोहिमेत सरकारी कामात अडथळा आणल्याने ही परिस्थिती ओढवली आहे

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 02, 2026 | 03:07 PM
नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध 'अंगलट'!

नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध 'अंगलट'!

Follow Us
Follow Us:

 

  • नगरसेवकांना अतिक्रमण हटावचा विरोध ‘अंगलट’!
  • एमआयएमच्या लोकप्रतिनिधींवर अपात्रतेची टांगती तलवार
छत्रपती संभाजीनगर: विधानसभेत विरोधक नाही, यामुळे एकंदरीत सत्ताधाऱ्यांच्या हाती सत्तेची किल्ली आहे, असेच काहीसे चित्र संभाजीनगर महापालिकेत दिसण्याची शक्यता आहे. अतिक्रमणविरोधात हस्तक्षेप केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले. हाच मुद्दा उचलून सत्ताधारी नगरसेवकांनी एमआयएम पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई प्रस्तावित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्तांकडे लवकरच यादी दिली जाणार असून काही नगरसेवकांचे पद संपुष्टात आल्यास विरोधी पक्षाची धार कमी होऊन सत्ताधाऱ्यांची शक्ती वाढणार आहे. दरम्यान, उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि भाजप आमदार संजय केणेकर यांनी कठोर भूमिका घेत मनपा प्रशासनाकडून कारवाई केली जावी यासाठी शासनस्तरावरुन हालचाली सुरु केल्या आहेत,

संभाजीनगर शहरातील शहागंज परिसरात सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईदरम्यान एमआयएम नगरसेवक व त्यांच्या कार्यकत्यांनी हस्तक्षेप करत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या देत हाकलून लावल्याचे बोलेल जात आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. प्रकरणात एमआयएमच्या नगरसेवकांसह ३० ते ४० कार्यकर्त्यांवर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ठिणग्या उड्डू लागल्या आहेत.

२७ फेब्रुवारी रोजी १५ ते २० एमआयएम नगरसेवक व त्यांच्या ३० ते ४० कार्यकत्यांनी शहागंज परिसरात गर्दी करत अतिक्रमण हटाव कारवाईस विरोध केला. विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजिद यांच्यासह इतर नगरसेवकांनी शिवीगाळ करत महापालिकेला शहागंज परिसरात दादागिरी करू देणार नाही अशा धमकीवजा घोषणा दिल्याचा आरोप फियर्यादीत आहे. हातगाडीधारकांना पुन्हा रस्त्यावर व्यवसाय सुरू करण्यास विधावणी देण्यात आल्याचे देखील नमूद आहे.

Chhatrapati Sambhajinagar: नवनिर्वाचित नगरसेवकांचे पद धोक्यात? तिसरे अपत्य आणि बेकायदा बांधकामांच्या तक्रारींनी खळबळ

दरम्यान, आता या नगरसेवक व कार्यकत्यांचे पद काढून घेण्याबाचत कार्यवाही सुरु झाली आहे. विभागीय आयुक्तांकडे ही कारवाई होईल. इतक्या मोठ्या प्रमाणात असे झाल्यास राज्यातील ही पहिलीच घटना ठरणार आहे. यामुळे महापालिकेतील विरोधकांची धार कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यानंतर आता शहरातील राजकारण चांगलेच तापले असून एमआयएम आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. भाजपचे आ. केणेकर यांनी या घटनेचा समाचार घेतला, ते म्हणाले, हे कायदा आणि सुशासनाचे राज्य आहे, संभाजीनगरमध्ये त्यांना कितीही मोठे यश मिळाले असले तरी हे कायद्याचे राज्य आहे हे त्यांनी विसरू नये, जो कायदा मोडेल त्यांच्यावर कारवाई होणारच, अशी भूमिका केणेकर यांनी व्यक्त केली. तर आम्ही कोणतीही गुंडगिरी केलेली नाही, केवळ जाणीवपूर्वत आमच्यावर कारवाई केली असल्याचे एमआयमएम नगरसेवकांचे म्हणणे आहे. शहरात हप्तेवसुली करणे, दबाव निर्माण करणे, शहरात अराजकता निर्माण करण्याचे काम काहींच्या बाबतीत दिसून आल्याने ही कारवाई झालेली असल्याचा गंभीर आरोपही आ. केणेकर यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात पुढे काय होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

महापालिकेत नवे राजकीय समीकरण ?

जर अपात्रतेची कारवाई प्रत्यक्षात आली, तर महापालिकेतील संख्याबळावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ प्रशासकीय न राहता राजकीय गणिते बदलणारी ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शहागंज अतिक्रमण हटाव
मोहिमेमुळे आता कायदा विरुद्ध राजकारण असा संघर्ष उभा झाला असून, एमआयएम नगरसेवकांवरील अपात्रतेचा प्रस्ताव पुढील काही दिवसांत शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणार असल्याचे बोलले जात आहे.

शपथपत्राचा व कायद्याचा भंग

नगरसेवकानी उमेदवारी अर्जात अतिक्रमण हटविण्यास विरोध न करण्याचे शपबपत्र दिलेले असतानाही जाणीवपूर्वक सरकारी कामात अडथळा आणला, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीचा भंग करून लोकसेवकांना चमकावल्याप्रकरणी महापालिकेचे नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेता अब्दुल समीर साजिद, सय्यद उसामा काकासाहेब काकडे, अकिल अहेमद, फेरोज खान, मेराज खान, मो, वाजेद जाहगिरदार, सोहेल कुरैशी, मो, वसीम अलीम अहेमद मतीन पटेल यांच्यासह ३० ते ४० जणांवर सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान! विखे पाटील परिवाराच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा जपण्याचा अनोखा संदेश

Web Title: The sword of disqualification hangs over mims public representatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • corporators

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल
1

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचे टेन्शन वाढले! ईपीचे नकाशे ऑनलाईन; डीपी आराखड्यात तब्बल ४५० फेरबदल

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
2

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!
3

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
4

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.