Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Audi BMW Germany Strike: जर्मनीत ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या कारखान्यांमध्ये संप; वेतनवाढीसाठी कामगार आक्रमक!

जर्मनीतील वाहन उद्योगाला आता कामगार आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे. 1,18,000 पेक्षा जास्त कर्मचारी आधीच्या आंदोलनात सहभागी झाले होते; आता 24 तासांच्या संपामुळे कार प्रोडक्शन आणि पुरवठा साखळीवर काय परिणाम होणार, हा प्रश्न आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 20, 2026 | 03:28 PM
Audi BMW Germany Factory Workers Strike (फोटो सौजन्य-AI एआय)

Audi BMW Germany Factory Workers Strike (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • जर्मनीतील ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या कारखान्यांमध्ये वेतनवाढीच्या मागणीसाठी 24 तासांचा संप पुकारण्यात आला आहे.
  • आयजी मेटल संघटनेने कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 टक्के वाढ आणि नोकरीच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
  • फोक्सवॅगनच्या वेतन आणि कामाच्या तासांबाबतच्या प्रस्तावामुळे कामगार आणि व्यवस्थापनातील संघर्ष आणखी वाढला आहे.

जर्मनीतील Audi BMW संप प्रकरण चिघळले असून, वेतनवाढ आणि नोकरीच्या सुरक्षेच्या मागणीसाठी कामगारांनी 24 तासांच्या संपाची हाक दिली आहे. आयजी मेटल या कामगार संघटनेने ऑडी, BMWसह इतर औद्योगिक कंपन्यांच्या कारखान्यांमध्ये काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीच्या वाहन उद्योगावर आधीच कमी मागणी, वाढता खर्च आणि जागतिक स्पर्धेचा दबाव असताना या आंदोलनामुळे कंपन्यांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

ऑडीच्या इंगोलस्टाट येथील मुख्य कारखान्यात तसेच बीएमडब्ल्यूच्या म्युनिक, डिंगोल्फिंग आणि लँडशूट येथील प्लांटमध्ये संप होणार आहे. रॉबर्ट बॉश, झेडएफ फ्रेडरिकशाफेन यांसारख्या औद्योगिक कंपन्यांमधील कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. उत्तर जर्मनीतील काही कारखान्यांमध्येही संपाला पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे वाहननिर्मिती आणि संबंधित रिसोर्स चेनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Audi India Market Share: ऑडी इंडियाचे मार्केटमधील वर्चस्व दुप्पट करण्याचे लक्ष्य; 40 शोरूम्सचा प्लॅन तयार!

आयजी मेटल संघटनेची मागणी बव्हेरिया भागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 टक्के वाढ करण्याची आहे. याशिवाय प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि नोकऱ्या सुरक्षित ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे. दुसरीकडे, कंपन्यांनी पहिल्या 20 महिन्यांत कायमस्वरूपी वेतनवाढ न देण्याचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. त्यानंतर 1.3 टक्के वाढ देण्याची भूमिका कंपन्यांनी घेतली आहे.

वादाचे आणखी एक कारण म्हणजे कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे. फोक्सवॅगन व्यवस्थापनाने 35 तासांचा कामाचा आठवडा वाढवण्याची, पण त्यासाठी अतिरिक्त वेतन न देण्याची भूमिका मांडल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. 2027 आणि 2028 मध्ये वेतनवाढ रोखणे तसेच सुट्टीशी संबंधित अतिरिक्त रक्कम आणि सेवा कालावधीवर आधारित बोनस कमी करण्याचाही प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे.

BMW F 450 GS Sport भारतात लाँच! ₹5.90 लाख किंमत, Racing Red रंग आणि नवीन फीचर्स! पाहा अजून काय आहे खास

याआधी बव्हेरियामध्ये झालेल्या छोट्या संपांमध्ये 1,18,000 पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले होते. 2018 नंतर वेतनविषयक चर्चेदरम्यान आयजी मेटलने प्रथमच 24 तासांच्या संपाचा मार्ग स्वीकारला आहे. कंपन्यांनी जर्मनीतील कारखान्यांमध्ये गुंतवणूक आणि रोजगार टिकवण्याची हमी दिल्यास काही सामूहिक करारांमध्ये सवलत देण्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे. पण दोन्ही बाजूंमध्ये अद्याप सहमती झालेली नाही. हा संघर्ष किती काळ चालतो आणि त्याचा वाहन प्रोडक्शनवर किती परिणाम होतो, याकडे आता उद्योगाचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जर्मनीत ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या कारखान्यांमध्ये संप का होत आहे?

    Ans: वेतनवाढ, कर्मचाऱ्यांना मिळणारे फायदे, कामाचे तास आणि नोकरीची सुरक्षा या मुद्द्यांवरून कामगार संघटना आणि कंपन्यांमध्ये वाद सुरू आहे.

  • Que: आयजी मेटल संघटनेची वेतनवाढीची मागणी किती आहे?

    Ans: आयजी मेटल संघटनेने बव्हेरिया भागातील कर्मचाऱ्यांसाठी 5 टक्के वेतनवाढ आणि प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची मागणी केली आहे.

  • Que: या संपाचा वाहन प्रोडक्शनवर परिणाम होऊ शकतो का?

    Ans: होय. ऑडी आणि बीएमडब्ल्यूच्या कारखान्यांमधील काम थांबल्यामुळे वाहन प्रोडक्शनवर परिणाम होऊ शकतो. संबंधित पुरवठादार कंपन्यांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: Audi bmw germany strike wage dispute auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Audi
  • automobile
  • BMW

संबंधित बातम्या

VinFast Electric Scooters: व्हिएतनामची VinFast भारतात आणणार 3 इलेक्ट्रिक स्कूटर; 165 किमीपर्यंत मिळणार रेंज!
1

VinFast Electric Scooters: व्हिएतनामची VinFast भारतात आणणार 3 इलेक्ट्रिक स्कूटर; 165 किमीपर्यंत मिळणार रेंज!

Kia Carens CNG आणि Clavis CNG ची विक्री 2 महिन्यांत 6,200 पार!  ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद!
2

Kia Carens CNG आणि Clavis CNG ची विक्री 2 महिन्यांत 6,200 पार!  ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद!

Fortuner ला टक्कर देणारी Honda Avancier 4×4 मार्केटमध्ये दाखल! Hybrid इंजिन, इलेक्ट्रिक AWD फीचरसह नवीन SUV सादर
3

Fortuner ला टक्कर देणारी Honda Avancier 4×4 मार्केटमध्ये दाखल! Hybrid इंजिन, इलेक्ट्रिक AWD फीचरसह नवीन SUV सादर

New Hyundai Elantra 2027 Revealed: नवीन ह्युंदाई एलांट्रा मध्ये 157 PS Hybrid इंजिन, मोठी केबिन आणि नवीन टेक्नोलॉजीसह हायटेक फीचर्
4

New Hyundai Elantra 2027 Revealed: नवीन ह्युंदाई एलांट्रा मध्ये 157 PS Hybrid इंजिन, मोठी केबिन आणि नवीन टेक्नोलॉजीसह हायटेक फीचर्

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.