
Kia Carens and Clavis CNG Sales Cross 6,200 (फोटो सौजन्य-AI एआय)
Kia Carens CNG आणि Kia Carens Clavis CNG यांना भारतीय मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. कियाच्या या दोन्ही 3-रो MPV मॉडेल्सनी सप्टेंबर 2026 मध्ये लाँच झाल्यापासून पहिल्या 2 महिन्यांत मिळून 6,200 पेक्षा जास्त होलसेल युनिट्सची नोंद केली आहे. कंपनीने 19 नोव्हेंबर रोजी ही माहिती जाहीर केली. विशेष म्हणजे, हा आकडा डीलर्सना पाठवलेल्या गाड्यांचा असून प्रत्यक्ष ग्राहक नोंदणी किंवा डिलिव्हरीचा नाही.
किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, किआ कॅरेन्स CNG ची एक्स-शोरूम किंमत 12.12 लाख रुपये आहे. तर किआ कॅरेन्स क्लॅव्हिस CNG ची सुरुवातीची किंमत 12.39 लाख रुपये आहे. दोन्ही मॉडेल्सच्या बेस व्हेरिएंटमध्ये 27,000 रुपयांचा फरक आहे. कॅरेन्स CNG केवळ Premium (O) व्हेरिएंटमध्ये मिळते. तर क्लॅव्हिस CNG मध्ये HTE आणि HTE (O) असे 2 व्हेरिएंट्स दिले आहेत.
या दोन्ही MPV मध्ये 1.5-लिटर G1.5 पेट्रोल इंजिनवर आधारित CNG सेटअप देण्यात आला आहे. यासोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळतो. कंपनीने CNG इंधनासाठी इंजिनमध्ये आवश्यक बदल केले असून गॅस सिलिंडरचे वजन सांभाळण्यासाठी सस्पेन्शनमध्येही सुधारणा केली आहे. दोन्ही गाड्यांमध्ये 60-लिटरचा CNG सिलिंडर बसवण्यात आला आहे. डॅशबोर्डवर स्वतंत्र बटणाद्वारे पेट्रोल आणि CNG मोड बदलता येतो. तसेच 4.2-इंच कलर TFT डिस्प्लेवर CNG मध्ये किती अंतर कापता येईल, याची माहिती मिळते.
कियाने या गाड्यांच्या मागच्या सीटवरही सुधारणा केली आहे. तिसऱ्या रांगेतील सीटच्या बॅकरेस्टची रचना बदलून प्रवाशांना जास्त आराम मिळेल, याची काळजी घेण्यात आली आहे. क्लॅव्हिसमध्ये 6 आणि 7 सीट्सचे पर्याय मिळतात. याशिवाय कंपनीच्या Assured Buyback Programme अंतर्गत पात्र कस्टमर्सना 3 वर्षांनंतर 75 टक्क्यांपर्यंत रेसिड्यूअल व्हॅल्यू मिळू शकते. यासाठी ठरावीक किलोमीटर आणि करारातील अटी लागू असतील.
क्लॅव्हिसच्या इतर व्हेरिएंट्समध्ये ड्युअल 12.25-इंच स्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, बोस ऑडिओ आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारख्या सुविधा मिळतात. निवडक व्हेरिएंट्समध्ये 20 फंक्शन्स असलेली Level 2 ADAS प्रणालीही देण्यात आली आहे.
Ans: किआ कॅरेन्स CNG ची एक्स-शोरूम किंमत 12.12 लाख रुपये आहे. ही गाडी Premium (O) CNG व्हेरिएंटमध्ये मिळते.
Ans: किआ क्लॅव्हिस CNG ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.39 लाख रुपये आहे. यामध्ये HTE आणि HTE (O) असे 2 व्हेरिएंट्स मिळतात.
Ans: सप्टेंबर 2026 मध्ये लाँच झाल्यानंतर पहिल्या 2 महिन्यांत दोन्ही गाड्यांची एकत्रित होलसेल विक्री 6,200 युनिट्सच्या पुढे गेली आहे. हा आकडा डीलर्सना पाठवलेल्या गाड्यांचा आहे, प्रत्यक्ष ग्राहकांना झालेल्या डिलिव्हरीचा नाही.