फोटो सौजन्य: iStock
आपले स्वतःचे वाहन असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. आणि पहिली बाईक किंवा स्कूटर खरेदी करणे हे या स्वप्नपूर्तीची सुरुवात आहे. त्यात पहिली टू व्हीलर खरेदी करण्याचे समाधान हे काही औरच असते. देशातील ऑटो कंपन्या सुद्धा भारतीय ग्राहकांना अपेक्षित अशा उत्तम टू व्हीलर बाईक आणि स्कूटर ऑफर करत असतात. यामुळे दिवसेंदिवस या सेगमेंटमधील विक्री वाढताना दिसत आहे.
भारतातील टू-व्हीलर मार्केट हा जगातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. एप्रिल 2025 हा महिना भारतीय मार्केटसाठी खूप चांगला होता. या महिन्यात, भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये हिरो, होंडा, टीव्हीएस, बजाज, सुझुकी आणि रॉयल एनफील्ड सारख्या काही कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे, तर काहींच्या विक्रीत घट झाली आहे. टू व्हीलर मार्केटसाठी एप्रिल 2025 कसा होता त्याबद्दल जाणून घेऊया.
देशांतर्गत बाजारात दुचाकी कंपन्यांच्या एकूण 13,94,933 युनिट्स विकल्या आहेत. तर वार्षिक 16.76% आणि मासिक 12.08% वाढ झाली आहे. कोणत्या कंपनीच्या विक्रीत किती वाढ आणि घट झाली त्याबद्दल जाणून घेऊयात.
Honda Motorcycles: एप्रिल 2025 मध्ये देशांतर्गत विक्रीच्या यादीत ही कंपनी आधीच अव्वल स्थानावर आहे. कंपनीने 4,22,931 बाईक आणि स्कूटर विकून मार्केटमधील 30.32% शेअर काबीज केला आहे. त्याच वेळी, होंडाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 12.08% ची घट झाली आहे, परंतु मार्च 2025 च्या तुलनेत कंपनीने मासिक 5.36% ची वाढ नोंदवली आहे.
TVS Motor: एप्रिल 2025 मध्ये टीव्हीएसने देशांतर्गत विक्रीत दुसरे स्थान पटकावले आहे. कंपनीने त्यांच्या 3,23,647 बाईक आणि स्कूटर विकल्या आहेत. यासह, कंपनीने वार्षिक 7.36% वाढ आणि मासिक 8.74% वाढ साध्य केली आहे.
Hero MotoCorp: देशातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनीची विक्री एप्रिल 2025 मध्ये लक्षणीयरीत्या घटली आहे. कंपनीने 3,05,406 बाईक आणि स्कूटर्स विकल्या असून, ही विक्री मागील वर्षाच्या तुलनेत 2.76% नी कमी झाली आहे. मासिक तुलनेत ही घट तब्बल 44.43% इतकी आहे.
Hyundai आणि Tata ला मागे सोडत ‘या’ कंपनीच्या SUV वर ग्राहक पडलेत तुटून, विक्रीत दिसली मोठी वाढ
बजाज ऑटो: बजाज ऑटोच्या विक्रीत देखील घसरण झाली आहे. एप्रिल 2025 मध्ये कंपनीने 1,88,615 वाहने विकली. ही विक्री वार्षिक आधारावर 13.06% नी घसरली असली, तरी मासिक विक्रीत 2.7% ची सौम्य वाढ झाली आहे.
Suzuki Two Wheeler: एप्रिलमध्ये कंपनीने 95,214 बाईक आणि स्कूटर विकल्या असून, विक्रीत वार्षिक 8.12% आणि मासिक 9.95% वाढ झाली आहे.
रॉयल एनफील्ड: रॉयल एनफील्डने एप्रिल 2025 मध्ये 76,002 युनिट्सची विक्री करत वार्षिक 1.28% वाढ नोंदवली आहे. मात्र, मासिक आधारावर कंपनीच्या विक्रीत 12.68% घट झाली आहे.