Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 20 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

VinFast Electric Scooters: व्हिएतनामची VinFast भारतात आणणार 3 इलेक्ट्रिक स्कूटर; 165 किमीपर्यंत मिळणार रेंज!

तामिळनाडूमध्ये प्रोडक्शन आणि देशभरात 50 पेक्षा जास्त डीलर्सचे नियोजन करून विनफास्ट भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये उतरणार आहे. कमी किंमत, फॅमिली वापर आणि स्पोर्टी राइडिंगसाठी वेगवेगळे मॉडेल्स आणून कंपनी कोणाला टक्कर देणार?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 20, 2026 | 03:06 PM
VinFast Electric Scooters India Launch 2027 (फोटो सौजन्य-AI एआय)

VinFast Electric Scooters India Launch 2027 (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • विनफास्ट इव्हो, क्यो आणि किनेट या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स 2027 मध्ये भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
  • इव्होची व्हिएतनाममधील रेंज 165 किमी असून क्यो आणि किनेटमध्ये वेगवेगळ्या मोटर मिळतात.
  • तामिळनाडूमध्ये प्रोडक्शन आणि 34 शहरांमध्ये डीलर नेटवर्क उभारण्याची विनफास्टची योजना आहे.

विनफास्ट इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात 2027 मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. व्हिएतनाममधील वाहन कंपनी विनफास्ट इव्हो, क्यो आणि किनेट या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतीय मार्केटमध्ये आणण्याची तयारी करत आहे. या तिन्ही स्कूटर्सचे प्रोडक्शन तामिळनाडूमध्ये केले जाणार आहे. भारतीय रस्ते आणि कस्टमरच्या गरजा लक्षात घेऊन या मॉडेल्सच्या डिझाइनमध्ये काही बदल केले जातील.

भारतीय व्हर्जनमध्ये जास्त ग्राउंड क्लीअरन्स, मोठी अंडरसीट स्टोरेज स्पेस आणि सुधारित चेसिस दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच बॅटरी सेटअप आणि मोटर आउटपुटमध्येही बदल होऊ शकतात. सध्या व्हिएतनाममध्ये विकल्या जाणाऱ्या इव्हो मॉडेलची रेंज 165 किमी असल्याचा कंपनीचा दावा आहे. पण ही रेंज भारतात येणाऱ्या व्हर्जनसाठी लागू असेलच असे नाही.

स्कूटरमध्ये कारसारखी सेफ्टी! Ultraviolette Tesseract Maxi मध्ये रडार टेक्नोलॉजीसह 20 hp पॉवर; EICMA 2026 मध्ये सादर

इव्हो हे तिन्ही मॉडेल्समधील कमी किमतीचे स्कूटर असू शकते. व्हिएतनाममध्ये या स्कूटरमध्ये 1.5 kWh क्षमतेची LFP बॅटरी दिली जाते. गरजेनुसार दुसरी 1.5 kWh बॅटरी जोडण्याचा ऑप्शनही आहे. यात फ्रंट डिस्क ब्रेक, LCD कन्सोल आणि 12-इंच व्हील्स मिळतात. दोन्ही बॅटरी बसवल्यानंतरही 12 लिटरची स्टोरेज स्पेस मिळते.

क्यो हे फॅमिली वापरासाठी तयार केलेले मॉडेल आहे. यात 14-इंच व्हील्स, TFT डिस्प्ले, कीलेस एंट्री आणि हिल-होल्ड असिस्ट मिळते. त्याची अंडरसीट स्टोरेज 21 लिटर आहे. किनेटला स्पोर्टी डिझाइन देण्यात आले असून त्यात 5.2 kW मोटर आहे. ही स्कूटर 0 ते 50 किमी प्रतितास वेग 6 सेकंदांपेक्षा कमी वेळेत गाठू शकते. तिचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.

BMW ची सेल्फ-बॅलन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर भारतात पेटंट! थांबल्यावरही पडणार नाही, रायडरसाठी खास केज डिझाइन

विनफास्टने भारतात 15 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 34 शहरांमध्ये 50 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक टू-व्हीलर डीलर्ससोबत प्राथमिक करार केले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांचा त्यात समावेश आहे. व्हिएतनाममधील किमतीनुसार इव्होची किंमत सुमारे 68,400 रुपये, क्योची 1.09 लाख रुपये आणि किनेटची 1.46 लाख रुपये आहे. भारतीय किंमती जाहीर झालेल्या नाहीत. भारतात या स्कूटर्सचा सामना टीव्हीएस आयक्यूब, बजाज चेतक, एथर रिझ्टा आणि ओला एस1 सीरिजशी होऊ शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विनफास्टच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स भारतात कधी लाँच होणार आहेत?

    Ans: विनफास्ट इव्हो, क्यो आणि किनेट या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स 2027 मध्ये भारतात लाँच करण्याची कंपनीची योजना आहे.

  • Que: विनफास्ट इव्हो स्कूटरची रेंज किती आहे?

    Ans: व्हिएतनाममध्ये विकल्या जाणाऱ्या इव्हो स्कूटरची दावा केलेली रेंज 165 किमी आहे. भारतीय व्हर्जनची रेंज अजून जाहीर झालेली नाही.

  • Que: विनफास्टच्या स्कूटर्सचे प्रोडक्शन भारतात कुठे होणार आहे?

    Ans: या तिन्ही इलेक्ट्रिक स्कूटर्सचे स्थानिक प्रोडक्शन तामिळनाडूमध्ये करण्याची कंपनीची योजना आहे.

Web Title: Vinfast electric scooters india launch 2027 165 km range auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Kia Carens CNG आणि Clavis CNG ची विक्री 2 महिन्यांत 6,200 पार!  ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद!
1

Kia Carens CNG आणि Clavis CNG ची विक्री 2 महिन्यांत 6,200 पार!  ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद!

Fortuner ला टक्कर देणारी Honda Avancier 4×4 मार्केटमध्ये दाखल! Hybrid इंजिन, इलेक्ट्रिक AWD फीचरसह नवीन SUV सादर
2

Fortuner ला टक्कर देणारी Honda Avancier 4×4 मार्केटमध्ये दाखल! Hybrid इंजिन, इलेक्ट्रिक AWD फीचरसह नवीन SUV सादर

New Hyundai Elantra 2027 Revealed: नवीन ह्युंदाई एलांट्रा मध्ये 157 PS Hybrid इंजिन, मोठी केबिन आणि नवीन टेक्नोलॉजीसह हायटेक फीचर्
3

New Hyundai Elantra 2027 Revealed: नवीन ह्युंदाई एलांट्रा मध्ये 157 PS Hybrid इंजिन, मोठी केबिन आणि नवीन टेक्नोलॉजीसह हायटेक फीचर्

Plug-in Hybrid Cars ना EV सारखे फायदे मिळणार? वाहन कंपन्यांची सरकारकडे मोठी मागणी; एप्रिल 2027 पासून नवे नियम
4

Plug-in Hybrid Cars ना EV सारखे फायदे मिळणार? वाहन कंपन्यांची सरकारकडे मोठी मागणी; एप्रिल 2027 पासून नवे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.