
फोटो सौजन्य: X.com
भारतामध्ये 125cc सेगमेंट वेगाने वाढत आहे आणि याच कॅटेगरीमध्ये TVS Raider 125 आणि Bajaj Pulsar NS125 या दोन्ही बाईक्स तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. Pulsar NS125 त्याच्या स्पोर्टी लुक, परफॉर्मन्स आणि ॲडव्हान्स ABS फीचर्ससाठी ओळखली जाते, तर TVS Raider 125 प्रीमियम फीचर्स, स्मार्ट डिस्प्ले आणि आरामदायी राइडिंगमुळे पसंत केली जाते. मग प्रश्न असा की यात कोणती बाईक जास्त उत्तम? चला, सविस्तर जाणून घेऊया.
TVS Raider 125 च्या TFT DD व्हेरिएंटमध्ये दिलेला TFT डिजिटल कन्सोल प्रीमियम फील देतो. त्याचा कलर डिस्प्ले इंटरॲक्टिव असून ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल–मेसेज अलर्ट्स, तसेच टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन अशी आधुनिक फीचर्स मिळतात, ज्यामुळे याचे इंटरफेस अधिक मॉडर्न वाटते.
‘या’ 5 गोष्टी बनवतं Maruti Wagon R ला मध्यम वर्गीय कुटुंबाची आवडती कार
दुसरीकडे, नव्या Bajaj Pulsar NS125 मध्ये आता LCD डिजिटल कन्सोल दिला आहे. तो दिसायला मॉडर्न असला तरी फीचर्सच्या दृष्टीने TFT डिस्प्लेसारखा ॲडव्हान्स नाही. या विभागात Raider 125 अधिक आकर्षक आणि प्रीमियम भासते.
Raider 125 मध्ये Eco आणि Power असे दोन राइडिंग मोड दिले आहेत, जे परफॉर्मन्स आणि मायलेजचा संतुलित अनुभव देतात. यामध्ये असलेली iGo Assist Mild-Hybrid टेक्नॉलॉजी शहरातील स्टार्ट-स्टॉप ट्रॅफिकमध्ये राइड अधिक स्मूद आणि इंधन-कार्यक्षम बनवते.
त्याच्या तुलनेत Pulsar NS125 ही आपल्या सेगमेंटमधील पहिली बाईक आहे जी Road, Rain आणि Off-road मोडसह ABS सिस्टम देते. हे मोड विविध परिस्थितीत उत्तम कंट्रोल आणि सेफ्टी प्रदान करतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या बाबतीत NS125 पुढे दिसते, तर स्मूद आणि कम्फर्टेबल शहरातील राइडसाठी Raider 125 उत्तम पर्याय ठरते.
6 एअरबॅग्सची सेफ्टी आणि किंमत 3.49 लाखांपासून सुरु! ‘या’ Cars चा मार्केटमध्ये वेगळाच जलवा
दोन्ही बाइक्सची इंजिन क्षमता साधारण सारखीच आहे. Pulsar NS125 चे 124.45cc इंजिन 12 PS पॉवर आणि 11 Nm टॉर्क तयार करते. TVS Raider 125 चे 124.8cc इंजिन 11.4 PS पॉवर आणि 11.2 Nm टॉर्क जनरेट करते.
दोन्ही बाइक्समध्ये 5-speed गिअरबॉक्स दिला आहे. Raider चे वजन कमी असल्याने ती शहरात अधिक चपळ फील देते आणि चांगले मायलेजही देते.
TVS Raider 125 – सुमारे 95,600 रुपये
Pulsar NS125 – सुमारे 98,400 रुपये
किंमत, फीचर्स आणि परफॉर्मन्सचा विचार करता Raider 125 ही जास्त value-for-money बाईक ठरते.