फोटो सौजन्य: Gemini
भारतीय ग्राहक नेहमीच अशा कारच्या शोधात असतो, जी बजेट फ्रेंडली किमतीत उत्तम मायलेजही देईल. मार्केटमध्ये अशा अनेक कार्स आहेत, ज्यांना लाँच होऊन कित्येक वर्ष उलटली मात्र आजही त्यांच्या लोकप्रियतेत थोडी देखील कमी झालेली नाही. अशीच एक कार म्हणजे Maruti Suzuki Wagon R.
वॅगन आर ही मध्यमवर्गीय कुटुंबांची आवडती कार आहे. याची परवडणारी किंमत, कमी मेंटेनन्स आणि उत्तम मायलेज यामुळे ही कार तिच्या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक बनते. जर तुम्ही रोजच्या प्रवासासाठी किंवा कुटुंब सहलींसाठी वॅगन आर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बुकिंग करण्यापूर्वी येथे पाच गोष्टी जाणून घ्याव्यात.
Bajaj Chetak 3001 vs TVS iQube: रोजच्या वापरासाठी कोणता इलेक्ट्रिक स्कूटर बेस्ट?
Maruti Wagon R ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.99 लाख रुपये आहे. ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात किफायतशीर कारांपैकी एक मानली जाते. याचे EMI फक्त 5,000 पासून (5 वर्षांसाठी) सुरू होते. सेकंड-हँड मार्केटमध्येही या कारला उत्तम रीसेल व्हॅल्यू मिळते. CNG व्हर्जन निवडल्यास पेट्रोलच्या तुलनेत सुमारे 40% पर्यंत बचत होते. त्यामुळेच ही कार मिडल क्लास ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. व्हेरिएंटनुसार किंमती खाली दिलेल्या आहेत.
Maruti Wagon R चा 1.0L पेट्रोल इंजिन 24.35 kmpl पर्यंत आणि CNG व्हर्जन 34.05 km/kg पर्यंत माइलेज देते. 1.2L K-Series Petrol इंजिनसुद्धा उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. शहरातील जाम ट्रॅफिकमध्येही 20+ kmpl माइलेज सहज मिळू शकते. CNG किट ही फॅक्टरी-फिटेड असल्याने कोणतीही वॉरंटी समस्या उद्भवत नाही.
Mahindra XEV 9S चा डिझाइन झाला रिव्हील, ‘या’ दमदार फीचर्सने कारची शोभा वाढवली!
मारुतीचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यांचे सर्व्हिस नेटवर्क आणि स्वस्त स्पेअर पार्ट्स. Wagon R ची सर्व्हिस कॉस्ट प्रत्येकी 4,000–5,000 (प्रत्येक 10,000 km नंतर) इतकी आहे. भारतभर कंपनीचे 3,000+ सर्व्हिस सेंटर्स असल्यामुळे गावागावातही Wagon R ची लोकप्रियता जबरदस्त आहे.
2025 मॉडेल Wagon R मध्ये 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड म्हणून दिलेले आहेत. तसेच ABS विथ EBD आणि रियर पार्किंग सेन्सर्स हे सर्व वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. AMT वर्जनमध्ये हिल-होल्ड कंट्रोल दिले आहे. या सर्व फीचर्समुळे ही कार फॅमिली सेफ्टीच्या दृष्टीने अधिक सुरक्षित बनली आहे.
Tall Boy डिझाइनमुळे Wagon R मध्ये हेडरूम आणि लेगरूम हे बेस्ट-इन-क्लास मिळते. बूट स्पेस 341 लिटर असून हा सेगमेंटमधील सर्वात मोठा बूट आहे. फोल्डेबल रिअर सीट्समुळे अतिरिक्त सामान ठेवणे अधिक सोयीचे होते. तसेच हाइट-अॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीटमुळे ड्रायव्हिंग कम्फर्टमध्येही भर पडते.






