
TVS Star City Plus Discontinued After 12 Years (फोटो सौजन्य-AI एआय)
TVS Star City Plus Discontinued झाल्याचे समोर आले असून, टीव्हीएस मोटर कंपनीने भारतातील ही लोकप्रिय कम्युटर बाईक अगदी शांतपणे बंद केली आहे. कंपनीच्या ऑफीशियल वेबसाइटवरून स्टार सिटी प्लस हटवण्यात आली आहे. 2014 मध्ये लाँच झालेल्या या बाइकचा भारतीय प्रवास आता थांबला असल्याचे संकेत मिळत आहेत. कमी खर्चातील रोजच्या प्रवासासाठी ही बाईक अनेक वर्षे कस्टमरमध्ये ओळखली जात होती.
टीव्हीएस स्टार सिटी प्लस ड्रम आणि डिस्क अशा 2 व्हेरिएंटमध्ये विकली जात होती. एंट्री-लेव्हल कम्युटर बाइक असूनही यात LED हेडलॅम्प, टाइप-C USB चार्जिंग पोर्ट आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारखी फीचर्स देण्यात आली होती. 2021 मध्ये कंपनीने या बाइकला BS6 इंजिन अपडेट दिले होते. त्यामुळे उत्सर्जन नियमांनुसार बाइकला सुधारित करण्यात आले होते.
TVS ची ’82 Series Collection’ सादर! RR 310 ते Ronin 250 चे खास कॉन्सेप्ट मॉडेल्स आले जगासमोर!
या बाइकला सिंगल क्रॅडल ट्युब्युलर फ्रेमवर तयार करण्यात आले होते. पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे 5-स्टेप अॅडजस्टेबल प्रीलोड असलेले शॉक अॅब्झॉर्बर मिळत होते. तिचा व्हीलबेस 1,260 mm होता आणि 17-इंच ड्युरा ग्रिप टायर्स देण्यात आले होते. AHO म्हणजे ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि सिंक्रोनाइज्ड ब्रेकिंग टेक्नोलॉजीसारख्या सुविधाही यात होत्या.
स्टार सिटी प्लसमध्ये 109.7cc सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड पेट्रोल इंजिन दिले होते. हे इंजिन 7,350 rpm वर 8 bhp पॉवर आणि 4,500 rpm वर 8.7 Nm टॉर्क तयार करत होते. यासोबत 4-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला होता. भारतीय मार्केटमध्ये या बाइकला होंडा एचएफ डिलक्स, बजाज प्लॅटिना आणि होंडा शाइन 100 डीएक्सकडून स्पर्धा मिळत होती.
दरम्यान, टीव्हीएसने ऑक्टोबर 2026 मध्ये नवीन रेडॉन कम्युटर बाइक लाँच केली होती. तिची एक्स-शोरूम किंमत 67,100 ते 73,100 रुपये आहे. बेस, डिजी ड्रम आणि डिजी डिस्क असे 3 व्हेरिएंट मिळतात. नवीन रेडॉनमध्ये ग्लाइड थ्रू टेक्नोलॉजी, सेल्फ स्टार्ट आणि LED लाइटिंग देण्यात आले आहे. स्टार सिटी प्लसची जागा रेडॉन आणि स्पोर्टसारखी मॉडेल्स कितपत भरून काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्या रेडॉन आणि स्पोर्टची विक्री सुरू आहे.
Ans: होय. टीव्हीएस मोटर कंपनीने स्टार सिटी प्लसची भारतातील विक्री बंद केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवरूनही हे मॉडेल हटवण्यात आले आहे.
Ans: या बाइकमध्ये 109.7cc सिंगल-सिलिंडर, एअर-कूल्ड पेट्रोल इंजिन होते. ते 8 bhp पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क तयार करत होते. यात 4-स्पीड गिअरबॉक्स मिळत होता.
Ans: टीव्हीएस स्पोर्ट आणि रेडॉन या कम्युटर बाइकची विक्री सुरू आहे. 2026 रेडॉन बेस, डिजी ड्रम आणि डिजी डिस्क अशा 3 व्हेरिएंटमध्ये मिळते.